Home » Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करणाऱ्या सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग आहेत तरी कोण?

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करणाऱ्या सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग आहेत तरी कोण?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Operation Sindoor
Share

आजचा ७ मे चा दिवस संपूर्ण भारतासाठी खूपच खास आणि महत्वाचा ठरला. याच दिवशी भारताने पाकिस्तानवर एयर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांचा खात्मा केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने हे संपूर्ण मिशन पार पाडण्यात आले. हवाई दलाच्या दसॉल्ट राफेल विमानांनी SCALP-EG क्षेपणास्त्राच्या मदतीने ही संपूर्ण कामगिरी पार पडली गेली. भारतीय लष्कराने मिसाईल स्ट्राईक करून पाकिस्तानसह दहशतवाद्यांना दणाणून सोडले आहे. पाकिस्तानविरोधात जी कारवाई करण्यात आली, यात भारतीय लष्कराने पाकिस्तानातील ९ ठिकाणी मिसाईल अटॅक केला. (Operation Sindoor)

बहावलपूर, चक आमरू, भिंबेर, मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, सियालकोट, गुलपूर आणि बाग या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. येथे जैश-ए-मोहम्मदचे लाँच पॅड होते. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती. पाकव्याप्त काश्मीरमधील ५ अतिरेकी अड्ड्यांवर तर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील ४ अतिरेकी शिबिरांवर भारतीय वायूदलाने क्षेपणास्त्र डागत हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. (Operation Sindoor News)

भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानविरोधात केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती दिली. दोन महिला अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद आयोजित करून भारताने जगाला नारीशक्तीचा संदेश दिला. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या भारताच्या दोन महिला ऑफिसर कमालीच्या चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर होताना दिसत असून, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. (Marathi Latest News)

=======

हे देखील वाचा : Rafale : ‘ऑपरेशन सिंदूर’ला यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या राफेल विमानाची वैशिष्ट्ये

=======

Operation Sindoor

 

कोण आहेत सोफिया कुरेशी?

कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्य दलातील अतिशय मोठ्या पदावर काम करणाऱ्या ऑफिसर आहेत. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकारी आहेत. सोफिया सध्या सिग्नल कॉर्प्समध्ये सेवा देत आहेत. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्या लष्कराच्या प्रशिक्षण सराव ‘एक्सरसाइज फोर्स १८’ कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. (Marathi Trending News)

पुणे येथे झालेल्या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास ‘एक्सरसाइज फोर्स 18’ मध्ये त्यांनी भारतीय तुकडीचे नेतृत्व केले होते. असे करणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. पुण्यात 2 मार्च ते 8 मार्च दरम्यान झालेल्या या युद्ध सरावात 18 देशांनी भाग घेतला होता. यात ASEAN सदस्य देशांसोबत जपान, चीन, रशिया, अमेरिका, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश होता. (Marathi Top News)

सोफिया कुरेशी यांना देशसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाले. यांच्या कुटुंबात सैन्याची मोठी परंपरा आहे. त्यांचे आजोबा लष्करात होते. तर, सोफिया यांचे पती मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत. मुळच्या गुजरातमधील वडोदरा येथील आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सोफिया कुरेशी १९९९ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात सामील झाल्या. त्यावेळी त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. (Marathi Top Trending News)

Operation Sindoor

सोफिया यांच्या वडिलांनी काही वर्षे सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणूनही काम केले होते. सोफिया यांनी १९९९ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्या. सोफिया यांनी १९९९ मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले. २००६ मध्ये, सोफिया यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. २०१० पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहेत. (Social News)

पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांच्या सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) कडून प्रशंसापत्र देखील मिळाले आहे. ईशान्य भारतातील पूर मदत कार्यादरम्यान त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ (एसओ-इन-सी) कडून प्रशंसापत्र देखील मिळाले.

कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंग?

१८ डिसेंबर २००४ रोजी भारतीय हवाई दलात नियुक्त झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग या आजच्या काळातील सर्वोत्तम विंग कमांडरपैकी एक मानल्या जातात. विंग कमांडर व्योमिका सिंग यांना लहानपणापासूनच विमानाबद्दल खूपच आकर्षण होते. व्योमिका सिंग यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्या नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये सामील झाल्या. सशस्त्र दलात सेवा देणाऱ्या त्याच्या कुटुंबातील पहिल्याच सदस्य आहेत. १८ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना भारतीय हवाई दलाच्या उड्डाण शाखेत कायमस्वरूपी बढती मिळाली. (Marathi News)

Operation Sindoor

पुढे त्यांनी भारतीय वायुसेनेत भरती होण्याचं स्वप्न पाहिले. त्या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना धोकादायक ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत अडीच हजार तासांपेक्षा जास्त हेलिकॉप्टर उडवले आहे. व्योमिका यांनी ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू-काश्मीरसारख्या अवघड ठिकाणी चित्ता आणि चेतक नावाचे हेलिकॉप्टर उडवले आहेत.

=======

हे देखील वाचा : Mock Drill : देशात होणाऱ्या मॉक ड्रिलची इत्यंभूत माहिती

=======

याशिवाय त्यांनी अनेक बचाव कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेशात एका कठीण बचाव कार्याचे नेतृत्व केले होते आणि लोकांचे प्राण वाचवले होते. भारतीय हवाई दलाचा वैमानिक म्हणून धोकादायक भागात उड्डाण करण्याचा व्योमिका सिंग यांना चांगला अनुभव आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी अनेक मिशनमध्ये भाग घेतला होता. २०२१ मध्ये माउंट मणिरंगवर तिन्ही दलाच्या सर्व महिला गिर्यारोहक या अभियानात सामील होत्या. हे २१,६५० फुट उंचीवर स्थित आहे. त्यांच्या या प्रयत्नाला वायू सेनाच्या प्रमुखांसह वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती. (International News In Marathi)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.