सध्याच्या काळात ऑनलाईन पद्धतीने सामान खरेदी करण्याचा ट्रेंन्ड अधिकच वाढला आहे. लोक डिजिटल पद्धतीने काही काम करणे पसंद करत आहेत. हिच बाब बहुतांश लोक बाजारात जाण्याऐवजी घरबसल्याच आपल्याला लागणाऱ्या गोष्टी ऑर्डर करत आहेत. यामध्ये त्यांचा वेळ ही वाचत आणि कुठे जावे ही लागत नाही, सर्वकाही बसल्या जागी येत आहे. अशातच सध्या ई-कॉमर्स वेबसाइटवर सुरु असलेल्या सेलमध्ये तर लोक ऐवढी खरेदी करतात की, त्यांना ती गोष्ट त्याच्या मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी करतात. परंतु ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. कारण येथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करणार असता. तर जाणून घेऊयात ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.(Online shopping)
-विश्वासू ब्रँन्डच्या माध्यमातून खरेदी करा
तुम्ही ब्रँन्ड लॉयटीबद्दल ऐकलेच असेल. म्हणजेच बहुतांश लोक आपल्या पसंदीच्या ब्रँन्डचेच कपडे खरेदी करणे पसंद करतात. कारण तुम्हाला माहिती असते त्यांचे मटेरियल किंवा त्यांची क्वालिटी किती उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही जर ब्रँन्डच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग केल्यास तुम्हाला जे फोटोत दिसते तसेच कापडे मिळतील. काही वेळेस असे ही होते की, जास्त माहिती नसललेल्या ब्रँन्डचे कपडे आपण ऑर्डर तर करतो पण ते त्या प्रकारचे येत नाहीत. त्यामुळे आपण नाराज होतो आणि आपले पैसे फुकट गेल्याचे म्हणतो.
-ब्रँन्डची वेबसाइटवर असलेल्या प्रोडक्टसोबत तुलना करा
ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्यापूर्वीची ही महत्वाची बाब आहे. प्रत्येक ब्रँन्डचा एक क्लोन ब्रँन्ड असतो. म्हणजेच मूळ ब्रँन्डचा डुप्लिकेट ब्रँन्ड तयार करुन विक्री केली जाते. ही गोष्ट सध्या खुप प्रमाणात होत आहे. त्यामुळे जेव्हा एखादे सामान खरेदी करणार असाल ब्रँन्डची अधिकृत वेबसाइटवर प्रोडक्टची तुलना करण्यास विसरु नका. काहीवेळेस आपण डिस्काउंट मिळत आहे म्हणून ब्रँन्डकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे खरा ब्रँन्ड आणि बनावट ब्रँन्ड मधील जर फरक जाणून घ्यायचा असेल तर ही गोष्ट जरुर करुन पहा
हे देखील वाचा- ऑनलाईन पद्धतीने फर्निचर खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा
-प्रोडक्टबद्दल दिलेली माहिती व्यवस्थितीत वाचा
ऑनलाईन शॉपिंग करताना प्रोडक्ट संबंधित सर्व माहिती व्यवस्थिती वाचा. प्रोडक्ट खरंच योग्य आणि विश्वासनीय वाटत असेल तर ते खरेदी करा. त्याचसोबत प्रोडक्टसोबत दिल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल ही नीट जाणून घ्या. कारण फोटोमध्ये आपल्याला पूर्ण गोष्टी दाखवल्या जातात पण त्या ऑर्डर झाल्यानंतर काही गोष्टी गायब असतात.
-गॅरंटी आणि वॉरंटी पाहणे विसरु नका
काही वस्तू आपण त्या सुंदर दिसतात म्हणून कोणताही विचार न करता खरेदी करतो. पण प्रोडक्टसोबत दिली जाणारी गॅरंटी आणि वॉरंटी बद्दल सुद्धा जाणून घ्या. कारण प्रोडक्टमध्ये डिफेक्ट असेल तर तुम्हाला बदलून घेताना कोणतीही समस्या उद्भवणार नाही. आणखी मह्त्वाचे म्हणचे प्रोडक्टवर निश्चित काळासाठी गॅरंटी आणि वॉरंटी दिली आहे की नाही ते सुद्धा पहा.(Online shopping)
-निवडलेले प्रोडक्ट दुसऱ्या वेबसाइटवर ही तपासून पहा
जेव्हा आपण घराबाहेर जाऊन एखादे सामान खरेदी करतो त्यापूर्वी आपण त्याची एक-दोन दुकानांमध्ये चौकशी करतो. अशाच प्रकारे ऑनलाईन पद्धतीने सामान खरेदी करताना तुम्ही जे निवडले आहे ते अन्य वेबसाइटवर ही क्रॉस चेक करुन पहा. म्हणजेच तुम्हाला त्याची योग्य किंमत आणि माहिती सुद्धा मिळेल. अन्यथा तुमची फसवणूक ही होण्याची शक्यता असते.
-कस्टमर रिव्हू जरुर वाचा
ऑनलाईन शॉपिंग करताना नेहमीच एखादे प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दलचा कस्टमर रिव्हू नक्की वाचा. कारण तुम्ही जे प्रोडक्ट खरेदी करणार असाल तेच प्रोडक्ट यापूर्वी एखाद्याने खरेदी करुन त्यावर रिव्हू दिलेला असेल. ते प्रोडक्ट दाखवल आहे तसेच आहे का की त्यात काही चूक आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल.