सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण प्रत्येक गोष्ट डिजिटली करायला पाहतो. अशातच घराचा किराणा ते बँकेचे व्यवहार सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने केले जातात. त्यामुळे लोकांचे घराबाहेर जाऊन मार्केटला जाणे ही कमी झाले आहे. अशातच जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एखादे फर्निचर विकत घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. कारण ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना प्रोडक्टच्या खाली भले त्या बद्दलची माहिती दिली असेल पण ते डिलिव्हर झाल्यानंतर त्याच पद्धतीचे आणि उत्तम गुणवत्तेचे असेल का असा ही प्रश्न उपस्थितीत होते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने फर्निचर खरेदी करत असाल तर पुढील काही टीप्स जरुर लक्षात ठेवा. अन्यथा तुमचेच नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे.(Online furniture buying)
-क्वालिटी आणि ब्रँन्ड
असे बहुतांश वेळा होते की, जे तुम्हाला वेबसाइटवर प्रोडक्ट दाखवले गेलेय ते तसेच असेल. त्याबद्दलची अधिक माहिती ही दिली असेल. मात्र डिलिव्हर झाल्यानंतर जसे तुम्ही फोटोत पाहिले होते तसे नसेल तर तुमची फसवणूक झाल्यासारखेच आहे. त्यामुळेच उत्तम क्वालिटीसह ब्रँन्डचे फर्निचर खरेदी करण्यावर भर द्या. आणखी महत्वाचे म्हणजे प्रोडक्टच्या खाली अन्य लोकांनी केलेल्या कमेंट्स आणि रेटिंग्स ही जरुर पहा.
हे देखील वाचा- दुबईतील हायटेक लायब्ररी जेथे रोबोटच्या मदतीने पुस्तक निवडता येतात

-गरजेनुसार फर्निचर खऱेदी करा
एखादे फर्निचर खरेदी करण्यापूर्वी त्याची तुम्हाला खरंच गरज आहे का तरंच ते घेण्याचा विचार करा. कारण तुम्ही त्या गोष्टीसाठी पैसे देणार आहात हे सुद्धा लक्षात ठेवा. फर्निचर घेण्यापूर्वी त्याची अधिक माहिती मिळवा. अन्य वेबसाइटवर ही त्याच्या किंमतीसह रेटिंग्स ही तपासा. फक्त एकाच ब्रँन्ड ऐवजी विविध ब्रँन्डचे फर्निचर ही तुम्ही पाहू शकता.(Online furniture buying)
-अधिक माहितीसाठी ई-रिटेलरकडून तपासून पहा
तुम्हाला नक्की कोणते फर्निचर घ्यायचे आहे ते ठरल्यानंतर त्याच्यासंदर्भातील अधिक माहिती, सर्विस, देखभाल कशी करावी हे सुद्धा जाणून घ्या. या व्यतिरिक्त ई-रिटेलरला तुम्ही तुम्हाला प्रोडक्ट बद्दलचे प्रश्न विचारु शकता. या व्यतिरिक्त प्रोडक्टची क्वालिटी, डिलिव्हरी चार्जेस, कधी डिलिव्हरी केली जाईल याबद्दल ही विचारा.
-‘या’ सुद्धा गोष्टी लक्षात ठेवा
ऑनलाईन पद्धतीने फर्निचर खरेदी करताना नेहमीच अधिकृत आणि विश्वासनीय ब्रँन्डचा विचार करा. आपल्या मित्रांना सुद्धा तुम्ही जे फर्निचर घेतायत त्याबद्दल विचारा. या व्यतिरिक्त ज्या वेबसाइटवरुन फर्निचर खरेदी करणार आहात त्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि रिव्हू सुद्धा वाचा.