येत्या १८ तारखेला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा अधिकृतरीत्या पहिला दिवस. या दिवसापासून पाच दिवस चालणारा दिवाळीचा सण सुरु होतो. अश्विन महिन्याच्या त्रयोदशी दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच धन्वंतरी देवाची आणि कुबेर भगवान यांची यथासांग पूजा केली जाते. धनत्रयोदशीला मुख्यत्वे धन्वंतरीची पूजा करण्याची प्रथा असली तरी या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करण्याला देखील महत्व आहे. (Dhantryodashi)
मात्र यासोबतच या दिवशी धनाची पूजा करणे देखील अतिशय शुभ मानले जाते. आपल्या जुन्या मान्यतेनुसार धनतेरसच्या दिवशी केली जाणारी खरेदी तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी घेऊन येते. असे असले तरी या दिवशी केवळ महागड्या आणि चीज वस्तूच घेतल्या पाहिजे असे नाही. या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंच्याच खरेदीला महत्व असे नाही. धनत्रयोदशीला काहीही न घेता एक अतिशय साधी, स्वस्त आणि रोजच्या वापरातली वस्तू घेण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मग नक्की ही वस्तू कोणती चला जाणून घेऊया. (Marathi News)
धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ घेण्याला मोठे महत्व सांगण्यात आले आहे. या दिवशी जर मीठ घेतले तर नक्कीच शुभ फळ देणारे असते. धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाचे पाकीट खरेदी करा. हे मीठ जेवणात वापरा. धनत्रयोदशीला मीठ खरेदी केल्याने घरातील गरिबी दूर होते. घरात सुख-समृद्धी येते. घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकली जाते आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ओतली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी मीठ खरेदी केल्याने घरामध्ये सुख-समृद्धीचा वास होतो आणि आयुष्यातील आर्थिक तंगी दूर होते. (Todays Marathi Headline)
घरात धनाची देवी लक्ष्मीचे आगमन होते. लक्ष्मी आनंदी आहे. त्यामुळे ती आपल्या घरातून रोग, त्रास आणि आजार आपल्या घरापासून दूर ठेवते. घरातील आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैसा मिळतो. मीठ विकत घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते तुम्ही स्वतःच्या कमावलेल्या पैशाने खरेदी करा, कर्ज घेऊन किंवा कर्ज घेऊन नव्हे. धनत्रयोदशीच्या दिवशी इतर कोणाकडूनही मीठ मागू नका. (Latest Marathi Headline)
धनत्रयोदशीला मीठाचे हे उपाय करा
– या दिवशी मीठाच्या पाण्याने घर पुसून घ्यावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. (Marathi Trending Headline)
– घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेच्या कोपऱ्यामध्ये थोडे मीठ एका काचेच्या भांड्यामध्ये ठेवा. यामुळे घरातील दरीद्रता दूर होते.
– आपल्या तळहातावर थोडे मीठ घ्या आणि ते आपल्या डोक्यावर तीन वेळा फिरवा. ते तुमच्या दुकानाच्या बाहेर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. व्यवसायात नफा व फायदा होऊ शकतो. (Top Marathi Headline)
– वैवाहिक आयुष्यात सतत वाद-विवाद निर्माण होक असतील तर धनत्रयोदशीच्या रात्री मोठे मीठ तुमच्या शयनकक्षात ठेवा.
– शास्त्रानुसार मीठ शुक्र आणि चंद्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. अशामध्ये मीठ कधीही स्टील किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये ठेऊ नका. यामुळे चंद्र आणि शनीचा वाईट परिणाम घरातील सदस्यांवर पडतो. त्यामुळे मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवणं शुभ मानले जाते. (Marathi Latest News)
– तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर रोज सकाळी उठून तळहातावर थोडे मीठ घ्या. यानंतर हे मीठ पाच वेळा डक्यावरुन उतरवून वाहत्या पाण्यात प्रवाहीत करा. हा उपाय केल्यास घरातून नकारात्मक शक्ती निघून जाते. तसेच तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळते. (Top Trending News)
=======
Dhantrayodashi : धनत्रयोदशीला ‘या’ गोष्टींची खरेदी ठरेल लाभदायक
Dhantrayodashi : धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप दान करण्याचे महत्व
=======
– धनत्रयोदशी हा धन, संपत्ती आणि समृद्धीचा सण आहे. अख्खे धणे हे धान्याचे प्रतीक मानले जाते, कारण ‘धन’ शब्दाशी त्याचे नाव साधर्म्य आहे. त्याचप्रमाणे मीठ हे जीवनातील मूलभूत आणि आवश्यक घटक मानले जाते, जे स्वाद आणि समृद्धी दर्शवते. या दोन्ही गोष्टी विकत घेणे म्हणजे घरात सौभाग्य आणि संपत्ती आणण्याचे प्रतीक आहे. तसेच, धनत्रयोदशीला अख्खे धणे आणि मीठ विकत घेण्याची प्रथा विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील काही भागांत पाळली जाते. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics