जग वेगाने पुढे जात असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला ही सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. लोक आता हे मान्य करु लागले आहेत की, जी कामे पुरुष मंडळी करतात तिच कामे महिला सुद्धा करु शकतात. जेथे समानतेबद्दल बोलले जाते तेथे काही प्रकारचे तर्क वापरले जाता. मात्र परंपरेबद्दल बोलायचे झाल्यास तर सर्व तर्क विफोल ठरतात. परंपरेसंदर्भात लोक थेट त्याच गोष्टींना मानतात ज्या वर्षानुवर्ष चालत आल्या आहेत. उदाहरणासाठी जगातील अशी काही धार्मिक ठिकाणं आहेत जेथे महिलांना जाण्यास परवानगी नाही. भारतातील सबरीमाला मंदिरावरुन असे विवाद झाले आहेत. (Okinoshima Island)
अशाच प्रकारचे एक ठिकाण जापान मध्ये सुद्धा आहे. ज्याला UNESCO ने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषणा केली आहे. हे एक बेट असून तेथे महिलांना जाण्यास परवानगी नाही. या ठिकाणी शिंटो धर्माची परंपरेची मान्यता आहे. या बेटावरील काही ठिकाणं अशी आहेत जी कोरियाच्या येथून सर्वाधिक जवळ आहेत. परंतु तरीही ती जापानच्या सीमेवर येतात.
येथे जाण्यासाठी पुरुषांना करावे लागते हे काम
महिलांना कोणत्याही स्थितीत येथे जाण्यास बंदी आहे. परंतु पुरुषांना सुद्धा येथे येण्यासाठी काही परंपरेचे पालन करावे लागते. येथे येण्यापूर्वी त्यांना कोरिया स्ट्रेटच्या पाण्याने अंघोळ करावी लागते. त्यानंतर त्यांना पूर्णपणे नग्न व्हावे लागते. ते या बेटावर अंघोळ केल्यानंतरच येऊ शकतात. त्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि प्रार्थना ही करावी लागते.

पवित्र का मानले जाते हे बेट?
या बेटावर शिंटो धर्मातील धार्मिक स्थान मानले गेले आहे. या ठिकाणी १७ व्या शतकातील एक मंदिर उभारण्यात आले आहे. पौराणिक मान्यतेनुसार येथे नाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जाते. Okitsu Shrin बनवण्यात आले आहे. तसेच पूजेसंदर्भात येथे काही खास नियम ही आहेत.
एकदा का अंघोळ केल्यानंतर जेव्हा ते आतमध्ये येऊन पूजा करतात तेव्हा एका निश्चित पद्धतीने हे बेट सोडावे ही लागते. येथून कोणतीही गोष्ट घेऊन जाता येत नाही. त्याचसोबत आपला अनुभव कोणासोबत शेअर ही करु शकत नाहीत. रिपोर्ट्सनुसार, या बेटावर हजारो आर्टिफॅक्ट्स, सोन, चांदी, मुर्त्या ठेवण्यात आल्या आहेत. परंतु येथून काहीच बाहेर घेऊन जाता येत नाही.(Okinoshima Island)
हे देखील वाचा- तिरुपती शहर, जेथे २.६ लाख कोटींचे मंदिरच नव्हे तर ‘या’ आहेत खास गोष्टी
वर्षातून एकदाच सुरु ठेवले जाते हे बेट
या बेटावर जाण्यासाठी प्रत्येक वर्षी केवळ २०० लोकांचीच निवड केली जाते. बीबीसीच्या रिपोर्ट्सनुसार, २७ मे रोजी येथे पूजा केली जाते. सर्व पौराणिक नियमांचे पालन करत सर्व पुरुष मंडळी प्रार्थना करतात. येथील हजारो वर्ष जुन्या मान्यतेनुसार, महिलांना येण्यास बंदी आहे. कारण ते एक खतरनाक ठिकाण मानले जाते. येथील महंतांचे असे म्हणणे आहे की, ते हजारो वर्षांपूर्वीची जुनी परंपरा आता बदलू शकत नाहीत. या बेटावर महिलांनी न येण्याचे एकच कारण की, जेथे आल्यानंतर नग्न होऊन अंघोळ करावी लागते.