सूर्याशिवाय आपण या जगाची कल्पनाच करू शकत नाही. दररोज सकाळी न चुकता त्याच वेळेला उगवणारा हा सौरी संपूर्ण पृथ्वीला प्रकाशासोबतच ऊर्जा देण्याचे काम करतो. या सूर्याला विज्ञानासोबतच आपल्या हिंदू धर्मामध्ये देखील मोठे महत्व आहे. तो फक्त आगीचा गोळा नाही तर ऊर्जेचा धनी आहे. याच सूर्यामुळे पृथ्वीवरील सजीव आजवर जीवित आहे. आपल्यापासून जवळपास १४९ दशलक्ष लांब असलेला हा सूर्य आजही वैज्ञानिकांसाठी पूर्णपणे न उलगडलेले कोडे आहे. जेवढे महत्व सूर्याला विज्ञानामध्ये तेवढेच अध्यात्मामध्ये देखील आहे. (Arghya)
हिंदू धर्मात सूर्य हा केवळ तारा नाही तर पंचदेवांपैकी एक आहे. ज्योतिष शास्त्रातही सूर्याचं मोठं महत्त्व आहे. ज्योतिषनुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. सूर्याकडे असणारी प्रचंड ऊर्जा आणि प्रकाश मनुष्यला लाभदायक असल्याचे आपल्याला माहीतच आहे. ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण सृष्टीला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये सूर्याचे प्रबळ स्थान हे आपल्या भाग्य उजळवत असते. आपल्या धर्मामध्ये याच सूर्याला देवाचे स्थान देण्यात आले आहे.(Know About Arghya)
सकाळी उठल्यानंतर स्नानादि कर्मे आटोपून सूर्याला अर्घ्य देण्याची मोठी परंपरा आहे. अगदी रामायण, महाभारत काळात देखील सूर्याला अर्घ्य देण्याचा उल्लेख या महाग्रंथामध्ये केलेला आढळतो. आजच्या आधुनिक काळात देखील अनेक लोकं ही परंपरा जपताना आणि पुढे नेताना दिसत आहे. आजही अनेक घरांमध्ये सकाळी उठून सूर्याला त्याच्या बारा नावांचे उच्चारण करून अर्घ्य दिले जाते. मात्र हे अर्घ्य देण्यामागे नक्की काय उद्देश असतो?, अर्घ्य का दिले जाते आणि याचे काय फायदे होतात? याबद्दल खूपच कमी लोकांना माहित असेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. (Marathi Top Stories)
सूर्यदेव प्रत्यक्ष दिसणारे देवता आहेत. यामुळे यांच्या पूजेने लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सकाळी तांब्याच्या कलशाने अर्घ्य देणे. आपल्या पुराणातील माहितीनुसार श्रीकृष्णाने त्याच्या मुलाला सांबला सांगितले आहे की, त्यांनीही स्वतः देखील सूर्यदेवाची पूजा केलेली आहे आणि या पूजेमुळे त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. सोबतच श्रीकृष्णाने हे देखील सांगितले की, जो भक्त पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान सूर्यदेव पूर्ण करतात. (Marathi Latest News)
===============
हे देखील वाचा : Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
अर्घ्य देणे म्हणजे काय?
सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन पूर्वेकडे तोंड करून उगवत्या सूर्यास जल अर्पण केले जाते. यालाच ‘अर्घ्य’ असे म्हणतात. सूर्य उगवल्यानंतर साधारण एक तासाच्या आत हे अर्घ्य दिले जाते. अर्घ्य देताना नुसते पाणी अर्पण केले तरी चालते. किंवा तांब्यात पाणी, तांदूळ, फूल टाकून देखील सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते. अर्घ्य देताना सूर्यमंत्राचा जप करतात आणि सूर्याची बारा नावे देखील घेतात. (What is Arghya?)
अर्घ्य देताना म्हटली जाणारी सूर्याची बारा नावे
ॐ सूर्याय नम:
ॐ भास्कराय नम:
ॐ रवये नम:
ॐ मित्राय नम:
ॐ भानवे नम:
ॐ खगय नम:
ॐ पुष्णे नम:
ॐ मारिचाये नम:
ॐ आदित्याय नम:
ॐ सावित्रे नम:
ॐ आर्काय नम:
ॐ हिरण्यगर्भाय नम:
अर्घ्य देण्याचे फायदे
१) सूर्याला अर्घ्य दिल्याने आत्मिकशुद्धी होते आणि मनोबल वाढते. आत्मिकशुद्धी झाल्यामुळे मन प्रसन्न होते आणि पूर्ण दिवस चांगला जातो. तसेच मनोबल मजबूत झाल्याने कामात सकारात्मकता आणि एकाग्रता येते. (Marathi News)
२) सकाळच्या कोमल सूर्यप्रकाशामुळे शरीर निरोगी राहते. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवाला रोज सकाळी लवकर अर्घ्य दिल्याने व्यक्तीचे शरीर रोगमुक्त राहते. रोज अर्घ्य देणाऱ्या व्यक्तींना कोणताही आजार लगेच होत नाही. (Hindu and Sun)
३) सूर्याची पूजा करून अर्घ्य दिल्याने व्यक्तीला डोळे आणि हाडांशी संबंधित समस्या होण्याची शक्यता कमी होते.
४) सूर्याला अर्घ्य दिल्याने सकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडण्यास सुरुवात होते. व्यवसाय, नोकरी क्षेत्रात उत्तम प्रगती होते आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते.
५) सुर्यदेवाला अर्घ्य दिल्याने माणसाला आर्थिक आणि मानसिक लाभ मिळतो. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
============
हे देखील वाचा : Heatstroke : उन्हाळ्यात उष्मघातापासून वाचण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
============
६) सूर्याला देवाचे स्थान देण्यात आले आहे. शिवाय सूर्य हा ऊर्जा, प्रकाश आणि जीवनाचे प्रतीक मानले जाते. सूर्य पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. सूर्याला अर्घ्य देणे म्हणजे त्याच्याबद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करणे देखील समजले जाते.
७) सूर्याला अर्घ्य दिल्याने त्वचेची चमक वाढते, आळस दूर होतो आणि डोळ्यांची नजर देखील वाढते.