Home » महिलांमध्ये लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच काळजी घ्या

महिलांमध्ये लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच काळजी घ्या

by Team Gajawaja
0 comment
Obesity in Women
Share

आजकालची बिघडलेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे बहुतांश पुरुष-महिलांमध्ये वजन अधिक वाढण्याची समस्या निर्माण होते. जर वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर लठ्ठपणाचे शिकार होतो. अशातच यामुळे काही आजारांना आमंत्रण दिले जाते. वजन वाढल्याची सर्वाधिक समस्या महिलांमध्ये अधिक दिसून येते. खरंतर हाउस वाइफमध्ये ही समस्या अधिक दिसते. कारण त्या दिवसभर घरातील काम करतात. पण शरिराला फिट आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी त्या कोणत्याही प्रकारे शारिरीक रुपात अक्टिव्ह नसतात. जर तुम्ही घरातच रहाल, व्यायाम करणार नाही, चालणे-फिरणे कमी असेल तर वजन वाढू शकते. एकदा का तुम्ही लठ्ठपणाचे शिकार झाल्यास तर काही गंभीर आजार मागे लागू शकतात. (Obesity in Women)

लठ्ठपणाची कारणं
‘वूमन्सहेल्थ डॉट जीओवी’नुसार, ओबेसिटी अथवा लठ्ठपणाची समस्या अशावेळी सुरु होते जेव्हा शरिरात अधिक प्रमाणात कॅलरी वाढल्या जातात. शरिर उत्तम पद्धतीने स्वस्थ आणि सक्रिय ठेवण्यासाठी कॅलरी आणि आवश्यक विटामिन, खनिज आणि अन्य पोषक तत्वांची गरज भासते. मात्र जर तुमचे शरिर उपयोगाच्या तुलनेत अधिक कॅलरी जमा करत असेल तर वजन वाढते. अशातच वाढते वजन वेळीच नियंत्रणात न ठेवल्यास लठ्ठपणाची समस्या उद्भवते. तुम्ही बॉडी मास्क इंडेक्सचा वापर करुन हे जाणून घेऊ शकता की, तुमचे वजन अधिक आहे की तुम्ही लठ्ठपणाचे शिकार झाला आहात. बीएमआयमुळे हेल्दी आणि अनहेल्दी रेंज किती आहे हे कळते. हे एक असे टूल आहे जे शरिरातील फॅटची योग्य माहिती देते. जर २५ ते २९.९ बीएमआय असेल तर तुमचे वजन अधिक आहे. तसेच ३० किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास तुम्ही लठ्ठपणाचे शिकार आहात असे दाखवले जाते.

महिलांमध्ये वजन वाढल्यास उद्भवणाऱ्या समस्या
एनडीटीवी डॉट कॉम मध्ये छापून आलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला दीर्घकाळ स्वस्थ रहायचे असेल तर वजन नियंत्रणात ठेवावे लागेल. वजन वाढल्याने तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. हेल्दी डाएट आणि दररोज व्यायाम केल्यास वाढते वजन नियंत्रणात ठेवता येते. अत्याधिक वजन असेल तर महिलांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. यामुळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला नुकसान पोहचते. मूड स्विंग्स होत राहतात. पल्मनोरी फंक्शन सुरळीत काम करत नाही. वाढते वजन तुम्हाला काही गंभीर आजाराने ग्रस्त करु शकते. जसे की, मधुमेह, हार्ट डिजीज, ब्रेस्ट कॅन्सर, पीओएस, प्रेग्नेंसी संबंधित समस्या येऊ शकतात. लठ्ठपणा आपले आयुष्य कमी करु शकतो.

लठ्ठपणाची कारणं
लठ्ठपणा वाढण्यासाठी सर्वसामान्यपणे जेनेटिक्स, वय, हार्मोनल मध्ये बदल, प्रेग्नेंसी दरम्यान वजन वाढणे, पीसीओएस डिसऑर्डर अशी कारण असू शकतात. सुरुवातीलाच वजन नियंत्रणात ठेवण्याचे उपाय वापरल्यास तर काही स्तरापर्यंत लठ्ठपणापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.(Obesity in Women)

हे देखील वाचा- वेळेआधीच आलेल्या मेनोपॉजमुळे महिलांच्या शारिरीक-मानसिक आरोग्याला धोका

अधिक वजन आणि लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी उपाय
-तुम्ही दररोज हेल्दी डाएट ते कॅलरीचा इनटेक कमी करून वजन नियंत्रणात ठेवू शकता. महिलांनी दररोज १२०० ते १५०० कॅलरी घेतल्या पाहिजेत. लो-कॅलरी डाएट हेल्दी आणि पोषक तत्व असलेले असावे, जेणेकरुन तुम्ही फिट राहण्यास मदत होईल.

-जर तुमचे वजन वाढत असेल आणि तरीही तुम्ही व्यायाम करत नसल तर हे योग्य नाही. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आठवड्यातून पाच दिवस तरी अर्धा तास व्यायाम करावा. खुप वेळ बसून राहणे, झोपणे ही सवय दूर करावी. प्रत्येक २० मिनिटांमध्ये ३ ते ५ मिनिटांत चाला-फिरा. स्ट्रेचिंग एक्ससाइज करा. यामुळे शरिरात रक्तपुरवठ्याची क्रिया ही सुरळीत सुरु राहते.

-तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंगचा वापर करु शकता. मात्र यासाठी एखाद्या डायटिशियनचा सल्ला घ्या. स्वत:ला हायड्रेट ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, कॅफेनचे सेवन करु नका. जंक फूड, पाकिट बंद पदार्थ खाण्यापासून दूर रहा. त्याऐवजी हिरव्या भाज्या, फळ, धान्य, प्रोटीन्सचे सेवन करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.