Home » भारतातील प्रत्येक तिसरे मुलं लठ्ठपणाचे शिकार, जाणून घ्या कारणे

भारतातील प्रत्येक तिसरे मुलं लठ्ठपणाचे शिकार, जाणून घ्या कारणे

बालपणातच लठ्ठपणा मागे लागल्याने काही प्रकारचे आजारही होतात. याच कारणास्तव कमी वयात मधुमेह, हृदयासंबंधित समस्या आणि श्वसनासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये डिप्रेशनही वाढले जाऊ शकते.

by Team Gajawaja
0 comment
Child weight control
Share

Obesity in Child : भारतात प्रत्येक तिसरे मुलं लठ्ठपणाचे शिकार झाले आहे, वर्ष 2022-2023 पर्यंत 21 वेगवेगळ्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, देशात जवळजवळ 8.4 टक्के मुलं लठ्ठपणाचा सामना करत आहेत. तर 12.4 टक्के मुलांचे वजन अत्याधिक आहे. जगातील लठ्ठपणा असलेल्या मुलांच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागते. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, ही स्थिती अधिक चिंतादायक आहे. याकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे आहे. हेल्थ एक्सपर्ट्स असे मानतात की, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढला जातो. याचा परिणाम मुलांच्या एकूण शरिरावर होतो. जाणून घेऊया लठ्ठपणा वाढण्यामागील सर्वाधिक मोठे कारण नक्की काय आहे.

पाकिटबंद फूड्सचे अत्याधिक सेवन
बालपणीच लठ्ठपणाचे शिकार झाल्यास वेगवेगळे आजार मागे लागू शकतात. याच कारणास्तव कमी वयातच मधुमेह, हृदयासंबंधित समस्या उद्भवू शकतात. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, भारतातील मुलांमध्ये खाण्यापिण्याची सवय बिघडलेली आहे. ते अत्याधिक प्रमाणात बाहेरचे पदार्थ खातात. पाकिटबंद फूड्सचे अधिक सेवन केले जाते. यामुळेच लठ्ठपणा वाढला जातो. काही अभ्यासातून समोर आले आहे की, भारतातील मुलांसाठी काही पाकिटबंद फूड्समध्ये साखरेचे प्रमाण पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत अधिक असते. अशातच भारतीय मुलांमध्ये लठ्ठपणाचे हे एक प्रमुख कारण आहे.

जंक फूड्स
आजकाल धावपळीच्या आयुष्यात बहुतांश पालक आपल्या मुलांना जंक फूड्स आणि पाकिटबंद पदार्थ खाण्यास देतात. यामुळे मुलांना संतुलित आहार मिळत नाही. पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला जातो.

लठ्ठपणा वाढल्यास निर्माण होणाऱ्या समस्या
-काही आजार मागे लागू शकतात
-मानसिक आरोग्यावर परिणाम होतो
-भावनात्मक आरोग्यावर परिणाम होतो
-अतिरिक्त वजन वाढले जाते
-लठ्ठपणामुळे मुलांना चिडवले गेल्यास ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात

लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी काय करावे?
-पाकिटबंद फूड्सचे सेवन करणे टाळावे
-अन्नपदार्थात महत्त्वाचे व्हिटॅमिन्स, मिनिरल्स आणि फायबरचे प्रमाण असावे
-हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन करावे
-घरच्याघरी तयार केलेले पदार्थांचे सेवन करावे (Obesity in Child)
-दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करावे
-कोल्ड ड्रिंक्स किंवा अन्य गोड पदार्थांपासून दूर रहावे


आणखी वाचा :
पाकिटबंद फूडच्या लेबलवरील माहिती योग्य आहे की नाही कशी तपासून पहावी?
एका वर्षापेक्षा कमी वयातील मुलांना कधीच खायला देऊ नका ‘हे’ पदार्थ

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.