Home » आता ‘या’ दोन देशांमध्ये युद्धाचे सावट

आता ‘या’ दोन देशांमध्ये युद्धाचे सावट

by Team Gajawaja
0 comment
War
Share

जगावर तिस-या महायुद्धाचे सावट आहे.  रशिया-युक्रेन आणि इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धामुळे चिंता व्यक्त होत आहे.  यामध्ये आता स्पेन, बोलिव्हिया आणि कोलंबिया या देशांनी भर टाकली आहे.  या तिनही देशांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. त्याला कारण ठरले आहे, तीनशे वर्षापूर्वीचे जहाज.  स्पेनचे जहाज तिनशे वर्षापूर्वी समुद्रात बुडाले.  कोलंबियाजवळ असलेल्या या जहाजाचा शोध घेण्यासाठी कोलंबियानं सर्वतोपरी प्रयत्न केले.(War)

 2015 पासून कोलंबिया वेगवेगळ्या मार्गातून या जहाजावरील अमुल्य संपत्ती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.  त्यातच पुढच्या वर्षी कोलंबियामध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत.  त्याआधी या जहाजावरील सर्व संपत्ती वर काढण्याचा आदेश तेथील अध्यक्षांनी दिला आहे.  त्यामुळे निवडणुकीमध्ये त्यांना फायदा होईल असा अंदाज आहे.  असे असले तरी स्पेननं याला तीव्र आक्षेप घेतला आहे. 

हा सर्व खजाना स्पेनच्या राजाचा होता , त्यामुळे त्याचा ताबा आपल्या देशालाच मिळायला हवा असा दावा स्पेनकडून करण्यात आला आहे.  त्यात बोलिव्हियानंही हा आपला खजाना असल्याचा दावा केला आहे. समुद्राखाली असलेल्या या खजिन्यामध्ये अनेक अमुल्य रत्ने, माणकं आहेत.  शिवाय अपार सोन्याचा साठा आहे.  त्याची किंमत करता येणार नाही, येवढी आहे.  या समुद्रात असलेल्या खजिन्याची मालकी कोणाकडे आहे आणि त्याचा ताबा कोणाला मिळावा यासाठी आता स्पेन, बोलिव्हिया आणि कोलंबिया या तीन देशांमध्ये तणाव वाढला आहे.  (War)

कोलंबिया या देशाला लागून असलेल्या समुद्रातून 315 वर्षे जुने जहाज बाहेर काढले जाणार आहे.  गेली काही वर्ष या जहाजाला वर कसे काढावे यासाठी कोलंबियाच्या पाणबुड्या काम करत आहेत.  कोलंबियाने समुद्राच्या तळातून हे जहाज शोधले आहे, त्या समुद्राच्या भागात अद्यापही माणूस पोहचू शकला नव्हता.  सुरुवातींला पाणबुड्यांना जेव्हा सोन्याची नाणी मिळाली, तेव्हा ही साधारण नाणी असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला.  पण या नाण्यांचा अभ्यास केल्यावर ही नाणी स्पेनच्या राजाची असल्याचे स्पष्ट झाले. 

त्यामुळे पाणबुड्यांनी या भागात आणखी शोध घेतला.  तेव्हा अख्खे जहाजच त्यांना मिळाले.  हे जहाज सोन्या चांदीच्या वस्तूंनी भरलेले होते.  कोलंबियासाठी हा महत्त्वाचा शोध होता.  या खजिन्याची किंमत ट्रिलियन्समध्ये सांगितली गेली आहे. हा खजिना मिळाल्याची बातमी पुढे आल्यावर त्यावर अनेक देशांनी आपला दावा लावला आहे.  मात्र, हा खजिना जिथे सापडला ते जलक्षेत्र कोलंबियाच्या अखत्यारित आहे. जहाजाच्या दुर्घटनेचा शोध लागल्यानंतर, कोलंबियाने त्याला मानवी इतिहासातील सर्वात मौल्यवान शोध म्हटले. हा खजिना कोलंबियाचे नशीब बदलू शकतो.  त्यामुळे कोलंबियानं अन्य देशांचे दावे धुडकावून लावले आहेत.  (War)

या जहाजावर सापडलेल्या खजिन्याची किंमत साधारण 1.66 लाख कोटी असल्याचा अंदाज आहे.  कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी हा खजिना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.  त्यांनी गॅलन सॅन जोस नावाचे जहाज लवकरात लवकर पाण्यातून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.  पुढच्या वर्षी कोलंबियामध्ये निवडणुका आहेत.  त्यावेळी खजिन्याचे महत्त्व वाढणार आहे.  या खजिन्यात आणखी काय आहे, याचा अंदाज करता येत नाही.  मात्र चिनी भांडी, डिनर सेट आणि बंदुकाही सापडल्या आहेत.  समुद्रात बुडण्यापूर्वी या  सॅन जोस नावाच्या या जहाजावर सोने आणि चांदीसह 1 लाख 66 हजार कोटी डॉलर्सचा 200 टन खजिना होता. 1708 मध्ये हा खजिना स्पेनचा  राजा फिलिप पाचवा याचा असल्याचा दावा आता स्पेनं केला आहे.   

ब्रिटिश नौदलाने केलेल्या हल्ल्यात स्पेनचे हे सॅन जोस जहाज बुडाले होते.  त्यावेळी जहाजावर 600 लोक होते, त्यापैकी फक्त 11 लोकच जिवंत राहू शकले. 2015 मध्ये कोलंबियन नौदलाच्या पाणबुड्यांना या जहाजाचे अवशेष 31 हजार फूट पाण्याखाली सापडले होते. त्यानंतर कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल सँटोस यांनी हे जहाज समुद्रातून बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत.  त्यांनी मानवी इतिहासातील सर्वात मौल्यवान खजिना असे या खजिन्याचे वर्णन केले आहे. (War)

सॅन जोसला जहाजाच्या दुर्घटनेची पवित्र ग्रेल म्हणूनही ओळखले जाते. या जहाजाच्या नाशावरून स्पेन, कोलंबिया आणि बोलिव्हियामध्ये वाद सुरु झाला आहे.  बोलिव्हियन नुसार हा खजिना शोधण्यासाठी त्यांच्या लोकांचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे हा खजिना बोलिव्हियनचा आहे.  सॅन जोस जहाज 8 जून 1708 रोजी बुडाले.  तेव्हा जहाजावर अनेक तोफाही होत्या.  बुडाण्यापूर्वी हे जहाज अमेरिकेतून स्पेनला खजिना घेऊन जात होते. स्पेन हा खजिना ब्रिटनविरुद्धच्या युद्धात वापरणार होता. (War)

=============

हे देखील वाचा : कमी वयात केसगळतीची कारणे

=============

सॅन जोसने, पनामा येथून 14 जहाजे आणि तीन स्पॅनिश युद्धनौकांच्या ताफ्याचे नेतृत्व केले. एका ब्रिटिश जहाजाने त्यांच्यावर हल्ला केला.  8 जून 1708 रोजी रॉयल नेव्हीचे इंग्लिश कमोडोर चार्ल्स वेजर यांनी कार्टाजेनापासून 16 मैलांवर बारूजवळ या जहाजाचा माग काढला.  त्यांनी जहाज आणि त्यातील सर्व जडजवाहर ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु केले.  पण त्याचवेळी जहाजावर स्फोट होऊन अख्खे जहाजच समुद्राच्या तळाशी गेले.  आता तेच जहाज नेमके कुणाचे आणि त्याच्यावर खजिना कोणाच्या मालकीचा यावरुन तणाव निर्माण झाला आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.