जून महिना हा खास असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यासोबत आणखी एका गोष्टींनी जून महिना गाजणार आहे. ही घटना अवकाशात होणार आहे. जून महिन्यात एक-दोन नाही तर थेट सहा ग्रह एक रांगेत येणार आहेत. ही खगोलीय घटना दुर्मिळ आहे. (Planetary Alignment)
यावेळी आकाशात एकाचवेळी एका सरळ रेषेत सहा ग्रह दिसतील. हे ग्रह पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनीही पाहता येतात. सहा ग्रह एका सरळ रेषेत येण्याची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते. इस्त्रो, नासासह जगभरातील अनेक देशांच्या अंतराळ संशोधन संस्था ही दुर्मिळ घटना टिपण्यासाठी सज्ज आहेतच. तसेच खगोल शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थीही ही अनोखी घटना बघण्यासाठी आतुर झाले आहेत.
या महिन्यात पृथ्वीवर एक अनोखा खगोलीय नजारा पाहायला मिळणार आहे. ग्रहांची दुर्मिळ रांग दिसणार अवकाशात बघायला मिळणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सहा ग्रह एकत्र येणार आहेत. याला “ग्रहांची परेड” म्हटले जात आहे. गेल्या काही महिन्यापासून अनोख्या खगोलीय घटना होत आहेत. एप्रिलमधील दुर्मिळ संपूर्ण सूर्यग्रहण आणि मे महिन्यात अमेरिका आणि अन्य देशात आलेले शक्तिशाली सौर वादळ यामुळे हे वर्ष खगोलीय घटनांचे असल्याची नोंद करण्यात आली. त्यात आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होणा-या ग्रहांच्या परेडचा समावेश होणार आहे. (Planetary Alignment)
पुढच्या अनेक वर्षात अशा पद्धतीची खगोलीय घटना होणार नाही. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या मते, प्रत्येक ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर ग्रहांचे संरेखन अवलंबून असते. प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमण कालावधी भिन्न असल्यानं या घटनेला दुर्मिळ म्हणण्यात आले आहे. ही घटना अधिक खास आहे, कारण ही ग्रहांची परेड पृथ्वीवरुन उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. भारतातूनही या खगोलीय घटनेचा नजारा पहाता येणार आहे. (Planetary Alignment)
बुध, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांचा यात समावेश आहे. या वेळी चंद्र देखील दिसेल आणि तो अस्त होणाऱ्या चंद्रकोरात असेल. यापैकी बुध आणि मंगळ हे सर्वात तेजस्वी दिसतील कारण ते इतर ग्रहांपेक्षा पृथ्वीच्या जवळ असतील. उर्वरित ग्रह रात्रीच्या वेळी चांगल्या प्रकाशासह दृश्यमान होतील. ही ग्रहांची परेड ३ जून रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात अधिक जवळून बघता येणार आहे. या ग्रहांच्या परेडची सुरुवात २७ मे रोजी साओ पाउलोच्या आकाशात एका छोट्या भागात झाली. २८ मे रोजी सिडनी, २९मे रोजी मेक्सिको, ३० मे रोजी अबू धाबी आणि हाँगकाँग आणि २ जून रोजी अथेन्स आणि टोकियो येथून हजारो नागरिकांनी ही ग्रहांची परेड बघितली आहे. (Planetary Alignment)
यावेळी नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करीत ग्रहांना अधिक जवळून बघण्याचा आनंद उपभोगला आहे. बुध, मंगळ, गुरू आणि शनि या ग्रहांना अधिक तेजस्वी रुपात पहाता आले आहे. आताही हे ग्रह अधिक तेजस्वी दिसत आहेत, त्यांना पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सूर्यास्तानंतर किंवा पहाटेपूर्वी आहे.
३ जून, २०२४ रोजी, ही ग्रहांची परेड अधिक देशातून दिसणार आहे. बुध, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि असे हे ग्रह पहाटेच्या आधी उत्तर गोलार्धातून दिसणार आहेत. हा दुर्मिळ देखावा खगोलशास्त्रात अनेक वर्ष अभ्यासाचा विषय ठरणार आहे. ३ जूनच्या सकाळी, अवकाश प्रेमींना बुध, मंगळ, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून आकाशात एका समान मार्गात दिसतील तो मार्ग, ग्रहण मार्ग म्हणून ओळखला जातो.
===========
हे देखील वाचा : पाकिस्तानातील सर्वाधिक महागडे घर, मुकेश अंबानींच्या अँटेलियाला देते टक्कर
===========
हा मार्ग सूर्यमालेतील ग्रहांसाठी एक प्रकारचा खगोलीय महामार्ग म्हणून काम करतो. या ग्रहांच्या परेडमध्ये प्रत्येक ग्रह स्वतःच्या वैशिष्ट्यांसह दिसणार आहे. शनि ग्रह त्याच्या भव्य वलयांसह दिसणार आहे. शनी ग्रह कुंभ नक्षत्रात दृश्यमान होईल. पहाटेच्या वेळी शनी अधिक प्रकाशमान दिसणार आहे. नेपच्यून, जवळच्या मीन राशीमध्ये असेल. त्याला बघण्यासाठी उच्च-शक्तीच्या दुर्बिणीची किंवा दुर्बिणीची आवश्यकता लागणार आहे.
मंगळ ग्रह हा त्याच्या लालसर रंगाने ओळखला जाणार आहे. तो उघड्या डोळ्यांनी सहज दिसेल. गुरु आणि बुध ग्रह ही डोळ्यांनी बघता येणार आहे. २४ जूनपर्यंत, ही ग्रहांची परेड काही अंशी दिसणार आहे. जुलै महिन्यात हा अदभूत नजारा विरळ होत जाणार आहे.
सई बने