वास्तुशास्रानुसार घरात काही गोष्टी करणे फार महत्वाचे असते. खरंतर त्यानुसार जर काही गोष्टी ठेवल्यास तुम्हाला त्याचे सकारात्मक फायदे घरात जाणवतात. वास्तुशास्रात दिशांनुसार घर हे तुम्हाला फळेल की नाही सांगितले जातेच. पण त्यामधील दिशांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही कोणत्या ठिकाणी काय गोष्टी ठेवल्या पाहिजेत हे सुद्धा कळणे फार महत्वाचे असते. सर्व दिशांपैकी पूर्वोत्तर दिशेला फार महत्व असते. या दिशेमध्ये सर्व-देवता निवास करतात. त्यामुळेच ही दिशा सर्वाधिक पवित्र असल्याचे मानले जाते. याला ईशान्य दिशेच्या (Northeast direction) नावाने सुद्धा ओळखले जाते. तर जाणून घेऊयात घरातील ईशान्य दिशेचे नक्की काय महत्व असते.
ईशान्य दिशेला देवी-देवतांचा वास
वास्तु शास्रानुसार ईशान्य कोनात जर तुमचे देवघऱ असेल तर घरात सकारात्मक उर्जा नेहमीच टिकून राहते. या दिशेला आपल्या घराचा मुख्य दरवाजा असणे सुद्धा शुभ मानले जाते. घराची तिजोरी सुद्धा या दिशेला असेल तर उत्तमच. यामुळे घऱात धनाची नेहमीच वाढ होत राहते.
असे मानले जाते की, जर घरातील तिजोरीची जागा ही उत्तर-पूर्व दिशेला असेल तर मुलगी ही अधिक बुद्धीमान आणि प्रसिद्ध होते. तर घराची तिजोरी पूर्व-उत्तर दिशेला असेल तर घरातील मुलगा हा बुद्धिमान आणि प्रसिद्ध होतो.
हे देखील वाचा- घरांच्या भिंतीवर ‘या’ गोष्टी दिसत असतील तर दुर्लक्ष करु नका, अन्यथा…
पुढील गोष्टी लक्षात असू द्या
वास्तुशास्रानुसार या दिशेत बेडरुम असणे उत्तम मानले जात नाही. कारण अविवाहित जोडप्यांसाठी ही दिशा योग्य नसल्याचे मानले जाते. अशातच तुम्ही या दिशेत आपले बेडरुम तयार करणार असाल तर तुमच्यामध्ये आणि पार्टनरमध्ये तणाव निर्माण होतो. अशाच प्रकारे या पवित्र दिशेला जर तुम्ही शौचालय बनवले असेल तर हा वास्तुदोषाचे कारण होऊ शकते. त्यामळे ईशान्य दिशेला शौचालय बांधण्यापासून दूर रहावे. असे म्हटले जाते की, वास्तुशास्रानुसार घरात गोष्टी या वास्तुनुसारच ठेवल्या पाहिजेत.(Northeast direction)
त्याचसोबत ईशान्य दिशेला कोणत्याही प्रकारची अवजड गोष्ट ठेवू नये. असे मानले जाते की, या दिशेला जड वस्तू ठेवल्यास तुमची एनर्जी फ्लो होत नाही आणि तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळेच जड कपाट, स्टोर रुम तयार करण्यापासून दूर रहा. या ठिकाणी अधिक जड सामान ठेवल्यास नकारात्मक उर्जा वाढू लागते. आणखी महत्वाचे म्हणजे ईशान दिशेला चप्पल किंवा बुट ठेवू नयेत. कारण या ठिकाणाला ईश्वराचे स्थान मानले जात असल्याने कधीच ही गोष्ट करु नका. त्याचसोबत अस्वच्छता येथे असेल तर घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते.