Home » उत्तर कोरियातील नागरिक घरात कैद, ‘या’ कारणास्तव हुकूमशाहने लावला लॉकडाऊन

उत्तर कोरियातील नागरिक घरात कैद, ‘या’ कारणास्तव हुकूमशाहने लावला लॉकडाऊन

by Team Gajawaja
0 comment
North Korea Lockdown
Share

उत्तर कोरियात यावेळी एका रहस्यमयी आजाराने शिरकाव केला आहे.त्यामुळेच लोक आता आपल्या घरात कैद झाले आहेत. उत्तर कोरियात सध्या श्वासासंदर्भात आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये फार मोठी वाढ होत आहे. याच कारणास्तव किम जोंग उनच्या सरकारने एक अॅडवायजरी जारी केली आहे. राजधानीत पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. (North Korea Lockdown)

उत्तर कोरियातील घटनांवर लक्ष ठेवून असणारी न्यूज वेबसाइट एनके न्यूज यांनी असे सांगितले की, उत्तर कोरियातील हुकूमशाह सरकारने आपल्या अॅडवायजरीत लोकांना रविवार पर्यंत घरात राहण्यासह प्रत्येक दिवशी शरिराचे तापमान तपासून पाहण्यास सांगितले आहे. त्याचसोबत याचा रेकॉर्ड ही ठेवण्यास सांगितले आहे. असे सांगितले जात आहे की, श्वासाची समस्या असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने हा निर्णय घेतला गेला आहे.

शासकीय नोटीसनुसार, उत्तर कोरियाने श्वासासंदर्भातील आजार वाढत असल्याने प्योंगयांगच्या स्थानिक लोकांसाठी पाच दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. हे आदेश जाहीर केल्यानंतर लोक बाजाराच्या दिशेने धावताना दिसून आले. तसेच आवश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवताना दिसले. नोटीस मध्ये असे म्हटले की, लोकांना सख्तीने लॉकडाऊनचे पालन करण्यास सांगितले आहे.

North Korea Lockdown
North Korea Lockdown

मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की, प्योंगयांग स्थानिकांना लॉकडाउनचे आदेश दिल्यानंतर गरजेच्या वस्तूंची साठवणूक करताना दिसले. एका नोटीस असे म्हटले, सध्या राजधानीत फैलाव होणाऱ्या आजारात सामान्य सर्दीचा समावेश आहे. परंतु यामध्ये कोरोनाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याचसोबत लोकांना लॉकडाऊनच्या काळात घरातच राहण्यास सांगितले गेले आहे. परंतु अद्याप हे स्पष्ट करण्यात आलेले नाही की, अन्य शहरात सुद्धा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे की नाही. (North Korea Lockdown)

हे देखील वाचा- ६० वर्षात प्रथमच चीनची लोकसंख्या झालीय कमी, बर्थ रेटही घटला

नॉर्थ कोरियात २०२२ मध्ये आढळला होता कोरोनाचा रुग्ण
नॉर्थ कोरियाने महारोगाच्या सुरुवातीपासून देशात कोरोना संक्रमणासाठी नकार दिला होता. येथे अधिकृत रुपात पहिला रुग्ण १२ मे २०२२ च्या रिपोर्टमध्ये आढळला होता. त्यानंतर आलेल्या बातम्यांमध्ये सरकार कोरोनाचे आकडे लपवत असल्याचे बोलले जात होते. यावर जागतिक आरोग्य संगठना यांनी सुद्धा चिंता व्यक्त केली होती.

दुसऱ्या बाजूला हुकूमशाह सरकारने ऑगस्ट २०२२ मध्ये कोरोनावर आम्ही विजय मिळवल्याची घोषणा केली होती. नॉर्थ कोरियाने काही काळापर्यंत रहस्यमयी बुखारच्या डेली केस रिपोर्ट जारी केले होते. परंतु ते सुद्धा जुलै महिन्यात बंद केले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.