उत्तरप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी राज्याचा सर्वांगिण विकास करण्यावर भर दिला आहे. उत्तरप्रदेशमध्ये अनेक नवे प्रोजेक्ट चालू असून त्यातून उत्तरप्रदेशचा कायापालट होत आहे. भव्य आणि प्रशस्त रस्ते ही उत्तरप्रदेशची ओळख होत आहे. यासोबतच नोएडा येथील फिल्म सिटीही या राज्याचे वैशिष्ट ठरणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ड्रीम प्रोजक्ट असलेल्या या फिल्म सिटीमधील प्रोजेक्टची पायाभरणी आता होत आहे. पुढच्या दोन वर्षात या फिल्म सिटीचे काम पूर्ण होईल, असे लक्ष ठेवण्यात आले आहे. नोएडा फिल्म सिटी पूर्ण झाल्यावर त्यामध्ये देशातीलच नाही तर विदेशातीलही प्रोजेक्ट हाताळण्याची क्षमता आहे. शिवाय तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो तरुणांना येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. (Uttar Pradesh)
ग्रेटर नोएडामध्ये बांधल्या जात असलेल्या फिल्म सिटीचे उद्घाटन लवकरच होत आहे. नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टनंतर ही फिल्म सिटी मोठा प्रोजेक्ट आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ यमुना प्राधिकरणाच्या सेक्टर-21 मध्ये ही फिल्म सिटी आहे. फिल्म सिटीला जगातील सर्वात हायटेक फिल्म सिटी म्हणून विकसित करण्याची योजना आहे. या फिल्म सिटीच्या पहिल्या टप्प्यात बांधकामासाठी 230 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. यामध्ये चित्रपट स्टुडिओ, फिल्म इन्स्टिट्यूट, इनडोअर आणि आउटडोअर अभिनय कार्यशाळा, मनोरंज पार्क, चित्रपट निर्मितीसाठी लागणारी सर्व आधुनिक उपकरणे असणार आहेत. यमुना प्राधिकरण सेक्टर 21 मध्ये फिल्म सिटी विकसित करणार आहे. यात प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या नेतृत्वाखालील कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ते 230 एकरांवर विकसित केले जात आहे. तो सात झोनमध्ये विकसित केला जाणार आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर भारतातील चित्रपट निर्मितीचे केंद्र म्हणून काम करण्यासाठी दक्षिण नोएडा येथे असलेल्या YEIDA सिटीच्या अंतर्गत विकसित सेक्टर 21 मध्ये एक नवीन फिल्म सिटी तयार करण्याची घोषणा केली. (Social News)
सुरुवातीला या फिल्मसिटीचा प्रोजेक्ट वादात सापडला होता. यासाठी मुख्यमंत्री योगी यांच्यावर टिकाही करण्यात आली. या फिल्म सिटीसाठी लागणा-या निधीमुळे त्यांना विरोधकांनी लक्ष केले. शिवाय मुंबईमधील फिल्म सिटी उत्तरप्रदेशला घेऊन जात असल्याची अफवाही उठवण्यात आली. मात्र योगी आदित्यनाथ यांनी या नोएडा फिल्म सिटीला जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली फिल्म सिटी बनवण्याचे स्वप्न बघितले. पुढच्या दोन वर्षात हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. फिल्म सिटी पूर्ण झाल्यावर येथे चित्रपट उद्योग संबंधातील कामकाज होणार आहेच, पण ही फिल्म सिटी बघायला येणा-या पर्यटकांची संख्याही मोठी असणार आहे. त्याअनुषंगानेच येथे विकास कामे होत आहेत. आता ही फिल्म सिटी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी नंतर जगातील दुसरी सर्वात मोठी फिल्म सिटी होणार आहे. भुतानी समूहासोबत बोनी कपूरसारखे दिग्दर्शक या फिल्म सिटीच्या विकासासाठी पुढे आले आहेत. (Uttar Pradesh)
========
हे देखील वाचा : भारतात एनर्जी ड्रिंक्सवर बंदी !
========
चित्रपट निर्मितीसाठी येथे एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असतील. चित्रपटाचे संपूर्ण युनिट एकाच ठिकाणी राहिल अशी व्यवस्था येथे असेल. राहण्यासाठी आलिशान व्हिला, व्यायामासाठी जिम, खरेदीसाठी व्यावसायिक जागा, गेस्ट हाऊसही येथे उपलब्ध असतील. यासोबत गोल्फ कोर्स, फुटबॉलचे मैदान, इनडोअर गेमची सुविधाही असणार आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सिनेमा-थीम असलेली मनोरंजन पार्क आणि व्हर्च्युअल रिॲलिटी ॲडव्हेंचर पार्क बांधण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात जागतिक चित्रपट निर्मिती, जागतिक दर्जाचे चित्रपट निर्मिती शिक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट निर्मिती स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय चित्रपट अकादमी आणि वैविध्यपूर्ण मैदानी सेटच्या निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. याशिवाय या सगळ्या फिल्मसिटीला उत्तम अशा रस्त्यांनी जोडण्यात येणार आहे. अंतर्गत भुयारी मार्ग, पादचारी मार्ग आणि मोठी पार्किंगची जागा येथील वैशिष्ट ठरणार आहे. चित्रपट उपकरणांचा मॉलही येथे उभारण्यात येत आहे. यात जगभरातील चित्रपट निर्मिती संबंधातील सर्वच उपकरणे विकत घेण्याची सुविधा असेल. एकूण नोएडा फिल्म सिटी ही फक्त उत्तरप्रदेशसाठीच नाही तर भारतासाठी नवी ओळख ठरणार आहे. (Social News)
सई बने