नोबल पुरस्काराला (Noble Prize) जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानले जाते. केमेस्ट्री मध्ये यंदाच्या वर्षी नोबल पुरस्कार कॅरोलिन आर बर्टोज्जी, मोर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांनी रेणूचे एकाच वेळी समान भागांमध्ये विखंडन करण्याची पद्धत विकसित केल्याबद्दल दिला गेला आहे. रॉयल स्विडिश एकेडमी ऑफ साइंसेजचे महासचिव हॅस एलेग्रेन यांनी नुकतीच्या स्वीडनच्या स्टॉकहोम मध्ये करोलिंस्का इंस्टिट्यूट येथे विजेते जाहीर केले. तर जाणून घेऊयात या परिवाराबद्दल अधिक.
नोबल पुरस्काराचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची सुरुवात मेरी क्युरी यांच्यापासून झाली होती. त्यांना मॅडम क्युरी असे ही म्हटले जाते. खरंतर मॅडर क्युरी आणि त्यांचे पती पिअरे क्युरी या दोघांना १९०३ मध्ये संयुक्त रुपात फिजिक्समध्ये नोबल पुरस्कार दिला गेला होता. तर मॅडम क्युरी येथेच थांबल्या नाहीत. त्यांनी विज्ञान क्षेत्रात सातत्याने उत्तम कामगिरी केली. अशा प्रकारे १९११ मध्ये त्यांना पुन्हा एकदा नोबल पुरस्काराने गौरवण्यात आले.
१९०३ मध्ये मेरी क्युरी यांनी पती सोबत जिंकला नोबल पुरस्कार
मेरी क्युरी खरंतर फ्रांन्सच्या नागरिक होत्या. मात्र त्यांचा जन्म पोलंडमध्ये झाला होता. ७ नोव्हेंबर १८६७ मध्ये जन्मलेल्या मेरी क्युरी यांचे वडिल पेशाने शिक्षक होते. याच कारणास्चव मेरी यांच्या वडिलांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी पॅरिसला पाठवले होते. अभ्यासक्रमादरम्यान त्या आपला अधिकाधिक वेळ लायब्ररी मध्ये घालवायच्या. १८९४ मध्ये मेरी क्युरी ग्रॅज्युएट झाल्या.
महाविद्यालयाच्या काळात त्यांची भेट फ्रांसीसी केमिस्ट पिअरे क्युरी यांच्याशी झाली. हळूहळू या दोघांमध्ये जवळचे संबंध अधिक वाढू लागले आणि पुढे जाऊन त्या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर दोघांनी रेडिओ अॅक्टिव्हिटीवर रिसर्च केला. याचा फायदा असा झाला की, वर्ष १९०३ मध्ये मेरी आणि त्यांचे पती पिअरे यांना संयु्क्त रुपात फिजिक्समद्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मेरी क्युरी यांनी पुन्हा जिंकला नोबल पुरस्कार
१९०३ मध्ये नोबल पुरस्कार जिंकून तीन वर्ष झाले नाहीत तोवर त्यांना एक मोठा धक्का बसला. खरंतर १९०६ मध्ये एका रस्ते अपघातात पिअरे क्युरी यांचा मृत्यू ढाला. मात्र मेरी यांनी आपल्या दृढ संकल्पाला नेहमीच मजबूत ठेवले होते. त्या सातत्याने आपल्या रिसर्च मध्ये व्यस्त असायच्या. अशाप्रकारे १९११ मध्ये त्यांना केमिस्ट्री मध्ये पुन्हा एकदा नोबल पुरस्काराने गौरवण्यात आले. (Noble Prize)
हे देखील वाचा- इंडोनेशियातील चलनावर गणपतीचा फोटो का असतो?
मुलगी आणि जावयाने सुद्धा जिंकला नोबल पुरस्कार
ऐवढेच नव्हे तर नोबल पुरस्कार जिंकण्यामध्ये आई-वडिल पुढे होतेच पण त्यांच्या मुलीने सुद्धा तो जिंकल. जोलिओट क्युरी आयरेन हिने अधिकृचपणे अभ्यास केला नव्हता. पण तिला अनधिकृत वर्गात सहभागी व्हायचे होते जेथे फिजिक्स शिकवले जात होते. आपल्या आईप्रमाणेच जोलिओट हिला केमेस्ट्रीमध्ये आवड होते. १९२६ मध्ये तिने फ्रेडरिक सोबत लग्न केले. तर त्या दोघांनी सुद्धा मेरी आणि पिअरे यांच्याप्रमाणे एकत्रितपणे काम केले. त्या दोघांनी रेडिओएक्टिव्ह एलिमेंट संदर्भात एक तपास केला. अशाप्रकारे या दोघांना सुद्धा १९३५ मध्ये केमेस्ट्रीसाठी नोबल पुरस्कार दिला गेला.