Home » जगातील ‘या’ गावात कधीच पडत नाही पाऊस

जगातील ‘या’ गावात कधीच पडत नाही पाऊस

by Team Gajawaja
0 comment
No rain village
Share

पाण्याशिवाय आयुष्य संभव नाही. त्यामुळे सकाळी ते संध्याकाळ पर्यंत काही कामे करण्यासाठी पाण्याची गरज भासते. पाण्याशिवाय आयुष्य जगण्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. पाण्याचा मुख्य स्रोत पाऊस आहे. पण जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा पाणी कपातीचा सामना करावा लागतो.अशातच जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की, जगातील असे कोणते ठिकाण आहे जेथे पाऊसच पडत नाही? अशावेळी प्रथम उत्तर येईल वाळवंट. परंतु असे नाही आहे. जगात पाऊस न पडणारे एक गाव आहे ते सुंदर डोंगरावर वसले आहे. हे गाव यमनची राजधानी सनाच्या पश्चिमेला मनखच्या निर्देशालयाच्या हरज क्षेत्रात अल हुतैग गाव आहे. (No rain village)

अल हुतैब गाव समुद्र सपाटीपासून ३२०० मीटर उंचीवर आहे. हे अधिक उष्णतेचा परिसर आहे. थंडीच्या दिवसात मात्र कडाक्याची थंडी पडते. स्थिती अशी असते की, सकाळच्या वेळी गरम कपडे घातल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. घरातील काही लोक रजई मध्येच असतात.परंतु जेव्हा सुर्याची किरणे डोक्यावर पडतात तेव्हा थंड गायब होते. जसे की, उन्हाळ्याचे दिवस आहे. लोकांना भयंकर उष्णतेमुळे वारंवार तहान लागते.

यमनच्या अल हुतैब गावाची ख्याति दूर दूर पर्यंत आहे. हे गाव एवढे सुंदर आहे की, पर्यटक नेहमीच येतात. हे गाव डोंगराच्या कड्यावर वसलेले आहे. अशातच वरुन खाली पाहिल्यास डोळ्यांना प्रसन्न वाटते गावातील घर सुद्धा फार सुंदर आहेत. या गावात यमनी समुदायाची लोक राहतात. आता प्रश्न उपस्थितीत राहतो की, डोंगरावर बसलेल्या या गावात पाऊस का पडत नाही.

हे सुंदर गाव डोंगराच्या टोकावर असल्याने ढगांच्या वरती असल्याचे दिसते. दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाल्यास ढग हे गावाच्या खाली दिसते. यामुळे लोकांना असे वाटते की, आपण स्वर्गात आलो आहोत. मात्र येथे कधीच पाऊस पडत नाही. (No rain village)

हे देखील वाचा- भारतातील ‘या’ राज्यांचा होणार विध्वंस, रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

अल-हुतैब गाव ग्रामीण आणि शहरी विशेषतांसोबत प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा वारसा लाभलेले आहे. या गावातील बहुतांश लोक अल बोहरा किंवा अल मुकरमा समुदायाशी जोडले गेले आहेत. यांना यमनी समुदाय असे म्हटले जाते. हे मुहम्मद बुरहानुद्दीनच्या नेतृत्वाखाली मुस्लिम संप्रयाशी संबंध ठेवतात. या संप्रदायातील लोक मुंबईत सुद्धा राहतात. यमनच्या अल हुतैब गावात पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी हजारो लोक येतात. या गावातील घरांचे बांधकाम पाहण्यासाठी विशेषकरुन येतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.