Home » North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !

by Team Gajawaja
0 comment
North Korea
Share

उत्तर कोरिया आणि तिथला हुकुमशहा किम जोंग उन हे जगासाठी आकर्षणाचा विषय आहेत. किम कधी कुठला निर्णय जाहीर करेल याचा नेम नसतो. पण त्यानं जाहीर केलेले निर्णय हे, उत्तर कोरियामध्ये त्याची किती दहशत आहे, याचे प्रतिक असतात. मात्र यावेळी किमनं जे आदेश जाहीर केले आहेत, त्यामुळे किमनं अप्रत्यक्षपणे अमेरिका आणि युरोपियन देशांना इशारा दिला आहे का, हा प्रश्न विचारला जात आहे. कारण किम जोंग उन याने आपल्या देशातील नित्याच्या काही शब्दांवर बंदी घातली आहे. यामध्ये आईस्क्रीमचा समावेश आहे. शिवाय हॅम्बर्गर आणि कराओके या मनोरंजन साधनाच्या नावावरही किमनं बंदी घातली आहे. (North Korea)

किमच्या मते, आईस्क्रीम, हॅम्बर्गर आणि कराओके हे पाश्चात्य शब्द आहेत. यामुळे उत्तर कोरियामधील संस्कृतीला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे किमनं आता हे तीन शब्द बोलण्यास उत्तर कोरियामध्ये बंदी घातली आहे. अर्थात किमचा बंदीचा आदेश तोडणा-याला काय शिक्षा होते, हे उघड आहे, त्यामुळे त्यानं त्याचा हा आदेश तोडणा-याला काय शिक्षा करणार हे जाहीर केलेले नाही. पण किमचा हा आदेश आल्यावर चर्चा सुरु झाली आहे. आईस्क्रीम, हॅम्बर्गर आणि कराओके हे अमेरिका आणि युरोपमध्ये लोकप्रिय आहेत. किमनं या सर्वांवर बंदी घातली नाही, तर त्याच्या शब्दांना बंदी घातली आहे. याचा अर्थ काहीजण हा किमनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिल्याचे सांगत आहेत. (International News)

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन हा नेहमी त्याच्या विचित्र निर्णयामुळे ओळखला जातो. आता किमच्या या विचित्र निर्णयामध्ये आणखी भर पडली आहे. किमनं त्याच्या देशात आईस्क्रीम, हॅम्बर्गर आणि कराओके या शब्दांवर बंदी घातली असून ही बंदी मोडणा-यांना कठोर शासन करण्यात येणार आहे. किमच्या मते आईस्क्रीम, हॅम्बर्गर आणि कराओके हे पाश्चात्य शब्द आहेत. या शब्दांमुळे उत्तर कोरियाची संस्कृती लोप पावत आहे. तरुण पिढी कायम या तीन शब्दांभोवती फिरत असते. पण त्यामुळे उत्तर कोरियाची भाषा कमी होत चालली आहे. त्यामुळेच आईस्क्रीम, हॅम्बर्गर आणि कराओके या शब्दांवर बंदी घालण्यात आली असून या शब्दातून पाश्चात्य शैलीची प्रसार होत असल्याचे किमनं सांगितले आहे. यासंदर्भात किमने जो आदेश जाहीर केला आहे, त्यात म्हटले आहे की, आईस्क्रीम, हॅम्बर्गर आणि कराओके या शब्दांचा जेव्हा देशातील तरुण पिढी वापर करते, त्यामुळे भविष्यात उत्तर कोरियाच्या मूळ भाषेला धोका आहे. (North Korea)

तरुण पिढाला युरोप, अमेरिकेच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी हे पाऊल गरजेचे असल्याचेही किम जोंगनं आपल्या आदेशात सांगितले आहे. असा विचित्र आदेश किमनं जाहीर केला तरी, आता या आदेशाची अंमलबजावणी कोण आणि कशी करणार याचा प्रश्न आहे. अर्थात किमनं आपल्या आदेशाचे पालन होत की नाही, हे पाहण्याची जबाबदारीही दिली आहे. उत्तर कोरियाच्या बीच रिसॉर्ट, वोनसन येथे काम करणाऱ्या टूर गाईडना आता ही जबाबदारी देण्यात आली आहे. जे कोणी पर्यटक आईस्क्रीम, हॅम्बर्गर आणि कराओके हे शब्द वापरत असतील त्यांना यासंदर्भात रोखण्यात येणार आहे. फक्त एवढेच नाही तर याबाबत एक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे आदेशही किमनं संबंधित अधिका-यांना दिले आहेत. या आदेशानुसार आता किमचे अधिकारी टूर गाईडची नोंद करीत आहेत. (International News)

========

North Korea : जन्मलेलं मुलं देशद्रोही, या देशाचे नियम म्हणजे…

========

आईस्क्रीम, हॅम्बर्गर आणि कराओके या शब्दांना बोलण्यास बंदी घालून किमनं या शब्दांचे नवीन नावही ठेवले आहे. किम जोंग उनच्या हुकुमानंतर, हॅम्बर्गर ला आता डेजिन-गोगी ग्योप्पांग असे म्हटले जाईल. याचा अर्थ गोमांस असलेली दुहेरी भाकरी असा होतो. आईस्क्रीमचे नाव एसेकिमो असे ठेवले आहे. तर करोओके मशीनला आता ऑन-स्क्रीन कंपॅनिस्टमेंट मशीन असे बोलण्यात येईल. यासोबत किमनं उत्तर कोरियन शब्दसंग्रह तयार केला असून यातून उत्तर कोरियाच्या भाषेवरील सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यात येईल, असेही सांगितले आहे. उत्तर कोरियामध्ये अशा विचित्र आदेशांची ही पहिलीच वेळ नाही. इथे फक्त परदेशी चित्रपट आणि टीव्ही शो पाहिल्याबद्दल अनेक लोकांना मृत्युदंड दिला जातो. आता त्यात या आईस्क्रीम, हॅम्बर्गर आणि कराओके शब्दांची भर पडणार आहे. (North Korea)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.