एक काळ असा होता की, हैदराबाद मधील सातवे निजाम उस्मान यांना जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मानले जात होते. त्यांच्याजवळ जगातील उत्तम हिऱ्याचे दागिने, कार, महल, प्रॉपर्टी असे सर्वकाही होते. त्यानंतर जेव्हा मुकर्रम जाह हैदराबादचे निजाम झाले तेव्हा ८० च्या दशकानंतर त्यांच्या प्रॉपर्टीची किंमत तब्बल २५००० कोटी रुपये झाली होती. परंतु तो पर्यंत निजामांकडे देशभरातील खुप प्रॉपर्टी होती. तसेच एकापेक्षा एक सरस असे महागडे दागिने आणि सामानासह ७० हून अधिक महागड्या कारचा ताफा होता. मात्र त्यांच्यानंतर निजामची संपत्ती वेगाने कमी होत गेली.तर आठवे निजाम यांचे निधन तुर्कीतील राजधानी इस्तांबुलच्या दोन बेडरुम फ्लॅट मध्ये झाल्यानंतर त्यांना हैदराबाद मध्ये शाही पद्धतीने दफन केले गेले.(Nizam of Hyderabad Mukarram)
निजाम यांचे धन कमी होण्यामागे कारण असे होते की, संपूर्ण प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागणारे खुप जण होती. स्वत: सातव्या निजामांच्या एकूण १५० मुलांनी यावर आपल्या हिस्स्याचा दावा केला. निजाम उस्मान अली यांच्या काही पत्नांसह विवाहबाह्य संबंध ठेवून ही काही मुलं झाली होती. या व्यतिरिक्त संपूर्ण संपत्तीची देखरेख करणारे कर्मचारी आणि मेंन्टेनन्सवर ही खुप खर्च होत होता.
आठवे निजाम मुकर्मने आपल्या ५ लग्नांमध्ये काही तलाक सेटल करण्यासाठी आपल्या हिस्स्याचा बहुतांश पैसा गमावला. या व्यतिरिक्त हैदराबाद मधील महिलांच्या सर्व मौल्यवान दागिन्यांचा ही त्यात समावेश होता. चोरी होत गेली. बहुतांश धन कर्जदारांकडे गेले. त्यानंतर हैरदाबाद निजामचे एकूण नेटवर्थ १००० कोटींच्या आसपास जाऊन पोहचला.
स्थिती अशी झाली होती की, हैरदाबचे निजामला त्यांच्या ट्रस्ट सुरु ठेवण्यासाठई काही पैसे मिळायचे. पण ते त्यामधून शाही खर्च करु शकत नव्हते. त्यांची संपूर्ण प्रॉपर्टीचे प्रकरण गुंतांगुंतीचे आहे. आता जे कोणीही हलके फुल्के दावेदार आहेतच पण आता दावा निजाम मुकर्म शाह यांच्या ५ व्या पत्नीसह दोन मुल आणि ३ मुलींमध्ये होणार आहे. एकामुलेने तर काही वर्षांपासून आपला हिस्सा मिळावा म्हणून केस ही केली आहे.(Nizam of Hyderabad Mukarram)
सध्या निजामच्या परिवाराकडे हैदराबाद मधील ६ हवेली आणि औरंगाबाद मधील एक हवेली आहे. या व्यतिरिक्त त्यांची उरलेली कोट्यावधींच्या दागिन्यांची देखभालचे काम एक ट्रस्ट करते. तसेच निजामासंदर्भातील काही ट्रस्ट आहेत, ते बहुतांश गोष्टी पाहत आहे. त्यांच्या काही शिक्षण संस्था ही आहेत. जे या ट्रस्टच्या माध्यमातून चालवले जातात. आठवे निजाम मुकर्म स्वत: इस्तांबुल तुर्कीत गेल्या ३ देशकांपासून दोन बेडरुमच्या एका लहान फ्लॅटमध्ये राहत आहे. परंतु हा फ्लॅट ही परिवाराच्या मालकीच्या ताब्यात येणार आहे. असे असू शकते की, देशात आणखी काही संपत्ती असतील. दरम्यान, बहुतांश संपत्ती गेल्या ५० वर्षात निजामांद्वारे विक्री केली गेली. त्यामुळे आता निजाम यांच्या एकूण संपत्तीचे वारसदार कोण आहेत.
निजामची पहिली पत्नी प्रिंसेस एजरा हिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा अजमत जाह आता हैदाराबादचा निजाम होणार आहे. तो ६२ वर्षीय आहे. लंडन मध्ये राहतो. पेशाने प्रोफेशनल फोटोग्राफर आणि सिनेमेटोग्राफर आहे. जगातील सर्वाधिक उत्तम डायरेक्टर्स सोबत त्याने काम केले आहे. या संपत्तीचा मोठा दावेदार असल्याच्या लिस्टमध्ये त्याचे नाव सर्वाधिक वरती आहे.
त्याचसोबत प्रिंसेस एजराची मुलगी प्रिंसेस शहकार सुद्धा या संपूर्ण प्रॉपर्टीच्या हिस्सेदारांमध्ये आहे. ती आपल्या आईसह सातत्याने लंडन मधून हैदराबाद येत असते. दोन महाल चोमोहल्ला आणि फलकनुमाच्या रेनोवेशनच्या तिची भुमिका आईसोबत खास राहिली आहे. तिच्या वैवाहिक स्थितीबद्दल फारसे माहिती नाही परंतु जगभरात वाइल्ड लाइफसाठी चॅरिटी संस्थेसोबत मिळून काम करते.(Nizam of Hyderabad Mukarram)
या व्यतिरिक्त आठवे निजामची दुसरी पत्नी हेलनाच मुला आजम खान जाह आहे. तो ऑस्ट्रेलियात राहतो. त्याचा रियल इस्टेट आणि इक्विटीचे काम आहे. वडिलांची पहिली पत्नी प्रिंसेस एजरा आणि तिच्या दोन मुलांसह त्याचे संबंध उत्तम आहेत. तर मुकर्म जाह एज्युकेशन ट्रस्टचे कामकाज पाहतो आणि जगभरात फिरत असतो. तो सुद्धा या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार आहे.
हे देखील वाचा- भारतातील ‘या’ मोठ्या हल्ल्यांमधील जागतिक आरोपी अब्दुल रहमान मक्की कोण आहे?
आठवे निजाम मुकर्म याची तिसरे लग्न मिस तुर्की मनोलिया ओनूर सोबत झाले होते. त्यानंतर मनोलिया सोबत घटस्फोट झाला. पण त्याला एक मुलगी नीलोफर झाली. जी आता ३२ वर्षाची आहे. आईच्या निधनापूर्वी तिने आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सासाठी खटला केला आहे. एकेकाळी तर तिने या प्रॉपर्टीमध्ये ३००० कोटींचा हिस्सा मागितला होता. परंतु या प्रॉपर्टीची किंमत आता किती जाणार हे पहावे लागणार आहे. तिने असा सुद्धा आरोप लावला आहे की, ती सातत्याने आपल्या वडिलांना भेटत होती. पण गेल्या काही वर्षांपासून वडिलांची पहिली पत्नी प्रिंसेस एजरा आणि तिची मुलं तिला त्यांच्यापासून दूर ठेवत आहेत. या व्यतिरिक्त निजाम मुकर्रम जाहची चौथ्या पत्नीची जमीला बुलारसची मुलगी जैरीन जाह. ती २८ वर्षांची आहे. मोरक्को मध्ये राहते. तिच्याबद्दल अधिक माहिती नाही, पण निजामच्या संपत्तीत तिचा ही मोठा हिस्सा असणार आहे.