Home » Shiv Rajyabhishek : म्हणून शिवरायांनी दोन राज्याभिषेक केले होते !

Shiv Rajyabhishek : म्हणून शिवरायांनी दोन राज्याभिषेक केले होते !

by Team Gajawaja
0 comment
Shiv Rajyabhishek
Share

त्या दिवशी रायगडावर न भूतो न भविष्यति असा सोहळा पार पडत होता. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ! ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १५९६, फिरंगी दिनांक ६ जून १६७४… या दिवशी रयतेचं स्वराज्य निर्माण झालं. शिवबा हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. सभासद बखर म्हणते, या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. यानंतरच मराठा साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरलं. पण इथे एक अशी गोष्ट देखील जी अनेकांना माहीत नाही, ती म्हणजे शिवरायांचा एक नाही, तर दोनवेळा राज्याभिषेक झाला होता. एक राज्याभिषेक जो आपण दरवर्षी मोठ्या थाटात साजरा करतो तो आणि दूसरा म्हणजे तांत्रिक पद्धतीचा राज्याभिषेक ! अनेकांना या राज्याभिषेकाबद्दल माहिती नाही. पण हा राज्याभिषेक शिवरायांना का करावा लागला ? स्वराज्यावर काही विघ्न आलं होतं का ? की अजून काही कारण होतं जाणून घेऊ. (Shiv Rajyabhishek)

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला. हा काळ पाहिला तर आपल्याला शिवकाळात शाक्तपंथाचा म्हणजे तंत्रमार्गाचा प्रभाव आढळून येतो. राज्याभिषेकाच्यावेळी रायगडावर निश्चलपुरी गोसावी नावाचे एक तांत्रिक ब्राम्हणसुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवरायांना राज्याभिषेकात काही उणिवा असल्याचं सांगितलं होतं. तसेच काही अघटित घडू शकतं, असंही सांगितलं होतं. दरम्यान यानंतर गोसावी यांच्या सांगण्यानुसर शिवरायांनी २३ सप्टेंबर १६७४ रोजी तांत्रिक पद्धतीने दूसरा राज्याभिषेक करवून घेतला होता. अवघ्या काही महिन्यातच शिवरायांनी दूसरा राज्याभिषेक करवून घेतला. त्यामागची कारण, तत्कालीन परिस्थिती व दुसर्‍या राज्याभिषेकाचे विधी या सर्वांची माहिती आपल्याला ‘शिवाजीराज्याभिषेक कल्पतरू’ या ग्रंथात मिळते. (Top Stories)

शिवरायांच्या वैदीक राज्यभिषेकावेळी शिवाजी महाराजांचा विवाह हा पूर्वीच्याच स्त्रियांशी विधिपूर्वक झाला. शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली, दानधर्म झाला. परंतु गागाभट्ट यांनी निश्चलपुरी यांचा अपमान केल्याचं वर्णन या पोथीमध्ये आहे. दानधर्मामध्ये गागाभट्टांनी निश्चलपुरी यांच्या ब्राम्हणांना डावललं आणि स्वत:च्या मर्जीतील ब्राम्हणांची वर्णी लावली. पण सुवर्णतुलेनंतर अपघात होऊन गागाभट्ट यांच्या नाकाला लाकूड लागलं व शिवरायांचे कुलोपाध्ये बाळंभट्ट यांच्या डोक्यावर स्तंभावरचं लाकडी कमळ पडून अपघात झाला. शिवरायांचा अभिषेक झाला परंतु गडावरील शिरकाई देवी, कोकणचे अधीष्ठित देव परशुराम, हनुमान व वेताळ या स्थानिक देवतांचे पूजन करण्यात आलं नाही. असं निश्चलपुरी यांनी सांगितलं आहे. (Shiv Rajyabhishek)

यानंतर ते म्हणाले की तांत्रिक पद्धतीने सिंहासनाला आधार दिला गेला नाही. सिंहासनाला बळी देण्यात आला नाही. गडाच्या संरक्षक देवतांचं पूजन करण्यात आलं नाही. भूतपिछाश यांना बळी देण्यात आला नाही. गागाभट्टांच्या या चुकांमुळे अपशकुन झाले. अपघात आणि अपशकुनी घटनांचा पुढचा क्रम म्हणजे संभाजी महाराजांच्या मस्तकावरून दोन मोती ओघळले. महाराजांची कट्यार म्यानबद्ध न्हवती परंतु वेळीच लक्ष गेल्याने अनर्थ टळला. महाराज रथारूढ होताना रथाचा आस वाकला. नंतर राजे गजारूढ झाले, पण धनुष्याची प्रतंच्या ओढताना बोटातील अंगठी गळून पडली. निश्चलपुरी यांनी राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजाची भेट घेऊन या सर्व गोष्टी शिवरायांना सांगितल्या होत्या आणि पुढेही काही दिवसात बाराव्या, बाविसाव्या, पंचावनव्या, पासठाव्या दिवशी अशुभ घटना घडतील असं भाकीत केलं. (Top Stories)

निश्चलपुरी यांच्याकडून हे सर्व ऐकून घेतल्यानंतर शिवराय भ्रमित झाले. पण निश्चलपुरी यांनी सांगितल्याप्रमाणेच या घटना घडल्या. त्यांच्या भाकीतानुसार बाराव्या दिवशी राजमाता जिजाऊ यांचं निधन झालं. प्रतापगडावरची घोड्यांची पागा जळाली. यामध्ये हत्ती व घोडे मारले गेले. शिवरायांना निश्चलपुरी यांचं हेच भाकीत खरं वाटू लागलं. गागाभट्टांनी केलेल्या या वैदिक राज्याभिषेकात निश्चलपुरी व त्यांच्या शिष्यांच्या पदरी कोणतही दान तसेच सन्मानजनक वागणूक मिळाली नाही. त्यामुळे निश्चलपुरी नाराज होते. निश्चलपुरी यांनी शिवरायांच्या या दु:खद परिस्थितिचा लाभ घेतला व त्यांच्या सांगण्यावरून पुन्हा तांत्रिक विधीने राज्याभिषेक करण्याचे मान्य केललं. (Shiv Rajyabhishek)

यानुसार मुहूर्त पाहून काही जपकर्त्या ब्राम्हणांद्वारे निश्चलपुरी यांनी जप करण्यास सुरवात केली. यानंतर तांत्रिक राज्याभिषेकाला आणि मंत्रोपदेशाला समंती दिली. निश्चलपुरींकडून महाराजांनी अभिषेक करवून घ्यावा, मंत्रोपदेश घेऊ नये हा मंत्र्यांनी दिलेला सल्ला यावेळी शिवरायांनी नाकारला, असा उल्लेख या पोथीत सापडतो. यानंतर आनंदनाम संवत्सराच्या अश्विन शुद्ध पंचमीला बुधवार, २३ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरी यांनी कलशस्थापना केली. मेरूयंत्र धारण करून निश्चलपुरी यांनी राज्यारोहण समारंभ सुरू केला. सिंहासनाजवळची भूमी मंत्राने शुद्ध करण्यात आली. शिवराय आपली तलवार घेऊन सिंहासनाजवळ आले. (Top Stories)

================

हे देखील वाचा : Nashik : नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर

================

यानंतर दरवाज्याजवळ देवतांना बळी देण्यात आला आणि सहस्त्रभोजन करण्यात आले. सिंहासनाच्या आठ सिंहानाही आठ प्राण्यांचा बळी देण्यात आला. आठ सिंहाच्या पाठीवर सिंहासन असल्याने सिंहासनावर यंत्रस्थापना करून सिंहासनाला बळी देण्यात आला होता. हे आठ सिंह म्हणजे सिंह, हर्यक्ष, पंचास्य, केसरी, मृगेंद्र, शार्दुल, गजेंद्र आणि हरी… एका रत्नखचित आसनावर रौप्य आसन ठेऊन त्यावर महाराजांना बसवून अभीषेक विधीची सुरवात करण्यात आली. कलशामध्ये पाच पानांचे तुरे ठेऊन त्याला लाल रेशीम वस्त्राने गुंडाळला. अभिषेकानंतर शिवरायांनी नवीन वस्त्र परिधान केली. रायगडाला अन्नाचा नैवद्य देण्यात गेला. वैदिक व तांत्रिक मंत्रांचा जाप करत शिवरायांना आशीर्वाद देण्यात आला. त्यांनंतर निश्चलपुरी यांनी शिवरायांना सिंहासनारोहण करायला सांगितलं आणि त्यांच्यावर रत्नजडीत छत्र धरला.आणि अश्याप्रकारे शिवछत्रपतींचा दूसरा राज्याभिषेक म्हणजेच तांत्रिक राज्याभिषेक पूर्ण झाला. यावेळी रायगडाचीही पूजा करण्यात आली होती. (Shiv Rajyabhishek)

याचा एक मूळ पुरावा आपल्याला रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई लिखित मराठी रियासतमध्ये मिळतो. सरदेसाई लिहितात, ‘जिजाबाईंच्या मृत्यूनंतर विरोधीपक्षाच्या समजुतीसाठी महाराजांनी एक छोटा राज्याभिषेक निश्चलपुरींकडून करवून घेतला.’ हा इतिहास फारच अज्ञात आहे, त्यामुळे अनेकांना या राज्याभिषेकाबद्दल माहिती नसते. शिवकाळातलं हे पर्वसुद्धा सर्व इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींसमोर यावं, एवढच वाटतं.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.