डोळ्यावर मोठ्या फ्रेमचा रंगीबेरंगी चष्मा आणि डोक्यावर असलेली टोपी अशा अवतारात असलेल्या निकोलस औजुला याला नवीन युगातील नोस्ट्राडेमस म्हटले जाते. बाबा वेंगा आणि नोस्ट्राडेमस यांच्यासारखाच निकोलस औजुला हा एक भविष्यवेत्ता आहे. त्यानं वर्तवलेली अनेक भविष्यं खरी ठरली आहेत. कोविड महामारी ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी होणार असलेला डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, याबाबत निकोलसनं भविष्यवाणी केली होती. आता याच निकोलसनं 2025 हे वर्ष कसं असेल याची भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी ज्यांनी ऐकली त्यांचा थरकाप उडाला आहे. कारण निकोलसच्या या भविष्यवाणीत 2025 या वर्षाच्या मध्यातच तिस-या महायुद्धाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. नवीन युगातील भविष्यवेत्ता निकोलस औजुला यांनी या वर्षाबद्दल तीन मोठी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. 38 वर्षाचा निकोलस औजुला हा लंडनचा निवासी असून तो स्वतःला पैगंबर म्हणवून घेतो. निकोलस याला नव्या युगाचा नोस्ट्राडेमसही म्हटले जाते. कोविड महामारीच्या काळात निकोलस चांगलाच प्रसिद्ध झाला. (Nicholas Aujula)
या महामारीची अचूक भविष्यवाणी त्यानं केली होती. शिवाय ब्रिटनच्या राजघराण्यासंदर्भातही त्यानं सांगितलेलं भविष्य खरं ठरलं होतं. याच निकोलसने पुढचे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे असणार आहे, याचीही भविष्यवाणी केली होती. निकोलसनं आता 2025 वर्षासाठी जी भविष्यवाणी केली आहे, ती खरी ठरली तर जगात मोठ्या प्रमाणात विनाश होण्याची शक्यता आहे. निकोलसच्या भविष्यानुसार या वर्षात मोठी नैसर्गिक आपत्ती येणार आहे. शिवाय अनेक देशांमध्ये राजकीय उलथापालथ होणार असून या वर्षाच्या मध्यावर तिस-या महायुद्धाची सुरुवात होणार आहे. निकोलसंनी या वर्षात जगात करुणेचा अभाव असेल आणि लोक धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली एकमेकांविरुद्ध उभे रहातील. मानवामध्ये क्रूरता आणि हिंसाचारात वाढ होईल, असंही भविष्यवाणीत सांगितलं आहे. या सर्वात त्यानं तिसरे महायुद्ध सुरु होईल, हे सांगत यात अण्वस्त्रांचा वापर होईल, त्यातून जगभर विनाशाचे चित्र दिसणार असल्याचे सांगितले आहे. (International News)
निकोलसच्या भविष्यावाणीनुसार हे वर्ष ब्रिटनसाठी त्रासदायक ठरणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होईल. ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टरमर यांच्या पदाला धोका आहे. शिवाय ब्रिटनच्या राजघराण्यातही अनेक धक्कादायक बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितेल आहे. राजघराणे संकटातून जात असतांना राजकुमार हॅरी हा ब्रिटनमध्ये परत येईल. त्याच्यात आणि राजकुमार विल्यम मधील दुरावा संपुष्टात येणार आहे. तसेच जागतिक पातळीवरील मोठ्या नेत्याच्या जीवाला धोका असल्याचेही निकोलसनं सांगितले आहे. मोठ्या नेत्याची हत्या झाल्यास दंगल होण्याची भविष्यवाणीही निकोलसंनं केली आहे. (Nicholas Aujula)
यासोबत या वर्षात नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात येणार आहे. युरोप नैसर्गिक आपत्तीच्या संकटामध्ये होरपळला जाणार आहे. तसेच युरोपमधील समुद्राच्या काठावर असलेल्या शहरांना पुराचा मोठा धोका रहाणार आहे. अनेक देशात अकाली मुसळधार पाऊस येणार आहे. त्यातून शेतीचे मोठे नुकसान होईल. यामुळेच शेती उत्पादनात घट होणार आहे. अनेक शहरात समुद्राचे पाणी घुसणार असून शहरांचे नुकसान होण्याचे भविष्य निकोलसनं वर्तवलं आहे. ही भविष्यवाणी ऐकून थरकाप होत असताना निकोलसनं या वर्षाबाबत काही चांगल्याही भविष्यवाणी केल्या आहेत, त्या जाणून घेऊयात. त्याच्या मते 2025 हे विज्ञानाचंही वर्ष ठरणार आहे. यावर्षी संशोधक प्रयोगशाळेत मानवी अवयव तयार करतील. एकूण निकोलसच्या मते 2025 हे वर्ष आत्तापर्यंतचे सर्वात कठिण आणि दुष्काळी वर्ष ठरणार आहे. (International News)
===============
हे देखील वाचा : डबल चीनची समस्या होईल दूर, डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल
Santorini Island : शांतता आणि भूकंपाची भीती !
===============
निकोलसच्या भविष्यवाणी खरी ठरत असल्या तरी त्याच्याबाबत गुढ अधिक वाढले आहे. 38 वर्षाचा निकोलस आपल्या पूर्वजन्माबाबतही सांगू शकतो. त्याच्या मते गेल्या जन्मात तो इजिप्तमधील राणी होता. तर हिमालयामध्येही साधू म्हणून तो स्वतःला बघतो. त्याचा एक जन्म सिहांचा असल्याचेही निकोलस सांगतो. आपल्याकडे भविष्यात बघण्याची दृष्टी याच पर्वजन्मातील अभ्यासातून आल्याचे निकोलसचे म्हणणे आहे. आत्तापर्यंत या निकोलसचे भविष्य खरे ठरले असले तरी त्यानं या वर्षासाठी सांगितलेले भविष्य कधीही खरे ठरु नये, अशीच प्रार्थना त्याचे चाहते करीत आहेत. (Nicholas Aujula)
सई बने