Home » पावसाळ्यात ‘या’ चार गोष्टीचे सेवन कधीच करू नका! अन्यथा भोगावे लागतील विपरीत परिणाम; वाचा

पावसाळ्यात ‘या’ चार गोष्टीचे सेवन कधीच करू नका! अन्यथा भोगावे लागतील विपरीत परिणाम; वाचा

by Correspondent
0 comment
Rain | K Facts
Share

दैनंदिन जीवनात आपण कधी बाहेर फिरायला गेलो किंवा ऑफिसवरून येताना कधी बाहेरच खायचा मूड झाला, तर आपले पाय नेहमी अरबट चरबट खाण्याकडे वळतात. इतकेच काय तर कधी कधी अशा अनेक गोष्टी आपल्या आहारात येतात ज्यामुळे आपल्याला विषबाधा होऊ शकते.

सर्वात महत्वाचे म्हणजे विषबाधा होण्याचा हा प्रकार पावसाळ्यात सर्वात जास्त झालेला पहायला मिळतो. अनेक वेळा पदार्थ नीट पचत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात आपण काही पदार्थ खाणे कटाक्षाने टाळले पाहिजेत.

त्यासाठी आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात कोणते पदार्थ खायचे टाळले पाहिजेत आणि खाताना काय काळजी घेतली पाहिजे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात पावसाळ्यात कोणत्या पदार्थाचे सेवन करू नये ते.

१) भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खाणे

कोणतीही भाजी किंवा फळ बाजारातून घरी आणल्यानंतर खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुऊन घेतले पाहीजेय. कारण की हिरव्या भाज्या, कोबी, पालक आणि टोमॅटो सारख्या भाज्यांमध्ये साल्मोनेला, ई. कोलाई आणि लिस्टेरियासह इतर अनेक जीवाणू असू शकतात. तसेच पावसाळ्यात हे जीवाणू अधिक असल्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात भाजी किंवा फळे धुऊनच खावीत.

२) अर्धे शिजवलेले मांस

पावसाळ्यात अर्ध्या कच्च्या मांसाचे सेवन केल्याने अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे मांसामधील जीवाणू पूर्णपणे नष्ट होईपर्यंत ते शिजवा व नंतर ते खा. तसेच कोणत्याही हंगामात अर्ध्या कच्च्या मांसाचे सेवन करू नये. त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.

३) अनपाश्चराइज्ड डेअरी उत्पादने टाळा

जे लोक जिममध्ये जातात ते कच्चे दूध, चीज किंवा न शिजवलेले दुग्धजन्य पदार्थ जास्त वापरतात. परिणामी पावसाळ्यात कच्च्या दुधाचे सेवन केल्याने शरीरात बॅक्टेरिया निर्माण शकतात. त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. म्हणून पावसाळ्यात अनपाश्चराइज्ड डेअरी पदार्थांचे सेवन टाळावे.

४) कच्ची अंडी खाणे टाळा

अंड्याचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यास फायदेशीर असते हे आपल्याला माहीत आहे. मात्र कधी कधी कच्च्या अंड्याचे सेवन केल्याने अन्न विषबाधा होते. कच्ची अंडी खाल्ल्याने साल्मोनेला बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे आपल्या आरोग्यास हानी पोहचते. म्हणून पावसाळ्यात कच्ची अंडी खाणे टाळले पाहीजेय.

अशा या चार मुद्द्यांची दक्षता घेऊन आपण आपले आरोग्य पावसाळ्यातही निरोगी ठेऊ शकतो. त्यामुळे आता यापुढे अन्न सेवन करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

– निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.