बॉलिवूडच्या एका मोठ्या चित्रपटातील एक संवाद खूपच प्रसिद्ध आहे, ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’ हा संवाद टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या उर्फी जावेदला (Urfi Javed) लागू पडतो. कारण तिला तिच्या अभिनयातून जेवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिकपटीने प्रसिद्धी तिला तिच्या अतिशय विचित्र फॅशनने मिळवून दिली. उर्फी जावेद हे नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर काहीही म्हणजे कशाचा कशाशी संबंध नसलेले कपडे घालणारी एक मुलगी उभी राहते. उर्फीचे कपडे असे असतात ज्याचा सामान्य माणूस काय तर कलाकार देखील विचार करू शकत नाही. उर्फी नेहमीच मीडियासमोर येते तेव्हा तिच्या कपड्यांमुळे प्रसिद्ध होते.
आता नुकताच उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमुळे उर्फी पुन्हा एकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली. मात्र यावेळेस तिच्या या व्हिडिओवर येणाऱ्या कमेंट्स जरा वेगळ्या होत्या. कारण या व्हिडिओमध्ये उर्फी चक्क पूर्ण कपड्यांमध्ये दिसत होती. त्यामुळे तिच्या या व्हिडिओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. कदाचित बऱ्याच दिवसांनी किंवा काहींनी पहिल्यांदाच उर्फीला (Urfi Javed) सामान्य कपड्यांमध्ये पाहिले असल्यामुळे त्यांना हा धक्का बसला असावा.
उर्फीने (Urfi Javed) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाची जीन्स आणि गुलाबी रंगाचा टॉप घातला होता. याशिवाय तिच्या हातात एक पारदर्शी छत्री असून, ज्यात भरपूर फुलांच्या पाकळ्या दिसत असून ती छत्री उघडते आणि त्या पाकळ्या तिच्या अंगावर पडतात. उर्फी या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायला होत असून, तिच्या या लूकवर नेटकऱ्यांचा अजूनही विश्वास बसत नसल्याने या व्हिडिओवर कमेंट्स करत त्यांनी उर्फीला सर्व काही ठीक आहे ना असा प्रश्न केला आहे.
एकाने कमेंट करत लिहिले, “पूर्ण कपडे सर्व काही ठीक आहे ना?”, दुसऱ्याने लिहिले, “पूर्ण कपड्यांमध्ये जास्त चांगली दिसते.” दरवेळी उर्फी तिच्या गरीब आणि विचित्र फॅशनमुळे गाजत असते. कधी फक्त अंगावर फुलं लावून फोटोशूट करते, तर कधी टू पीस घालत त्यावर पारदर्शी पँट घालून बाहेर फिरते. तिच्या या सर्वच प्रकारच्या फॅशन नेहमीच तिला लाईमलाइट मिळवून देतात. मात्र आताची उर्फी खूपच वेगळी आहे. तिचा साधा आणि आकर्षक लूक अजून नेटकऱ्यांच्या पचनी पडला नाही. उर्फीची (Urfi Javed) फॅशन जरी अतरंगी असली तरी अनेक लोकं तिचे सोशल मीडियावर कौतुक करतात तर काही तिला ट्रोल करतात.
=====
हे देखील वाचा – ‘वीर दौडले सात’चं मोशन पोस्टर रिलीज
=====
उर्फीच्या (Urfi Javed) वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी लोकप्रियता आणि प्रसिद्धी करण जोहरच्या ओटीटी बिग बॉसने मिळवून दिली. त्यानंतर उर्फी सतत मीडियामध्ये चर्चेत आहे.