Home » Nawaz Sharif : शरीफ फक्त नावाला !

Nawaz Sharif : शरीफ फक्त नावाला !

by Team Gajawaja
0 comment
Nawaz Sharif
Share

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि वाद यांचे जवळचे नाते आहे. नवाज शरीफ यांच्या मुलाचे आणि वादाचेही असेच नाते असल्याचे आता उघड झाले आहे. नवाज शरीफ यांचा मुलगा हसन नवाज याला दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे. लंडनमध्ये असलेल्या या शरीफला लंडन प्रशासनाने 2025 चा कर थकव्याबद्दल नोटीस दिली आहे. हसन नवाज यांनी 10 दशलक्ष पौंड एवढी कराची रक्कम बुडवल्याचा आरोप असून आता लंडन प्रशासन हसन नवाज  ही रक्कम वसूल करण्यासाठी हसन यांची मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत आहे. नवाज शरीफ यांचा मुलाची सध्या लंडनमध्ये चौकशी सुरु आहे. नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांची लंडनमध्ये सुमारे 300 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या मालमत्तेची किमंत 32 दशलक्ष पौंड म्हणजेच 288 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. शरीफ कुटुंबियांनी लंडनमध्ये 1993 मध्ये भव्य असे, एव्हनफील्ड हाऊस बांधले आहे. अर्थात शरीफ कुटुंबियांच्या या एव्हनफील्ड हाऊस व्यतिरिक्तही लंडनमध्ये 20 हून अधिक मालमत्ता आहेत. (Nawaz Sharif)

करोडो रुपयांची मालमत्ता काळ्या पैशातून शरीफ कुटुंबियांनी लंडनमध्ये जमवल्याचा आरोप करण्यात येतो. शिवाय यामधील काही मालमत्ता विकून शरीफ कुटंबियांनी आपल्या संपत्तीत भर टाकली आहे. यापैकीच एक मालमत्ता म्हणजे, शरीफ यांचे हाइड पार्कमधील घर. हे अलिशान घर तब्बल 388 कोटी रुपयांना विकले गेले आहे. ही मालमत्ता शरीफ यांचा मुलगा हसन नवाज याने विकली. मात्र यासंदर्भात झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची कोणतीही माहिती नवाज यानं सरकारला दिली नसल्याचा अरोप आहे. या संदर्भात कुठलाही कर हसन नवाज यांनी भरला नाही. त्यामुळे हसन नवाज यांना दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे. हसन नवाज यांच्यावर 10 दशलक्ष पौंड कर आहेत. ही मोठी रक्कम वसूल करण्यासाठी लंडन प्रशासनाने हसन नवाजच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरीफ कुटुंबियांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (International News)

हसन नवाज यांचे वडील माजी पंतप्रधान आहेत, काका पंतप्रधान आहेत आणि त्यांची बहिण मरियम नवाज देखील पाकिस्तानच्या मुख्यमंत्री आहेत. अशा परिस्थितीत हसन नवाज यांना दिवाळखोर घोषित केल्यामुळे शरीफ कुटुंबियांवर पुन्हा चौफेर टिका कऱण्यात येत आहे. हसन शरीफ जाणूनबुजून ही कराची रक्कम भरत नसल्याचा आरोपही लंडन प्रशासनानं लावला आहे. त्यामुळे या महिन्यात लंडन प्रशासनाने एक यादी जाहीर केली असून त्यामध्ये हसन शरीफ यांच्या नावाचा समावेश कऱण्यात आला आहे. हसन यांच्यावर 10 दशलक्ष पौंड ही कराची रक्कम 2015-16 पासून प्रलंबित आहेत. आता त्यावर आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम सुमारे 1 कोटी पौंड झाली आहे. यापूर्वीही हसन नवाज यांचे नाव पनामा पेपर लीक प्रकरणात पुढे आले होते. हसन नवाज हे लंडनमध्ये मोठ्या ऐशोआरामात रहात असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे अनेक गाड्या असून त्यात काही स्पोर्ट कारचाही समावेश आहे. शिवाय हसन यांना खाजगी विमानातून प्रवास करण्याची आवड आहे, त्यासाठी ते करोडो रुपये खर्च करतात. (Nawaz Sharif)

==============

हे देखील वाचा : Tenzin Gyatso : दलाई लामांचे चीनला आव्हान !

Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

===============

आत्तापर्यंत अनेकवेळा हसन नवाज बेकायदेशीर मालमत्ता खरेदी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शरीफ कुटुंबाकडे येत असलेल्या काळ्या पैशातून हा सर्व व्यवहार होतो. शरीफ कुटुंब या काळ्या पैशातून लंडनमध्ये मालमत्ता विकत घेतात आणि मग त्यांची हसन नवाज मोठ्या रकमेनं विक्री करुन अधिक फायदा मिळवतात. लंडनमधील अशीच एक मालमत्ता त्यांनी अली रियाज मलिक नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीला 38 दशलक्ष पौंडांना विकली. हेच अली रियाज मलिक शरीफ कुटुंबाचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम करत असल्याचीही माहिती आहे. या सर्व प्रकरणामुळे पुन्हा शरीफ कुटुंबिया वादात सापडले आहेत. एकीकडे पाकिस्तान सरकारकडे कर्मचा-यांचा पगार देण्याएवढे सुद्धा पैसे नाहीत मात्र शरीफ कुटुंबियांकडे एवढे पैसे येत आहेत, की त्यातून ते लंडनसारख्या जगातील सर्वात महागड्या शहरात एकापाठोपाठ एक मालमत्ता खरेदी करत आहेत. या सर्व व्यवहाराची चौकशी कऱण्यात यावी अशी मागणी आता पाकिस्तानातही करण्यात येत आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.