वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे प्रियंका गांधी वाड्रा यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. जूनमध्ये झालेल्या निवडणुकीत राहुल गांधींनी ही वायनाड लोकसभेची जागा जिंकली होती. मात्र त्याचवेळी त्यांचा रायबरेली मतदार संघातूनही विजय झाला. नियमानुसार एकच मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करता येते. त्यामुळे राहूल गांधीनी रायबरेलीची निवड करत वाडनाड लोकसभेतून राजीनामा दिला. तेव्हापासून या जागेवर कॉंग्रेसतर्फे प्रियंका गांधी या उमेदवार असतील हे सुतोवाच करण्यात आले होते. कारण पहिल्यांदा लोकसभेची पायरी चढू पाहणा-या प्रियंका यांना वाडनाड ही मतदार संघ सोप्पा वाटत आहे. त्यांचे भाऊ, राहून गांधी तिथून दोनवेळा विजयी झाले आहेत. त्यामुळे या जागेची पोटनिवडणूक प्रियंका गांधी सहज जिंकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Navya Haridas VS Priyanka Gandhi)
मात्र याच जागेवर आता भाजपानं मोठी दावेदारी ठोकत नव्या हरिदास या महिलेला तिकीट दिले आहे. प्रियंका गांधी यांच्या विरोधात उभ्या राहणा-या नव्या हरिदास कोण आहेत, याची उत्सुकता आहे. नव्या हरिदास यांच्यात आणि प्रियंका गांधी यांच्यात मोठी तफावत आहे. एक म्हणजे, नव्या हरिदास या काही नवख्या उमेदवार नाहीत. दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या नव्या यांचा जनाधार मोठा आहे. शिवाय नव्या या सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. मुख्य म्हणजे त्या स्थानिक आहेत, आणि वाडनाड सारख्या मतदार संघातील समस्या त्यांना माहिती आहेत. त्यामुळेच प्रियंका गांधी वाड्रा आणि समस्त काँग्रेसजनांना वाडनाडची निवडणूक जेवढी सोप्पी वाटते तेवढी नक्कीच असणार नाही. वाडनाड लोकसभा मतदार संघासाठी प्रियंका गांधी वाड्रा या कॉंग्रेसच्या उमेदवार आहेत. (Political News)
त्यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळाली आहे ती नव्या हरिदास या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीला. या मतदार संघासाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. वाडनाड पोटनिवडणूक मोठी रंजक होणार असून यावेळी कॉंग्रेससाठी हा लढा प्रतिष्ठतेचा तर भाजपासाठी स्थानिकांच्या हक्काचा होणार आहे. प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवासासाठी सुरक्षित मतदार संघ म्हणून वायनाडकडे पाहिले जाते. प्रत्यक्षात या मतदार संघाता स्थानिक उमेदावर विरुद्ध आयात केलेला उमेदवार अशी लढत होणार आहे. प्रियंका गांधी यांची दावेदारी भक्कम असली तरी गेल्या वर्षभरात वाडनाडचे समिकरण बदलले आहे. वाडनाडमध्ये 24 जुलै 2024 रोजी भूस्खलनाची मोठी दुर्घटना झाली. पुंजिरीमट्टोम, मुंडक्काई , चूरलमला आणि वेल्लारीमाला गावांमध्ये मेप्पडी पंचायत, व्याथिरी तालुक्यात यामुळे मोठी हानी झाली. (Navya Haridas VS Priyanka Gandhi)
यासर्वात स्थानिक उमेदवार किती महत्त्वाचा असतो, याचा प्रत्यय तेथील जनतेला आला आहे. म्हणूनच भाजपाचा नव्या हरिदास यांचे मोठे आव्हान प्रियंका गांधी यांना असणार आहे. नव्या हरिदास या भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस आहेत. शिवाय त्या कोझिकोड महापालिकेच्या सलग दोनवेळा नगरसेवक होत्या. वायनाड आणि केरळच्या राजकीय अभ्यासक म्हणून त्यांना ओळखले जाते. आत्तापर्यंतच्या निवडणुकीत त्यांनी प्रचाराची रणनीती सांभाळली आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत नव्या यांनी कोझिकोड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. INL च्या अहमद देवरकोविल आणि IUML च्या नूरबिना रशीद यांच्या मागे तिसरे स्थान त्यांना मिळाले होते. नव्या यांना त्यावेळी 20.89% मते मिळाली होती. मात्र आता यावेळी परिस्थिती बदलली आहे. गेल्या तिन वर्षात नव्या यांच्या कामाचा आवाका वाढला आहे. हा मतदार संघ त्यांना चांगलाच बांधला असून प्रियंका यांना त्यांचे कडवे आव्हान रहाणार आहे. (Political News)
======
हे देखील वाचा : क्रूर लष्करी हुकूमशहा, खुनी ते राष्ट्रपती !
======
नव्या हरिदास या व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी कालिकत विद्यापीठाशी संलग्न KMCT अभियांत्रिकी महाविद्यालयातून B.Tech ची पदवी घेतली आहे. त्यांची भाषणे ही अभ्यासपूर्ण असतात. त्यांना वाडनाड परिसरातील समस्यांची जाण आहे. जुलै मध्ये झालेल्या भूस्खलनाच्या वेळी मदतकार्यांत नव्या या आघाडीवर होत्या. भाजपानं वायनाडमध्ये उमेदावारी दिल्यामुळे नव्या यांनी आनंद व्यक्त केला आहे. वायनाडच्या लोकांना विकासाची गरज आहे. काँग्रेस परिवार वायनाडच्या लोकांच्या गरजा पूर्ण करत नाही. कारण त्यांना स्थानिकांच्या समस्यांची माहितीच नाही. कुठलाही आयात उमेदवार या भागाचा विकास करु शकत नाही, त्यामुळे स्थानिक मला नक्कीच विजयी करतील असा विश्वास नव्या यांना आहे. या लोकसभा निवडणुकीत वाडनाडमधून राहूल गांधी विजयी झाले असले तरी त्यांची मतांची टक्केवारी गेल्या तुलनेत घटली आहे. याचा फटका प्रियंकाना बसण्याची शक्यता आहे. शिवाय स्थानिक आणि सुशिक्षीत उमेदवार म्हणून नव्या आपली दावेदारी सांगत आहेत. याचा निकाल आता महिनाभरात लागणार आहे. (Navya Haridas VS Priyanka Gandhi)
सई बने