लवकरच आदिमाया आदिशक्ती देवीचा उत्सव सुरु होत आहे. वर्षातले सर्वात महत्वाचे नऊ दिवस म्हणून शारदीय नवरात्राची ओळख आहे. शारदीय नवरात्र भारतात मोठ्या स्वरूपात साजरे केले जाते. खासकरून गुजरात, महाराष्ट्र, कोलकाता, उत्तर भारत या ठिकाणी या नवरात्रीचा उत्साह जास्तच पाहायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये या नवरात्रामध्ये घटस्थापना केली जाते. यावेळी जमिनीवर पत्रावळ ठेऊन त्यावर माती टाकून त्यावर कलश ठेवावा आणि त्यात नारळ ठेऊन घट बसवले जातात. यावेळी अखंड दिवा देखील लावला जातो. नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये देवीजवळ अखंड दिवा लावला जातो. (Navratri 2025)
अखंड दिवा हा जे लोकं घट बसवतात ते देखील लावतात किंवा ज्यांच्याकडे घट नसतात ते देखील अखंड दिवा लावतात. अखंड दिवा म्हणजे, नऊ दिवस देवीजवळील दिवा शांत होऊ द्यायचा नसतो. अखंड दिवा प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय पूजेची सुरुवात अपूर्ण मानली जाते. कलश स्थापनेनंतर पहिल्या दिवशी अखंड दिवा प्रज्वलित करावा. नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण ९ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते. कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यामागे देखील एक कारण आहे. या लेखातून आपण अखंड दिव्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
अखंड ज्योतीचे नियम
* नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती पेटवण्याचा नियम म्हणजे घरात कोणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे, त्यामुळे अखंड ज्योतीची काळजी घेतली जाते. अखंड ज्योती पेटवत असाल तर घर रिकामे ठेवू नका.
* अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नका, ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाट वापरा.
* पाटावर अखंड ज्योतीचा दिवा ठेवत असाल तर त्यावर लाल कपडा पसरवा. जर तुम्ही कलशाच्या वर ज्योत लावत असाल तर खाली गहू ठेवा.
* अखंड ज्योती दिव्यात पांढऱ्या वातीऐवजी लाल रंगाची वात वापरावी. (Latest Marathi News)
* तुपाची अखंड ज्योत असल्यास ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी. दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे.
* अखंड ज्योती वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे, तसेच दिव्यातील तूप व तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी गणेशाची, दुर्गा देवीची पूजा करावी. दुर्गा मंत्राचा जप करावा.
* अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता. (Top trending News)
* ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवांचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा पूर्व- दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वी कडे किंवा उत्तरेकडे असावं.
* काही कारणानं दिवा मालवला, तर देव्हाऱ्यातील दुसऱ्या दिव्यानं त्याला पुन्हा प्रज्ज्वलित करावं.
* अखंड तेवणारा दिवा हे देवीचं रूप असतं. अनेक घरांमध्ये दिव्यालाच घट समजून त्याची स्थापना केली जाते. त्यामुळे या काळात घर बंद करून जाऊ नये.
* दिवा ठेवण्याची जागा स्वच्छ व टापटिप असावी. घरातील शौचालय, बाथरूमजवळ घट स्थापन करू नये.
* नवरात्र संपल्यावर स्वतः दिवा कधीच विझवू नका, तर दिवा आपोआपच विझू द्या. (social News)
अखंड दिवा लावताना म्हणावयाचे मंत्र :
१) ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
=========
हे देखील वाचा :
Navratra : चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामधील नेमका फरक कोणता?
Ghatstahpana : घटस्थापनेचे शेतीच्या दृष्टीने देखील आहे आगळे वेगळे महत्व
==========
२) दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति जनार्दन:
दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नमोस्तुते
दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते
शुभ करोतु कल्याणामारोग्यं सुख संपदा
दुष्ट बुद्धि विनाशाय च दीपज्योति: नमोस्तुते
शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तु ते
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)