नवरात्र म्हटले की, विविध पूजा अर्चना ओघाने येतातच. शारदीय नवरात्र म्हणजे आदिशक्ती, आदिमायेचा जागर. नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस नऊ देवींची पूजा केली जाते. दुर्गा देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी नऊ अवतार घेऊन दसऱ्याच्या दिवशी या क्रूर राक्षसाचा अंत केला. नवरात्रातील नऊ दिवस देवींची पूजा करण्यासोबतच दररोज एक वेगळी परंपरा आणि रीत देखील पाळली जाते. अशीच एक नवरात्रातील अतिशय प्रसिद्ध आणि सर्वत्र पाळली जाणारी रीत म्हणजे, कन्या पूजन. (Navratri)
नवरात्रातील अष्टमी आणि नवमीच्या दिवशी सर्व घरांमध्ये कन्या पूजन केले जाते. नवरात्रातील महाष्टमी आणि महानवमीला मोठे महत्व आहे. या दोन्ही दिवशी कन्या पूजन करण्याला महत्व देण्यात आले आहे. यंदा देखील आता सर्वच लोकं येणाऱ्या कन्या पूजनाची तयारी सुरु केली असेल. यंदा हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४:३१ वाजता सुरू होईल आणि ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:०६ वाजता संपेल. त्यामुळे, महाअष्टमीचे व्रत आणि पूजन ३० सप्टेंबर, २०२५ रोजी केले जाईल. अष्टमी तिथी संपल्यानंतर लगेचच नवमी तिथी सुरू होईल, १ ऑक्टोबर रोजी रात्री ७:०१ वाजेपर्यंत असेल. त्यामुळे, महानवमीचे पूजन १ ऑक्टोबर, २०२५ रोजी केले जाईल. (Todays Marathi Headline)

कन्या पूजनाचे महत्व
देवी दुर्गाच्या या नवरात्रीला स्त्रीशक्तीला समर्पित करण्यात आले आहे. भारतीय परंपरेत स्त्रीचे महत्व सर्वात जास्त आहे. पुरुषांनाही जन्म देणारी स्त्रीच असते. त्यामुळे महिलांना शक्तीचे रुप मानले जाते. या नऊ दिवसांमध्ये जर आपण कन्यांचे पूजन केले तर देवी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. कन्या पूजनाचे नवरात्रीत अत्यंत महत्व आहे. कन्यांना देवीचे स्वरूप मानले जाते. त्या कन्यांचे पूजन करणे म्हणजे साक्षात देवीचे पूजन केल्यासमान पुण्य मिळते असे पुराणांमध्ये सांगितले आहे. याच कन्यांना देवीचे रूप मानून त्यांचे पूजन करून त्यांना साजशृंगार करण्याच्या वस्तू दिल्या जातात. या कन्यांना दक्षिणा दिली जाते आणि प्रसाद देखील खाऊ घातला जातो. (Marathi Latest Headline)
कन्या पूजन कसे करावे?
नवरात्रीत कन्यापूजन करताना तुम्ही किती कन्यांचे पूजन करू शकतात. मात्र शास्त्रोक्त पद्धतीत नऊ कन्यांचे पूजन करण्याची मान्यता आहे. या नऊ कन्या देवीची नऊ रूपे मानली जातात. त्यामुळे कन्यापूजनात नऊ कन्या असाव्यात. या सर्व मुली २ वर्षे ते १० वर्षांपर्यंत असाव्यात असे सांगितले जाते. नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजा केली जाते. मुलींना आरामदायक आणि स्वच्छ ठिकाणी बसवावे आणि त्यानंतर त्यांचे हात-पाय आपल्या हाताने धुवावे आणि त्यांचा नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. यानंतर कन्यांना कपाळावर अक्षत आणि कुंकु लावा. मग या कन्यांना पुरी, हलवा, चणा, खीर यांचे जेवण जेवू घालावे. त्यानांतर तुमच्या क्षमतेनुसार त्या मुलींना भेटवस्तू द्यावी. कन्या पूजेमध्ये मुलींला जेवण द्या. मुलाला बटुकचे प्रतीक मानले जाते. देवी पूजनानंतर भैरवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. (Top Trending News)
========
Navrtari : तिसरी माळ : नवदुर्गेचे तिसरे स्वरूप- श्री चंद्रघंटा देवी
========
कन्या पूजेमध्ये वयाचे विशेष महत्त्व
– दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचं पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं. (Top Marathi Headline)
– तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.
– चार वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.
– पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. जी रोगमुक्त ठेवते.
– सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.
– सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.
– आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.
– नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.
– दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
