Home » लष्करी कुटुंबात जन्मलेल्या, मॉडेलिंग-अभिनयापासून ते राजकारणापर्यंत…असा आहे नवनीत राणांचा प्रवास

लष्करी कुटुंबात जन्मलेल्या, मॉडेलिंग-अभिनयापासून ते राजकारणापर्यंत…असा आहे नवनीत राणांचा प्रवास

by Team Gajawaja
0 comment
Navneet Rana And Ravi Rana
Share

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि अपक्ष खासदार नवनीत राणा प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी सध्या मोठ्या अडचणीत अडकल्या आहेत. काल, रविवारी नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवि राणा यांना मुंबई न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान राणा दाम्पत्यांना चांगलंच महागात पडलं आहे. (Navneet Rana And Ravi Rana)

राणा दाम्पत्याने हे आव्हान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिक जमले. मोठ्या संख्येनं शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जमले होते. त्यामुळे दोघंही घराबाहेर पडू शकले नाहीत. पण त्यांनी दिलेलं आव्हान हे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करणारं असल्यामुळे दोघांना शनिवारी मुंबई पोलिसांनी घरात जाऊन ताब्यात घेतलं. त्यानंतर रविवारी, दुपारी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात राणा दाम्पत्यांना हजर करण्यात आलं. मुंबई न्यायालयानं ६ मेपर्यंत नवनीत राणा आणि रवि राणी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पण लगेच दोघांनी जामीन अर्ज दाखल केला. पण जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेण्यास वांद्रे न्यायालयानं नकार दिला. आता राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर २९ एप्रिलला सुनावणी होणार असून तोपर्यंत नवनीत राणांचा भायखळा कारागृहात आणि रवि राणांचा आर्थररोड कारागृहात मुक्काम असणार आहे. दरम्यान आज आपण यानिमित्ताने नवनीत राणांचा प्रवास आणि त्यांची रवि राणांसोबत भेट कशी झाली? हे जाणून घेऊयात. (Navneet Rana And Ravi Rana)

नवनीत कौर राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भाग घेतला होता. राजकारण पाऊल ठेवण्यापूर्वी नवनीत राणा तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. नवनीत राणा यांचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला होता. ३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईतील एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. नवनीत राणा यांनी १२वीनंतरचे शिक्षण सोडून मॉडलिंगमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी सहा म्युझिक व्हिडिओत काम केल्यानंतर चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होत. त्यांचा पहिला चित्रपट कन्नड भाषेतील असून त्या चित्रपटाचं नाव ‘दर्शन’ असं होत. त्यानंतर त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. येथे त्यांना सीनू वसंत लक्ष्मी, भूमा, टेरर, जगपतीसोबत बऱ्याच चित्रपटात काम करायला मिळालं. (Navneet Rana And Ravi Rana)

२००९ ते २०११ दरम्यान नवनीत यांची भेट रवि राणांसोबत झाली. बाबा रामदेवच्या मुंबईतील योग शिबिरमध्ये नवनीत आणि रवि राणांची भेट झाली. तेव्हा रवि राणा नवे-नवे आमदार होते आणि नवनीत राणा अभिनेत्री होत्या. मग दोघांची मैत्री झाली आणि काही काळानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात बदललं. २०११मध्ये दोघांनी साध्या पद्धतीनं लग्न केलं. माहितीनुसार, नवनीत आणि रवि राणा यांनी अमरावतीत ४१२० जोड्यांमध्ये सामूहिक पद्धतीनं लग्न उरकलं होत. या लग्नसोहळ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाबा रामदेव आणि अभिनेता विवेक ओबेरॉय उपस्थित होता. राणा दाम्पत्यानी आपल्या लग्न खर्चाच्या पैशांनी गरीबांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मग नवनीत यांनी रवि राणा यांच्यासोबत लग्न केल्यानंतर राजकारणातही नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आणि चित्रपटसृष्टीला रामराम केला. २०१४ साली त्यांनी अमरावतीच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाजूनं लोकसभा निवडणूक लढवली होती. येथून त्यांचं शिवसेनेसोबत वैर सुरू झाल्याचं म्हटलं जात. पण २०१४च्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या नाहीत. मग पुन्हा त्यांनी २०१९साली लोकसभा निवडणुकीत भाग घेतला आणि त्यावेळेस त्यांना यश प्राप्त झालं. २०१९मधील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांना हरवलं होत. (Navneet Rana And Ravi Rana)

======

हे देखील वाचा – नवी राजकीय खळबळ: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रात सक्रिय, वाढेल का ठाकरे सरकारचा त्रास?

======

२०२१मध्ये उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांना दोन लाखांचा दंड ठोठावला होता. त्यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यामध्ये त्यांनी आपली जात मोची असल्याचं सांगितलं होत, जे खोटं आहे. न्यायालयानं त्यांचं जात प्रमाणपत्रही रद्द केलं. माहितीनुसार, मुंबईत जॉईंट फॅमिलीमध्ये नवनीत राणा आणि रवि राणा राहतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नवनीत राणा यांना आठ भाषा बोलाता येतात. (Navneet Rana And Ravi Rana)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.