अतिशय जुन्या काळापासून भारतामध्ये ज्योतिषशास्त्र (Astrology) प्रचलित आहे. आकाशात असणारे ग्रह, तारे यांच्या बदलणाऱ्या स्थितीचा पृथ्वीवरील मनुष्याच्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे या शास्त्रामुळे आपल्याला समजते. या ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून मनुष्याबद्दलची भविष्यवाणी देखील केली जाते. अर्थात मनुष्याचा येणार काळ कसा आहे याचा अभ्यास करून तज्ज्ञ लोकं याबद्दल माहिती देतात. आपल्या हिंदू धर्मातील अतिशय प्राचीन शास्त्र म्हणून ज्योतिषशास्त्र ओळखले जाते. (Navpancham Yoga)
ज्योतिष्यावर कमी अधिक प्रमाणात सगळ्यांचाच विश्वास असतो. जर आपण पाहिले तर आकाशात असणारे ग्रह तारे सतत फिरत असतात. (काही अपवाद देखील आहेत) या ग्रह ताऱ्यांच्या फिरण्यामुळे अनेकदा विविध प्रकारचे योग बनतात आणि याचा मनुष्याच्या जीवनावर परिणाम होतो. प्रत्येक ग्रहाचा स्वभाव देखील मनुष्यावर परिणाम करत असतो. अनेकदा अवकाशामध्ये अतिशय रंजक, मोठ्या आणि ऐतिहासिक घटना घडत असतात. या घटनांचा आपल्या आयुष्यावर देखील होतो. (Top Stories)
ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि मंगळ हे दोन अतिशय महत्वाचे आणि मानवी आयुष्यावर परिणाम करणारे ग्रह मानले जातात. शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला क्रूर ग्रह मानले जाते, त्याच्या वक्रदृष्टीला सगळेच घाबरतात. परंतु शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनि ग्रहाचा स्वभाव सत्याचे अनुसरण करणारा आहे. तर ग्रहांचा सेनापती अशी ओळख असणारा मंगळ हा ग्रह, आत्मविश्वास, ऊर्जा, धैर्य हा व्यसनाचा घटक मानला जातो. (Social News)
आपल्या ज्योतिषशास्त्रात शनि आणि मंगळ हे ग्रह खूप महत्वाचे मानले जातात. जर या दोन्ही ग्रहांनी त्यांची स्थिती बदलली तर त्याचा आपल्या जीवनावर आणि काही विशिष्ट राशींवर किती मोठा परिणाम होऊ शकतो. आज ९ फेब्रुवारी रोजी अशीच महत्वाची घटना घडणार आहे. आज संध्याकाळी ६:३७ मिनिटांनी मंगळ आणि शनि एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या घरात म्हणजेच सुमारे १२० अंशांवर येणार आहे. त्यामुळे नवपंचम राजयोग तयार होत आहे. ही स्थिती विशिष्ट राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळवून देऊ शकते. (Daily Horoscope)
जेव्हा एकाच तत्वाच्या दोन राशी दोन ग्रहांमध्ये जाऊन १२० डिग्रीचा कोन तयार करतात, तेव्हा नवपंचम योग तयार होतो. या योगाचा परिणाम अनेक राशींवर पाहायला मिळतो. काहींना अचानक धनलाभ होतो, तर काहींचा सुवर्णकाळ सुरु होतो. आज होणाऱ्या या नवपंचम राजयोगाचा फायदा कोणत्या राशींना होणार आहे ते पाहूया. (Todays Marathi News)
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांना नवपंचम राजयोग लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी धार्मिक कार्यात सहभाग घ्या. कुंभ राशीच्या लोकांना या नवपंचम योगाचे त्यांच्या नोकरीवर चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. सट्टेबाजी आणि व्यापारासंबंधित व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. यासोबत आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर आहे. या राशीच्या लोकांना या योगामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळून कोणत्याही क्षेत्रात मोठे यश आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. समाजात असलेल्या सन्मानात वाढ होऊ शकते. याशिवाय या योगामुळे व्यवसायात, नोकरीत चांगला फायदा होत नफा मिळू शकतो. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे परंतु अनावश्यक खर्च टाळावा.
===============
हे देखील वाचा : Indonesia : इंडोनेशियातील मुरुगन मंदिरामुळे पाकिस्तानात संताप !
===============
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खास असणार आहे. या राशीच्या लोकांना कुटुंबाची आवश्यक तिथे साथ मिळून त्यांचा पाठिंबा मिळेल. तुमच्या करिअरमध्ये जाणवत असलेले दडपण याकाळात नकी होऊन तुम्हाला आराम मिळू शकतो. जोडीदारासोबत सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात.
(टीप – या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती योग्यच लागू होईल असे नाही.)