देशात प्रत्येक वर्षाला ३१ ऑक्टोंबरला ‘नॅशनल युनिटी डे’ (National Unity Day) साजरा केला जातो. भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि माजी गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जन्म झाला होता. यंदा सरदार वल्लभ भाई पटेल यांची १४६ वी जयंती आहे. खऱंतर सरदार वल्लभ भाई पटेल यांनी ५६५ राज्यांना भारत संघात एकत्रित करण्यासाठी फार मोलाचा वाटा उचलला होता. देश इंग्रजांच्या तावडीतून ५६५ राज्य ही स्वातंत्र्य झाल्यानंतर जवळजवळ सर्वच राज्यांना भारत संघात सहभागी करण्यासाठी मनवण्याचे काम त्यांनी केले होते. भारताी एकता कायम टिकून ठेवण्यासाठी सरदार पटेल यांनी अनेक मोलाची कामे देशासाठी केली आहेत.
नॅशनल युनिटी डे का साजरा केला जातो?
देशाची एकता कायम ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याने सरदार पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून सुद्धा ओळखले जाते. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या योगदानाचा सम्मान करण्यासाठी प्रत्येक वर्षी ३१ ऑक्टोंबरला विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारत सरकारने २०१४ मध्ये ३१ ऑक्टोंबरला सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जन्म हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जाईल असा निर्णय घेतला होता.
या दिवसाचे काय आहे महत्व?
नॅशनल युनिटी डे निमित्त सर्व शासकीय कार्यालयात शपथ घेतली जाते की, ‘मी पूर्ण निष्ठेने शपथ घेतो की देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा कायम ठेवण्यासाठी मी स्वत:ला समर्पित करत आहे.’ आणि या एकतेच्या भावनेने आपल्या सारख्या अन्य देशातील लोकांमध्ये एकत्रित होण्याचा प्रयत्न करेन. त्याचसोबत सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुद्धा देशाची एकता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यासंदर्भात काही निर्देशन सुद्धा जाहीर केली जातात. (National Unity Day)
तर सरदार पटेल यांनी भारताच्या संविधानाला आकार देण्याच्या कार्यात ही आपली महत्वाची भुमिका निभावली. त्यांनी २४ जानेवारी १९७ रोजी संविधानाद्वारे गठित करण्यात आलेल्या सल्लागार समितीचे नेतृत्व सुद्धा केले होते. समितिचे दायिक्त मौलिक आणि अल्पसंख्यांक अधिकारांवर एक अंतरिम रिपोर्ट सुद्धा त्यांनी तयार केला होता.
हे देखील वाचा- होमी भाभांचा अपघात झाला नसता तर भारताकडे असती हजारो परमाणू हत्यारे
सरदार पटेल यांना समर्पित स्टॅच्यू ऑफ युनिटी हा गुजरात मध्ये उभारण्यात आला आहे. हा स्टॅच्यू वडोदराजवळ साधु बेटापासून ३.२ किमी दूर नर्मदा बांधाजवळ आहे. हा जगातील सर्वाधिक उंच स्टॅच्यू असून जो वसंत मंदिर बुद्धापेत्रा ५४ मीटर अधिक उंचीचा आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ३१ ऑक्टोंबर २०१८ मध्ये करण्यात आले होते.