भारतात प्रत्येक वर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. देशातील मुली आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कोरत आहे. परंतु भारतातील अशा काही ठिकाणी अद्याप मुलींना जन्म देणे नकोसे वाटते. मुलगा-मुलीमध्ये ही भेदभाव केला जातो. मात्र देशातील सरकारने मुलींना प्राधान्य देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जात आहे. याच उद्देशाने राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली होती. देशातील मुलींना सशक्त बनवण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृकता वाढण्यासाठी हा खास दिवस आहे. (National Girl Child Day)
२४ जानेवारीलाच का साजरा केला जातो?
प्रत्येक वर्षी २४ जानेवारीला बालिका दिवस साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. तर भारतातील पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात याचे कारण आहे. वर्ष १९६६ मध्ये इंदिरा गांधींनी देशातील पहिल्या महिला पंतप्रधानांच्या रुपात शपथ घेतली होती.
भारताच्या इतिहासात आणि महिलांच्या सशक्तीकरणास्तव २४ जानेवारीचा दिवस फार महत्वपूर्ण आहे. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देष असा की, देशातील मुलींना त्यांच्या मुलभूत हक्कांच्या प्रति जागृक करणे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
समाजात मुलींसोबत होणाऱ्या भेदभावाबद्दल देशातील मुलींसोबत सर्व लोकांना जागृक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी देशात प्रत्येक वर्षी राज्य सरकार आपल्या देशात मुलींच्या प्रति जागृक कार्यक्रमांसंदर्भातील आयोजन करते.
दरम्यान, गेल्या वर्षात राष्ट्रीय बालिका दिवस आणि आझादी का अमृत मोहत्सवचे औचित्य साधत राष्ट्रीय बाल पुरस्कार आयोजित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांशी वर्च्युअली बातचीत केली होती. या व्यतिरिक्त विविध राज्याकडू काही राजकीय पक्ष हे बालिका दिवसाचे आयोजन करतात. जेणेकरुन मुलींबद्दल समाजात एक वेगळी ओळख निर्माण होईल.(National Girl Child Day )
यंदाच्या वर्षाची थीम
२०२१ मध्ये राष्ट्रीय बालिका दिवस ‘डिजिटल पीढी, आपली पिढी’ च्या थीमवर साजरा केला गेला. या व्यतिरिक्त वर्ष २०१९ मध्ये याची थीम ‘उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सशक्तीकरण’ आणि २०२३ मध्ये यासंदर्भातील थीमची घोषणा करण्यात आलेली नाही.
हे देखील वाचा- राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी कशा पद्धतीने निवडले जातात मुलं?
मुलींच्या हितासाठी प्रयत्न
देशभरात मुलींना समान हक्क मिळवून देण्यासाठी समाजात भारत सरकारकडून विविध योजनांची सुरुवात केली आहे. तर मुलींच्या हितासाठी सरकारद्वारे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चे आयोजन ही या अंतर्गत केले जाते. ही योजना सरकारने २२ जानेवारी २०१५ रोजी लॉन्च केली होती. भ्रुण हत्या, मुलींच्या जन्माबद्दलचा अंधविश्वास आणि मुलगा-मुली मध्ये फरक करणे असे विविध मुद्दे या दिवसाच्या माध्यमातून उचलले जातात.