Home » Narendra Mann : कोण आहेत, नरेंद्र मान ?

Narendra Mann : कोण आहेत, नरेंद्र मान ?

by Team Gajawaja
0 comment
Narendra Mann
Share

मुंबईतील 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे. तहव्वूर राणा याला लगेच फाशी द्यावी अशी मागणी कऱण्यात येत आहे. मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबियांनीही तहव्वूरला फासावर चढवा अशी मागणी केली आहे. देशभरातूनही तहव्वूरला अशाच पद्धतीनं ठार करुन त्याच्या कर्माची शिक्षा द्यावी ही मागणी वाढली आहे. मात्र तहव्वूर राणाला दोषी ठरवून त्याला शिक्षा देतांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यात अमेरिकेनं तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात सोपवतांना काही अटी लादल्या आहेत, या सर्वांचे पालन करत तहव्वूरनं केलेल्या अपराधासाठी त्याला कठोर शिक्षा देणे, हे या खटल्यात नेमलेल्या वकीलांच्या हातात आहे. भारतासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या खटल्यात तहव्वूर राणाच्या विरोधात आता भारत सरकारनं वरिष्ठ सरकारी वकील नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे. नरेंद्र मान आता दिल्लीतील एनआयए विशेष न्यायालये आणि अपीलीय न्यायालयांमध्ये एनआयएच्या वतीने बाजू मांडणार आहेत. (Narendra Mann)

26 नोव्हेंबर 2008 रोजी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. हा दहशतवादी हल्ला कोणीही विसरु शकणार नाही. पाकिस्तानमध्ये बसलेल्या अतिरेक्यांनी या हल्ल्यासाठी प्रशिक्षीत दहशतवादी भारतात पाठवले होते. मात्र या दहशतवाद्यांना मुंबईच्या कोप-यान कोप-याची माहिती देण्याचे काम कोणी केले असेल तर ते, तहव्वूर राणा या दहशतवाद्यानं. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असलेल्या तहव्वूर राणानेच पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मुंबईची सर्व माहिती पुरवली होती. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी 60 तास संपूर्ण देशाला दहशतीच्या वातावरणात ठेवलं होतं. (Latest News)

मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर हा हल्ला करण्यात आला. यात 166 नागरिकांचा जीव गेला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यातील अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकण्यात यश आलं. अजमल कसाबच्या झालेल्या चौकशीतून मुंबई हल्ल्यातील सूत्रधारांची मालिका पुढे आली. तसेच पाकिस्तानमध्ये चालत असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांचीही माहिती समजली. या कसाबला नोव्हेंबर 2012 मध्ये पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. मात्र त्यानंतरही या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला तहव्वूर राणा हा मोकाटच राहिला. पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून त्यानं काम केल्याची माहिती आहे, त्यामुळे त्याला डॉक्टर या टोपणनावानं ओळखले जाते. (Narendra Mann)

त्यानंच मुंबईतील प्रमुख स्थानांची रेकी केली होती. या राणाला काही वर्ष भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न चालू होते. अमेरिकेच्या तुरुंगात असलेल्या राणानं भारतात न येण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले, पण त्याला अमेरिकन न्यायालयानं भारताच्या ताब्यात दिले. मात्र या सर्वात तहव्वूर राणाला शिक्षा देतांना अमेरिकन न्यायालयानं आखून दिलेल्या नियमांचेही पालन करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत वरिष्ठ वकील नरेंद्र मान यांची या खटल्यात सरकारी वकिल म्हणून झालेली नियुक्ती विशेष ठरणार आहे. ज्येष्ठ वकील असलेले नरेंद्र मान दिल्लीतील एनआयए विशेष न्यायालये आणि अपीलीय न्यायालयांमध्ये एनआयएच्या वतीने बाजू मांडतील. त्यांची नियुक्ती 10 एप्रिल 2025 पासून सुरू होईल. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहेत. या कालावधीपूर्वी कारवाई पूर्ण झाली तर त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार आहे. (Latest News)

=========

हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये

Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !

==========

नरेंद्र मान यांनी यापूर्वी सीबीआयसाठी विशेष सरकारी वकील म्हणून अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणे हाताळली आहेत. 2018 मध्ये झालेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन पेपर लीक प्रकरणाचाही समावेश आहे. वकील नरेंद्र मान हे गेल्या 35 वर्षांपासून दिल्ली उच्च न्यायालयात वकीली करत आहेत. गेली 10 वर्षे सीबीआयचे विशेष सरकारी वकील देखील आहेत. मेडिकल कौन्सिल घोटाळा, एआयसीटीई घोटाळा, सीजीएचएस सोसायटी घोटाळा इत्यादी प्रमुख खटल्यात त्यांनी सीबीआयची बाजू मांडली आहे. याशिवाय, त्यांनी CWG प्रकरणे, FCRA अंतर्गत प्रकरणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरणे, बँकिंग फसवणूक आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दिल्लीतील हौज खास येथे राहणारे नरेंद्र मान यांनी दिल्लीतील किरोरीमल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली असून दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे. (Narendra Mann)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.