पहिली अंघोळ म्हणजे अभ्यंगस्नान आणि हे अभ्यंगस्नान नरक चतुर्दशी दिवशी केले जाते. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला होता. त्यामुळे पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून प्रतिकात्मक नरकासूराचा वध करून हा दिवस साजरा केला जातो. याच दिवसाला छोटी दिवाळी म्हणून देखील ओळखले जाते. यंदा छोटी दिवाळी अर्थात नरकचतुर्दशी २० ऑक्टोबर सोमवार रोजी असणार आहे. यादिवशी पहाटे उठून उटणे आणि सुगंधी तेल लावून स्नान करण्यात येतं. त्यानंतर फटाके फोडून फराळ केला जातो. यादिवशी मंदिरात जाण्याची परंपरा देखील आहे. यादिवशी रात्री दिवे लावून पूजा केली जाते. (Narak Chaturdashi)
नरक चतुर्दशीच्या दिवशी ‘अभ्यंगस्नान’ केले जाते. दिवाळीचे दिवस हे थंडीचे दिवस असल्याने किंवा याच काळात थंडीची सुरुवात होत असल्याने आपल्या शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळेच दिवाळीत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ झाल्यानंतर फराळाचा आशावाद घेतला जातो. नरक चतुर्दशीला नरक चौदस, रूप चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दक्षिण दिशेला यमाच्या नावाचा दिवाही लावला जातो. या दिवशी जर आपण काही छोटे उपाय केले तर नक्कीच त्याचा आपल्या आयुष्यामध्ये फायदा होऊ शकतो. मग नरक चतुर्दशीला जीवनातील संकटं, दुःख दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे पाहूया. (Diwali)
* सकाळी सूर्योदयापूर्वी उठून तीळ-तंडूळ, उत्कटारा आणि तेलाने अभ्यंग स्नान करावे. याला “नरक निवारण स्नान” असेही म्हणतात. यामुळे नरकाचे भय दूर होते आणि पापांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. स्नानापूर्वी शरीरावर तेल आणि उटणे लावून मालिश करावी आणि नंतर कोमट पाण्याने स्नान करावे. (Marathi News)
* छोटी दिवाळीच्या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते. या दिवशी घरात सर्वत्र दिवे लावावेत. यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहून प्रार्थना करा. असे केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमाचा दिवा लावला जातो. असा समज आहे की, मोठा दिवा लावा आणि तो संपूर्ण घरामध्ये फिरवत रहा, असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो. (Todays Marathi Headline)
* वाल्मिकींच्या रामायणानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मंगळवारी हनुमानजींचा जन्म झाला होता. छोट्या दिवाळीचा दिवस म्हणजेच नरक चौदस हा हनुमानाच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. हनुमानजी हे संकटनिवारक आहेत आणि ते सर्व प्रकारच्या समस्या दूर करतात. (Marathi Headline)
* नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून; मोक्ष दिला होता, म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असेही म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. यासोबतच गायींची सेवा करून त्यांना हिरवा चारा खायला द्या आणि आशीर्वाद घ्या, असे केल्याने धन-समृद्धी आणि देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. (Top Marathi Headline)
* या दिवशी सर्व देवतांची पूजा करावी आणि त्यांच्यासोबत पितरांच्या नावाने दिवा लावावा, असे केल्याने दिव्याचा प्रकाश पितरांपर्यंत पोहोचतो आणि ते प्रसन्न होतात असे मानले जाते. पितरांच्या प्रसन्नतेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. (Marathi News)
* नरकचतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी चार बाजू असलेला म्हणजेच चौमुखी मातीचा दिवा घ्या. त्यात मोहरीचे तेल ठेवा आणि चार वेगवेगळ्या दिशांना तोंड करून चार वाती ठेवा. हा दिवा घराबाहेर, मुख्य प्रवेशद्वाराजवळ, दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावा. दक्षिण दिशा यमराजाचे निवासस्थान मानली जाते. (Trending Headline)
* नरक चतुर्दशीच्या रात्री १४ वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावणे शुभ मानले जाते. यम दिव्याव्यतिरिक्त, तुम्ही मंदिर, स्वयंपाकघर, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी, तुळशीच्या रोपाजवळ, मुख्य प्रवेशद्वाराजवळ, गच्चीवर दिवे लावू शकता. (Top Marathi News)
* आर्थिक विवंचना कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी या छोट्या दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या ११ पानांवर श्रीरामाचे नाव लिहून त्याचा हार बनवून हनुमानाला हार घालावा. तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील. याशिवाय, व्यवसायात लाभासाठी हनुमानजींना नारंगी रंगाचा लंगोट अर्पण करा . (Latest Marathi Headline)
========
Naraka Chaturdashi : ‘छोटी दिवाळी’ अशी ओळख असणाऱ्या नरकचतुर्दशीचे महत्व
Diwali 2025: दिवाळीचे ५ दिवस प्रत्येक दिवस सांगतो शुभत्व, प्रेम आणि नव्या सुरुवातीचा अर्थ!
* नरक चतुर्दशीच्या दिवशी दान करण्याला मोठे महत्व आहे. या दिवशी ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना पूर्ण भोजन दान करावे. यामुळे पूर्वजांना नरकातून मुक्ती मिळते. याशिवाय या दिवशी वस्त्र दान, फळं दान, धान्य दान देखील करणे लाभदायक असते. (Top Trending News)
* अभ्यंग स्नान सूर्योदयापूर्वी करणे आवश्यक आहे. नरक चतुर्दशीला उशिरा स्नान करणे शुभ मानले जात नाही. या दिवशी घरात अंधार ठेवू नये. सर्वत्र दिवे लावावेत, कारण अंधार नकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करतो. (social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics