नाना पाटेकर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठे आणि नावाजलेले नाव. नाना यांनी हिंदीमध्ये काम करताना आपल्या अनोख्या स्टाईलने आणि अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केले. अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करून नाना यांनी मोठा नावलौकिक कमावला. कॉमेडी, ड्रामा, ऍक्शन आदी सर्वच जॉनरमध्ये त्यांनी धमाकेदार काम केले. (nana patekar reacts on actress tanushree dutta allegations)
नाना यांच्या संपूर्ण करियरमध्ये त्यांनी अनेक चांगले वाईट अनुभव घेतले. मात्र या सर्वच गोष्टींमध्ये आणि त्यांच्या करियरमध्ये सर्वात जास्त गाजलेली एक घटना म्हणजे अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्यांच्यावर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप. हे आरोप तिने केल्यानंतर सगळीकडे एकच गोंधळ झाला. या आरोपानंतर अनेकांनी तिला पाठिंबा दिला तर काहींनी नाना यांना साथ दिली. मात्र या आरोपानंतर नाना यांच्याकडून काहीच याबद्दल मत आले नाही. त्यांची बाजू जाणून घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण यावर ते काहीच बोलले नाही.
हे देखील वाचा : जेव्हा अमृता रावने शाहीदच्या कानाखाली मारली होती… वाचा संपूर्ण किस्सा
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नाना यांनी या संपूर्ण घटनेवर, आरोपांवर त्यांचे मत मांडले आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अतिशय थोडक्यात मात्र त्यांची बाजू जगासमोर आणली. तनुश्रीने नाना यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करताना सांगितले की, २००८ मध्ये आलेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ हा चित्रपट आला होता. त्या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगच्या वेळेस नाना यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले.
हे देखील वाचा : पंचायत वेब सीरिजमधील कलाकार आसिफ खानला सैफ अली खान आणि करिना कपूरच्या लग्नात एण्ट्री देण्यात आली नव्हती. यामागील कारण कलाकारने एका पॉडकास्टमध्ये सांगितले आहे.
मी टू चळवळीच्या अंतर्गत तनुश्रीने नाना यांच्यावर एवढा मोठा आरोप केला आणि सगळीकडे एकच खळबळ झाली. मात्र आता नाना यांनी या आरोपांवर त्यांची बाजू मांडत हे सर्व आरोप नाकारले. नाना यांनी या आरोपांवर सांगितले, “मला या आरोपांचा राग आला नाही कारण मला माहित होते आणि आहे की, हे सर्व आरोप खोटे आहेत. त्यामुळे मला या आरोपांचा काही फरक पडला नाही. असे काही घडलेच नव्हते. जर असे काही झाले असते तर कोणी ना कोणी काही बोललेच असते. असे अचानक कोणी काही आरोप लावले मी असे केले . पण मी काही केले नाही एवढेच मी सांगेल.”
नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताचे आरोप नाकारल्यानंतर तनुश्रीने यावर प्रतिक्रिया देताना नाना यांना एकेरी बोलत, “आज त्यांना बॉलीवूडमधून पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्ये घट झाली असून ते आता घाबरले आहेत. त्यांना पाठिंबा दिलेले काही लोकं आता एका बाजूला झाले तर काही दिवाळखोर झाले आहेत. नानांच्या बोलण्यावर लोकं लगेच आणि डोळे बंद करून विश्वास ठेवतात. याचा फायदा घेत त्यांनी आता पुन्हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.”