नखं खाण्याची सवय अशी आहे जी लगेच सुटत नाही. खरंतर ही सवय आपल्या आरोग्यासाठी नुकसान पोहचवते. त्यामुळे याचा परिणाम आपल्या आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावर ही होतो. नेल बाइटिंगची समस्या ही लहान मुलं ते वयस्कर व्यक्तींमध्ये दिसून येते. (Nail Biting Habit)
ही समस्या ३ ते २१ वर्षातील लोकांमध्ये खुप दिसते. नाखं खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण असे केल्याने नखांद्वारे बॅक्टेरिया आपल्या तोंडातून पोटात जातात. अशातच काही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ऐवढेच नव्हे तर ही सवय आपला सेल्फ कॉन्फिडंन्सवर ही परिणाम करते.
भले नेल बाइटिंगची ही सवय सामान्य वाटते पण यामागे काही कारणे असू शकतात. जर एखादा व्यक्ती स्ट्रेस किंवा एंग्जायटी सारख्या समस्येचा सामना करत असेल तर त्याचे शरीर रिअॅक्शनच्या रुपात नेल बाइटिंगसारख्या समस्येची सवय लागली जाते. कोणत्याही स्ट्रेसफुल स्थितीत लोक नखं खातात. अशातच गरजेचे आहे की, ही सवय लवकरात लवकर मोडली पाहिजे.
नेल बाइटिंगची ही समस्या एक चिंतेचा विषय आहे. कारण यामध्ये केवळ बॅक्टेरियाच नव्हे तर फंगस आणि व्हायरस सारखे इंन्फेक्शन होण्यासह नखं, क्युटिकल्सजवळील त्वचा ही खराब होते. कधीकधी नेल बाइटिंग अधिक केल्याने नखांमधून रक्त सुद्धा येऊ शकते.आजूबाजूचा हिस्स्याला सूज येऊ शकते.
नेल बाइटिंगच्या समस्येमुळे नख आणि दातांना नुकसान पोहचण्यासह आपल्या शरीरात बॅक्टेरियल आणि फंगल इंन्फेक्शन सुद्धा होऊ शकते. ऐवढेच नव्हे तर अधिक नेल बाइटिंगमुळे नखांच्या आजूबाजूच्या त्वचेला सूज येऊ शकते. साल्मोनेला सारखे आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया दातात तयार होऊ शकतात. अशातच जेव्हा तुम्ही नखं खाता तेव्हा हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जाऊन तुम्हाला गॅस्ट्रोइंस्टेलाइनल सारख्या गंभीर आजारांचा सामना करण्यास भाग पाडतात. जी लोक दररोज नखं खातात त्यांच्यामध्ये पेरोनिसिया होण्याचा धोका वाढला जातो. (Nail Biting Habit)
नेल बाइटिंगमुळे होणारे अन्य नुकसान
-यामुळे हिरड्या कमजोर आणि इंफेक्टेड होऊ शकतात
-नखं खाल्ल्याने नेल्सचे टिश्यू खराब होऊ लागतात. त्यामुळे नखांची वाढ मंदावते
-नेल बाइटिंगच्या कारणास्तव बॅक्टेरियल आणि फंगल इंन्फेक्शनचा धोका वाढतो
-नखंच नव्हे तर दात ही डॅमेज होतात
-ही सवय व्यक्तीला आजारी पाडू शकते