Home » कोरोना नंतर आता Brain Eating Amoeba वाढवली चिंता, दक्षिण कोरियात आढळला पहिला रुग्ण

कोरोना नंतर आता Brain Eating Amoeba वाढवली चिंता, दक्षिण कोरियात आढळला पहिला रुग्ण

by Team Gajawaja
0 comment
Naegleria fowleri
Share

चीन मध्ये कोरोनामुळे स्थिती भयंकर झाली असून दिवसागणिक हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. अशातच कोरोनाचे आणखी नवे वेरियंट समोर आल्याने अधिक भीती व्यक्त केली जात आहे. अशातच आता दक्षिण कोरियात अत्यंत धोकादायक आणि जीवघेण्या आजाराने एन्ट्री केली आहे. हा आजार कोणत्याही व्यक्तीच्या मेंदूला संक्रमित करु शकतो आणि यामुळे मृत्यू ही होण्याची शक्यता आहे. नेग्लरिया फाउलेरी नावाच्या अमीबाच्या कारणास्तव होणाऱ्या या आजाराला ब्रेन-इटिंग अमीबा असे म्हटले जात आहे. हा अमीबा व्यक्तीच्या मेंदूला संक्रमित करतो. या आजारावर कोणतीही लस नाही आणि तो अत्यंत भयंकर आहे. (Naegleria fowleri)

नेग्लरिया फाउलेरी नक्की काय आहे?
नेग्लरिया फाउलेरीचा पहिला रुग्ण अमेरिकेत १९३७ रोजी समोर आला होता. तर जसे आपण पाहिले की, तो गरम गोड पाण्यात आढळतो आणि पाण्याच्या माध्यमातून व्यक्तीच्या शरिरात जातो. मात्र शरिरात गेल्यानंतर तो अमीबा ब्रेन टिश्यू नष्ट करतो. सोप्प्या शब्दांत बोलायचे झाल्यास तो व्यक्तीच्या मेंदूला आतमधून खातो. दरम्यान, जगात २०१८ मध्ये या संक्रमणाचे एकूण ८३१ प्रकरणे समोर आली होती. त्यामध्ये अमेरिका, भारत आणि थायलंडचा समावेश होता.

किती भयंकर आहे हा आजार
हा आजार अत्यंत भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियात या आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू ही झाला आहे. प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफालाइटिस आजाराच्या कारणास्तव मृत्यू झाला आहे तो नेग्लरिया फाउलेरी नावाच्या ब्रेन-इटिंग अमीबामुळे फैलावतो. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हा आजार पाण्याच्या माध्यमातून फैलावतो. आजाराच्या सुरुवातीला त्याबद्दल कळणे थोडे कठीण आहे. कारण तो वेगाने पसरतो आणि याबद्दल मृत्यूनंतरच कळते.

याच्या पहिल्या टप्प्यात डोक्याच्या पुढील बाजूस भयंकर दुखणे, ताप, मळमळ वाटणे किंवा उलटी होणे असे होऊ शकते. तर दुसऱ्या टप्प्यात मान आकडणे, झटका येणे, मानसिक रुपात असंतुलन आणि हेलुसिनेशन्स सारकी लक्षणं असतात. गंभीर प्रकरणांमध्ये रुग्ण कोमात ही जाऊ शकतो.(Naegleria fowleri)

हे देखील वाचा- चीन मध्ये आढळलेला BF7 किती धोकादायक, काय आहेत लक्षणं? भारतात ही आढळली प्रकरणे

कसा परसतो हा आजार?
हा आजार एका अमीबाच्या कारणास्तव पसरतो. हा मुख्य रुपात माती व्यतिरक्त झरे, नद्या किंवा तलावा सारख्या गरम गोड पाण्याच्या स्रोतात आढळून येतो. पाणाच्या माध्यमातून तो अमीबा कोणत्या ही व्यक्तीच्या शरिरात पोहचतो. या आजाराच्या कारणास्तव आतापर्यंत ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.