जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांच्या आत अनेक रहस्ये लपलेली आहेत. काही रहस्यांवर संशोधन सुरू आहे, तर काही रहस्ये अजूनही न सुटलेली कोडी आहेत. अशा विचित्र गोष्टी या जगात घडतात, ज्याबद्दल मानवाला जास्त काही माहीतही नाहीये. अशीच एक जागा आहे, जिथे जन्मानंतर लगेचच मुलांचे डोळे जातात, म्हणजेच ते आंधळे होतात. विशेष म्हणजे हे फक्त माणसांच्या मुलांसोबतच नाही, तर प्राण्यांच्या पिल्लांसोबतही घडतं. (Blind Village)
हे ठिकाण मेक्सिकोमध्ये आहे. इथल्या एका गावात माणसापासून प्राण्यांपर्यंतची मुले जन्माला आल्यानंतर अंध होतात. या गूढ गावाबद्दल ज्याला माहिती मिळते, तो हे ऐकून दंग राहतो.
मेक्सिकोच्या या गावात मुलं तर ठीक जन्माला येतात, पण जन्मानंतर काही दिवसांनी त्यांची दृष्टी जाते. या गावाला अंधांचे गाव असेही म्हणतात. या विचित्र आजारामुळे किंवा शापामुळे हे गाव प्रसिद्ध झाले आहे. ज्याला या गावाची माहिती मिळते तो थक्क होतो. (Blind Village)
टिल्टेपक गावाचे रहस्य
मेक्सिकोमध्ये असलेले टिल्टपेक गाव लोकांसाठी एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाहीये. याचे कारण म्हणजे, मुलांची दृष्टी जाणे. अंधांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात माणसांपासून ते प्राणीही अंध आहेत. (Blind Village)
जगातील हे एकमेव गाव आहे, जिथे फक्त अंध लोक राहतात. या गावात झेपोटेक जमातीचे लोक राहतात. येथे जन्माला आल्यावर मुलाचे डोळे ठीक असतात, पण कालांतराने त्यांच्या डोळ्यांचे तेज निघून जाते. अशा प्रकारे गावात राहणारे सर्व लोक आंधळे आहेत. (Blind Village)
‘यामुळे’ जातात डोळे
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, त्यांची दृष्टी गेल्याचे कारण या भागातील झाड आहे. या भागातील झाडाला ग्रामस्थ त्यांच्या अंधत्वाचे कारण मानतात. गावात एक शापित वृक्ष असल्याची स्थानिक लोकांची मान्यता आहे. अनेक वर्षांपासून हे झाड या गावात आहे. (Blind Village)
लोक या झाडाला शाप पसरण्याचे कारण मानतात. ते म्हणतात की, हे झाड पाहताच लोक आंधळे होतात. मात्र काही लोक या गोष्टीला फक्त अंधश्रद्धा मानतात आणि म्हणतात की, यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असावे, जे त्यांना माहित नाही.
काय म्हणतात तज्ज्ञ?
तज्ज्ञांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, या गावात विषारी माश्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या माश्या लोकांना चावतात आणि त्यामुळे ते आंधळे होतात. (Blind Village)
हे देखील वाचा: निराळी रेल्वे ट्रॅक! जिथे रुळाच्या वरून नाही, तर खालून धावते ट्रेन
जेव्हा मेक्सिकन सरकारला या गावाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. सरकारने लोकांना इतरत्र स्थायिक करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचे शरीर इतर हवामानाशी जुळवून घेऊ शकले नाही. यामुळेच सरकारला गावकऱ्यांना त्यांच्या हालतवर सोडावे लागले.