Home » Elon Musk : मस्क, आयव्हीएफ आणि वाद !

Elon Musk : मस्क, आयव्हीएफ आणि वाद !

by Team Gajawaja
0 comment
Elon Musk
Share

टेस्लाचे सर्वेसर्वा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलॉन मस्क यांना नुकताच 14 वा मुलगा झाला आहे. मस्क यांची मैत्रिण शिवोन गिलिस यांच्यापासून हा मुलगा झाला असून मस्क आणि शिवोन या दोघांना यापूर्वी तीन मुले आहेत. या 14 व्या मुलाचे नाव मस्क यांनी सेल्डन लायकुर्गस ठेवले आहे. सेल्डन व्यतिरक्त मस्क यांना 13 मुलं आहेत. एलॉन मस्क यांना त्यांची पहिली पत्नी जस्टिन विल्सनपासून सहा मुले आहेत. त्यापैकी एकाचे बालपणात निधन झाले आहे. तर आणि संगीतकार ग्रिम्सपासून त्यांना तीन मुले आहेत. मस्क यांच्या 14 मुलांपैकी एक मुलगी त्यांच्यापासून वेगळी रहाते. तिचे नाव विवियन जेना विल्सनच्या आहे. 2004 मध्ये जन्म झालेली विवियन जेन विल्सन ही एलॉन मस्क यांची बंडखोर मुलगी समजली जाते. (Elon Musk)

कारण याच विवियननं आपले लिंग बदलले आहे. विवियन ही मुलगा होती आणि अलेक्झांडर असे त्याचे नाव होते. अलेक्झांडरची विवियन झाल्यापासून मस्क सोबत तिचा उभा दावा आहे. मस्क यांचा ट्रान्सजेंडर यांना असलेला विरोध विवियनमुळेच असल्याची माहिती आहे. अमेरिकेत अल्पवयीन मुलं आणि मुलींना ही ट्रान्सजेंडर सोसायटी आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लिंग बदलत असल्याचा आरोप एलॉन मस्क यांनी केला होता. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर बाबत कडक धोरण स्विकारण्याचे आश्वासहन त्यांना दिले. याच आश्वासनामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना एकेकाळी विरोध करणारे एलॉन मस्क त्यांचे पक्के समर्थक झाले आहेत. मात्र आता एलॉन मस्क यांची ट्रान्सजेंडर मुलगी, आपल्या पित्यावर जाहीरपणे टिका करत आहे. त्याला निमित्त ठरला आहे, तो मस्क यांचा 14 वा मुलगा. (International News)

अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यावर ट्रान्सजेंडर मुलीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. विवियन जेना विल्सन हिने आपल्या वडिलांना फक्त मुलंच हवी आहेत. त्यासाठी ते आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत, होणा-या मुलाचे लिंग आधीच ठरवत असल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वीही विवियननं आपल्या वडिलांवर आरोप केले आहेत. तसेच मस्क यांच्या स्वभावामुळेच आपण मुलापासून मुलगी होणे स्विकारल्याचे विवियननं सांगितले आहे. आत्तापर्यंत मस्क यांना जन्माला आलेली सर्व मुले ही आयव्हीएफ तंत्रज्ञानानं आल्याचेही विवयनचे म्हणणे आहे. अमेरिकेत, आयव्हीएफ दरम्यान मुलाचे लिंग निवडणे कायदेशीर आहे. मात्र ही निवड करणे म्हणजे, जन्माला येणा-या मुलावर अन्याय करण्यासारखे असल्याचे ती सांगते. (Elon Musk)

विवियन आणि एलॉन मस्क यांचे संबंध गेल्या दोन वर्षापासून तुटले आहेत. विवियनला मस्क यांनी आपल्या संपत्तीपासूनही दूर केल्याचे जाहीर केले आहे. मस्क यांना अमेरिकन सरकारमध्ये मिळालेले स्थान पाहून विवियननं अमेरिका सोडण्याचा निर्णयही जाहीर केला होता. 20 वर्षांची मस्क यांची ही मुलगी अनेकवेळा सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करते. विवियननं एप्रिल 2022 मध्ये लॉस एंजेलिस काउंटी सुपीरियर कोर्टात कायदेशीररित्या नाव आणि लिंग बदलण्यासाठी याचिका दाखल केली होती. याबाबत विवियन हिनं एक मुलाखतही दिली होती. त्यात वय वर्ष 16 पासून मस्क आणि आपल्या विचारात तफावत झाल्याचे सांगितले होते. मस्क तिचा बालपणापासून तिरस्कार करायचे, त्यामुळेच लिंग बदलण्याचा निर्णय घेतल्याचे तिनं सांगितले आहे. मस्क यांनी विवियनला प्युबर्टी ब्लॉकर्स आणि हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरु करण्यासाठी नाईलाजानं परवानगी दिल्याचेही तिनं स्पष्ट केलं होतं. (International News)

=============

हे देखील वाचा : Syria : महिलांची नग्न मिरवणूक सिरियात परिस्थिती बिकट !

B.R. shetty : ज्यांनी १८ हजार कोटींची कंपनी ७४ रुपयांना विकली

=============

एलॉन मस्क यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आत्महत्या करणार, ही धमकी देत माझ्याकडून काही अर्ज मंजूर करुन घेण्यात आले. अन्यथा मी माझ्या मुलाला लिंग बदलण्यासाठी कधीही परवानगी दिली नसती, असेही मस्क यांनी जाहीर मुलाखतीमध्ये सांगितले आहे. पण विवियन या सर्वांसाठी आपले वडिल एलॉन मस्क यांना कारणीभूत ठरवते. आपले वडिल हे कधीच चांगले पालक नव्हते. ते कायम रागवणारे, आणि धाक दाखवणारे होते. माझ्यावर त्यांनी कायम अत्याचार केला आहे. माझ्यातील स्त्रीत्वाच्या भावनेचा त्यांनी अनादर केल्याचाही आरोप विवियननं केला आहे. आता हिच विवियन मस्क यांच्यावर मुलं होण्यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वावर केल्याचा आरोप करीत आहे. (Elon Musk)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.