Muscle Pain Reasons : आपल्या सर्वांना हेल्दी आणि फिट राहण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. वर्कआउटच्या मदतीने आपण अतिरिक्त कॅलरीजच नव्हे तर अधिक अॅक्टिव्हही राहतो. सर्वसामान्यपणे, आपण आपल्या वर्कआउट रुटीनमध्ये काही कार्डिओ ते स्ट्रेन्थ ट्रेनिंग करतो. पण काही वेळेस वर्कआउटनंतर मसल्स दुखण्यास सुरुवात होते.
ज्यावेळेस आपण फिजिकल अॅक्टिव्हिटी करतो खासकरुन ज्यामध्ये एक्सेन्ट्रिक मसल्स कन्ट्रॅक्शन होते. यावेळी मसल्स फायबर थोडे डॅमेज होऊ शकतात. ही स्थिती निर्माण झाल्यास डॅमेजच्या कारणास्तव मसल्समध्ये इन्फ्लेमेशन ट्रिगर होते. अशातच मसल्स दुखणे नव्हे तर स्टिफनेसची समस्याही निर्माण होते.
डिहाइड्रेशन
बहुतांशवेळा डिहाइड्रेशनच्या कारणास्तव मसल्समध्ये दुखण्यास सुरुवात होते. खरंतर जेव्हा शरिरात हाइड्रेशन व्यवस्थितीत होत नाही त्यावेळेस मसल्स फंक्शन आणि रिकव्हरीवर नकारात्मक परिणाम होतो. अशातच व्यायामानंतर मसल्स दुखण्यास सुरुवात होऊ शकते.
मसल्स थकणे
तुम्ही गरजेपेक्षा अधिक व्यायाम केल्यास तुमचे मसल्स थकतात. जेव्हा मसल्स थकतात तेव्हा त्यामध्ये दुखणे सुरु होते. कधीकधी आपण वर्कआउट दरम्यान पुरेसा आराम न मिळाल्याने किंवा मसल्सच्या रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यानेही मसल्स थकतात. याशिवाय ओव्हरट्रेनिंगचा धोकाही निर्माण होतो. (Muscle Pain Reasons)
इंटेस वर्कआउट करणे
आपण कधीकधी नवी एक्सरसाइज करतो किंवा इंटेस वर्कआउट करतो, त्यावेळी इंटेसिटी वाढल्याने मसल्स दुखण्यास सुरुवात होते.
वार्मअप न करणे
काहीजण वर्कआउट करतात पण त्यावेळी पोश्चर चुकीचे ठेवतात. याशिवाय काही वर्कआउट आधी वार्मअप करणे किंवा व्यायामानंतर स्ट्रेचिंग न केल्यानेही मसल्स दुखण्यास सुरुवात होऊ शकते.