मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: महापौर पेडणेकर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावं असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं.
“मी कोविड अँटीजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली, कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन”, असं ट्वीट किशोरी पेडणेकर यांनी केलं.
मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन pic.twitter.com/ayW43cXGrj