Home » भारतातील सर्वाधिक महागडी डील, २५२ कोटींना विक्री झाला मुंबईतील ट्रिपलेक्स फ्लॅट

भारतातील सर्वाधिक महागडी डील, २५२ कोटींना विक्री झाला मुंबईतील ट्रिपलेक्स फ्लॅट

by Team Gajawaja
0 comment
Mumbai biggest flat deal
Share

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घर खरेदी करण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. त्यामुळेच मुंबईतील आलिशान आयुष्य जगण्यासाठी धडपड केली जाते. मुंबई शहरात एकापेक्षा एक दमदार महागड्या डील्सबद्दल आपण यापूर्वी सुद्धा ऐकले असेल. जेथे करोडो रुपयांचा खर्च करत आलिशान फ्लॅट खरेदी केले जातात. अशातच आता मुंबईत २५२ कोटी रुपयांमध्ये एका ट्रिपलेक्स फ्लॅटची विक्री झाली. हा फ्लॅट दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील इमारतीत आहे. हा फ्लॅट १८ हजार स्क्वेअर फूट एरियाचा आहे. (Mumbai biggest flat deal)

रियल इस्टेटच्या सुत्रांनुसार ही डील उद्योगपती नीरज बजाज आणि मेक्रोटेक डेवलपर्स (लोढा ग्रुप) यांच्यामध्ये झाली आहे. आजच्या तारखेला भारतातील ही सर्वाधिक महागडी डील आहे. गेल्या महिन्यात मुंबईतील वरळी परिसरात ३० हजार स्क्वेअर फुट एरियाचे पेंटहाउस उद्योगपति बी.के. गोयंका यांनी खरेदी केला होता. गोयंका वेलस्पन ग्रुपचे चेअरमन आहे. त्यांनी हे पेंटाहाउस २४० कोटी रुपयांना खरेदी केले होते. तेव्हा ही देशातील सर्वाधिक मोठी डील असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, एका महिन्यानंतरच मुंबईत बजाज आणि लोढा ग्रुपने सर्वाधिक मोठी डील केली. पेंटहाउसची फेब्रुवारी महिन्यात डील एका तयार इमारतीत झाली होती. तर मार्च महिन्यात झालेली डील ही एका अंडर कंस्ट्रक्सन इमारतीत झाली आहे. त्याचे काम नुकतेच सुरु झाले आहे.

बजाज ग्रुपचे डायरेक्टर लोढा मालाबार टॉवरचे टॉप तीन फ्लोर बुक केले आहेत. ही इमारत राजभवनाजवळ आहे. या फ्लॅटची किंमत प्रति स्क्वेअर फूटच्या हिशोबाने १.४ लाख रुपये आहे. यासाठी उद्योपती बजाजा यांनी या फ्लॅटसाठी टोन सुद्धा दिले आहे. तर शिल्लक रक्कम ही ओसी मिळाल्यानंतर दिली जाणार आहे. प्रॉपर्टी मार्केटच्या जाणकरांचे असे मानणे आहे की, सध्या मुंबईत आलिशान घर खरेदी करण्याची स्पर्धा सुरु आहे. असे अशा कारणास्तव आहे की, एप्रिल महिन्यापासून कॅपिटल गेनच्या सेक्शन ५४ अंतर्गत गुंतवणूक करणे. ज्याची मर्यादा शून्य ते १० कोटींपर्यंत आहे. यावरील रक्कमेवर टॅक्स लावला जातो.(Mumbai biggest flat deal)

हे देखील वाचा- ब्रिटीश राजघराण्यालाही अर्थव्यवस्थेची झळ

मलबार हिलमध्ये बांधण्यात येणाऱ्या या ३१ मजली इमारतीचे बांधकाम नुकतेच सुरु झाले आहे. ही इमारत २०२६ पर्यंत बांधून पूर्ण होणार आहे. इंडस्ट्रियलिस्ट बजाजने टॉवरचे २९,३० आणि ३१ वे फ्लोर खरेदी केले आहेत. त्याचसोबत त्यांनी ८ पार्किंगच्या जागा खरेदी केल्या आहेत. सध्या बजाज मुंबईतील पेडर रोड येथील माउंट युनिक इमारतीत राहतात. येथे बजाज परिवाराचे इमारतीच्या टॉप २ फ्लोर आहेत. दरम्यान, ५० वर्ष जुन्या या इमारतीत आजच्या आधुनिक सुविधा नाही. नव्या टॉवरमध्ये बजाज परिवाराला प्रायवेट रुफटॉपवर जाण्याची सुविधा असणार आहे. येथे स्विमिंग पुल सुद्धा असणार आहे. इंडेक्स टॅप डॉट कॉमच्या मते ही डील नुकतीच झाली आहे. त्यासाठी १५ कोटी स्टॅम्प ड्युटी दिली गेली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.