Home » मुघलांच्या इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली किन्नर, ज्याच्या मृत्यूवेळी बेगमने आभूषण ही काढली

मुघलांच्या इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली किन्नर, ज्याच्या मृत्यूवेळी बेगमने आभूषण ही काढली

by Team Gajawaja
0 comment
Mughals powerful transgender
Share

मुघल साम्राज्यात किन्नरांकडे सुद्धा काही प्रकारच्या जबाबदाऱ्या होत्या. जसे हरम मध्ये शाही परिवारातील महिलांची देखभाल करणे कारण येथे पुरुषांना येण्याची परवानगी नव्हती. मुघल साम्राज्यात किन्नर तर खुप होते पण इतिहासात जावेद याचे नाव दाखल झाले. अवधचे नवाब राहिलेले सफदरजंगने अफगान आक्रमणकारी अब्दाली याला जोरदार मात दिली होती. या विजयानंतर मुघल बादशाह अहमद शाह याने २९ जून १७४८ मध्ये त्याला मुघल साम्राज्याचा वजीर म्हणून घोषित केले. वेळेसह सफदरजंगचा दबदबा ऐवढा वाढला की, त्याला आव्हान देण्याचे काम मात्र किन्नर जावेदने केले.(Mughals powerful transgender)

जावेद याला एखाद्या वेळी लगेच डोके कसे वापरायचे हे अत्यंत व्यवस्थितीत येत होते. त्याने असेच केले. वजीर घोषित झाल्यानंतर १७५० मध्ये सफदरजंग एक युद्ध पठाणांसोबत हरला आणि दिल्लीत परतला. युद्धात ७० हजार घोडेस्वार असून सुद्धा त्याला मोठा पराभव स्विकारावा लागला होता. युद्धादरम्यान जबड्याला लागून गोळी घासून गेली आणि तो बचावला.

जेव्हा किन्नर जावेद याने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली
पराभवानंतर जेव्हा तो दिल्लीत आला तेव्हा जावेदने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. इतिहासकार माइकल एडवर्ड असे लिहितात की, मुघलांमध्ये एक परंपरा होती की, यु्द्धात पराभव झालेले वजीरला आपल्या पदावरुन हटवले जावे. जावेदने सफदरजंगच्या मुघलांचा तोच नियम आठवून दिला. सफदरजंगला कोणत्याही किंमतीवर वजीरचे पद हातातून निसटून द्यायचे नव्हते त्यामुळे लाचच्या रुपात त्याने जावेदला ७० लाख रुपये दिले. ही रक्कम देण्यासह अशी गोष्ट सुद्धा सुनिश्चित केली की, त्याने याबद्दल कोणाला सांगू नये.

Mughals powerful transgender (1)
Mughals powerful transgender

कधी आणि कशा प्रकारे ऐवढा ताकदवान झाला जावेद?
पिछाडलेल्या वर्गात जन्मलेला जावेद अशिक्षित होता. मात्र संधीचा वापर करणे आणि जासूसी करण्यामध्ये तरबेज होता. त्याच्या याच गोष्टींमुळे मोहम्मद शाह रंगीलाने त्याला हरमचा सहाय्यक अधिक्षक बनवले. मात्र त्याचे नशीब पालटले ते म्हणजे बादशाहच्या मृत्यूनंतर. त्याने वेगाने प्रगती केली. जावेदला ६ हजार मनसबदारचा प्रमुख बनवण्यात आले. नंतर गुप्तचर विभागाचे प्रमुख बनवले. ऐवढेच नव्हे तर त्याला नवाब बहादुरच्या उपाधिने सुद्धा गौरवण्यात आले, तो सन्मान मिळवणारा एकमेव व्यक्ती होता.

त्याच्या या प्रगतीमागे राजमाता उधमबाई होत्या. फर्स्ट टु नवाब्स ऑफ अवधच्या पुस्तकानुसार जावेदचे उधबाई यांच्यासोबत काही संबंध होते. त्या त्याच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवायच्या. तो नियमांचे पालन करुन बादशाह अहमद शाह यांची आई उधमबाई यांच्यासोबत दिवस रात्र शाही हरममध्ये घालवायचा. दिल्लीत याच गोष्टीची खुप चर्चा व्हायची. राजमाताने दिलेल्या सूटमुळे दिवसेंदिवस तो उद्धट होऊ लागला होता. लोकांसोबत गैरवर्तवणूक करु लागला. त्याला जे काही आवडायचे नाही ते तो नष्ट करायचा.

प्रत्येक ठिकाणी मनमानी आणि दखल द्यायचा
जावेद आणि वजीन यांच्यामध्ये कधीच जुळले नाही. जावेदन सफदरजंग याच्या काही विश्वासूंना अगदी चतुराईने आपल्यामध्ये सहभागी करुन घेतले. ऐवढेच नव्हे तर वजीरच्या काही निर्णयांमध्ये दखल आणि लागू सुद्धा केले. साम्राज्याक काही ठिकाणी वजीर याची माणसे हटवून आपली शागिर्द तैनात केले. सफदरजंगला एक गोष्ट कळली की, जो पर्यंत तो आहे तोवर फक्त नावाचाच वजीर असेल.(Mughals powerful transgender)

हत्येचा कट रचला गेला
सफदरजंगने नेहमीच त्याला हटवण्यासाठी हत्येचा कट रचला. त्याने आपल्या विश्वासू राजा सूरजमल आणि जयपूरचा राजा माधवसिंह याला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने दिल्लीत घेऊन येण्यास सांगितले. दोघांनीही या होकार दिला. दोघे राज्यात आल्यानंतर प्रथम कोणाला भेटणार वजीर की जावेद हा एक मोठा प्रश्न उपस्थितीत राहिला. दोघांना वाटत होते पाहुण्यांनी आपल्याला प्रथम भेटावे. मुघल बादशहा कडून यावर तोडगा काढण्यात आला की, दोघांची भेट ही वजीरच्याच घरी होईल. अशा प्रकारच्या संधीच्या वेळी वजीर आणि जावेद दोघे ही उपस्थितीत होते. तेव्हा तारीख होती ६ सप्टेंबर १७५२.

दोघांनी भेट घेतल्यानंतर सफदरजंग हा जावेदला एका खोलीत घेऊन गेला. त्यावेळी राजकाज संबंधित प्रकरणावर त्याने प्रथम वाद केला आणि नंतर म्हटले की, माझे काही काम आहे. असे म्हणत तो निघून गेला. जसा तो बाहेर गेला तेव्हा खोलीत लपलेला अली बेग याने जावेदच्या पोटावर हल्ला केला. नंतर त्याच्यावर तलवारीने वार केले. त्याचा मृतदेह यमुनेच्या किनाऱ्यावर फेकून दिला.

हे देखील वाचा- केशरी वस्त्रांतील ‘ती’ समोर येते आणि आपल्या भावना व्यक्त करते!!!

जेव्हा ही गोष्ठ राजमाता आणि बादशाह अहमद शाह याच्या वडिलांना कळली तेव्हा त्यांना अत्यंत दु:ख झाले. दोघांच्या डोळ्यात अश्रू आले. प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी आपल्या पुस्तकात फॉल ऑफ द मुगल एम्पायर मध्ये असे लिहिले की, जावेदच्या मृत्युमुळे बादशाह आणि त्याची आई यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला. असे म्हटले जाते मृत्यूची बातमी कळताच उधमबाई यांनी विधवेप्रमाणे आपले सर्व आभूषणे काढली आणि सफेद कपडे परिधान केले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.