आज मध्यरात्रीच महाराष्ट्रातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांसंबंधित ८६ हजार वीज कर्मचारी, अधिकारी आणि इंजिनिअर संपावर गेले आहेत. यामुळे जवळजवळ बहुतांश जिल्ह्यात बत्ती गुल झाल्याचे दिसून आहे. सध्या हा स्ट्राइक ७२ तासांसाठी असणार आहे. हे कर्मचारी वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा विरोध करत आहेत. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार होते. यापूर्वी वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीचे प्रधान उर्जा सचिव आणि तीन कंपन्यांचे प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांच्यासोबत २ जानेवारीला एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत कोणतेही ठोस आश्वासन दिले गेले नाही. त्यामुळेच वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. (MSEDCL Employees Strike)
खासगीकरणाच्या विरोधात संप
गेल्या दीड महिन्यापासून वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष सिमिती ही कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन करत आहे. नागपुर मध्ये जेव्हा विधासभेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले होते तेव्हा ३५ हजार वीज कर्मचाऱ्यांनी विधानसभेच्या बाहेर विरोध केला होता. कर्मचाऱ्यांना असे कळले आहे की, महाराष्ट्र सरकार अदानी ग्रुपला या कंपन्यांच्या समांतर वीज वितरण करण्याची परवानगी देणार आहे. कर्मचारी याचाच विरोध करत आहेत. मात्र सरकारकडून कोणतेही आश्वासन दिले गेलेले नाही की, त्यांचे खासगीकरण केले जाणार नाही.
७२ तासांपर्यंत असणार संप, ग्राहकांना पॉवर कटचे टेंन्शन
सध्या संप ७२ तासांपर्यंत चालणार आहे, यामध्ये तीन प्रमुख वीज कंपन्यांचे ८६ हजारांहून अधिक वीज कर्मचारी, अधिकारी आणि इंजिनिअर सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त ४० हजार अशी ही लोक आहेत जी कॉन्ट्रॅक्टवर काम करत आहेत. त्यांची मागणी आहे की, सरकाराने अदानी ग्रुप सारख्या कंपन्यांना या कंपन्यांच्या समांतर वीजचे वितरण करण्यास परवानगी देऊ नये. त्याचसोबत तीन कंपन्यांच्या ४२ हजार रिक्त पदंवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असी ही मागणी केली जात आहे. तर वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्राहकांसमोर पॉवर कटचे टेंन्शन आहे. काही जिल्ह्यात तर आधीच बत्ती गुल झाली आहे.(MSEDCL Employees Strike)
हे देखील वाचा- ‘एथोस सलोन’ यांनी लोकांसमोर उघड केलं २०२३ चं रहस्य…
ग्राहकांना समस्येचा सामना करावा लागणार नाही
दुसऱ्या बाजूला वीजेचा पुरवठा बाधित होऊ नये म्हणून राज्य शासनाकडून ऑप्शनल व्यवस्था केली गेली आहे. कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून स्थितीवर नियंत्रण करण्यास सुरुवात केली गेली. कंट्रोल रुम तयार केले गेले. जेणेकरुन वीजेमुळे ग्राहकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये.