चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहीताना काही अभिनेत्रींची नावे आली नाहीत, तर तो अपूर्ण समजला जाईल. त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे मीना कुमारी. पहिली सुपरहिट अभिनेत्री असाही तिचा उल्लेख करण्यात येतो.
आयुष्याची तब्बल 33 वर्ष बॉलिवूडला देणाऱ्या या अजोड अभिनेत्रीने एकूण 92 चित्रपटात भूमिका केल्या आहेत. ती उत्तम लेखिका होती. तिने काही गझलही लिहील्या आहेत. दैवी सौदर्य लाभलेली ही अभिनेत्री मनस्वी हळवी होती. अनेक हीट चित्रपट देणाऱ्या मीनाकुमारीचे वैयक्तिक आयुष्य मात्र वादादीत राहीले आहे. तिचा उल्लेख ‘ब्युटी विथ ट्रॅजेडी’ असा करण्यात येतो.
त्या काळी मीना कुमारी अनेकांच्या ‘दिल कि धडकन’ होती. तिचे लाखो चाहते होते. तरी तिचे शेवटचे दिवस मात्र एकाकी गेले. 31 मार्च 1972 रोजी मीना कुमारीचे निधन झाले. चित्रपटात या सर्व पैलूवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. यात कृती सेनन, मीना कुमारीच्या भूमिकेत असेल असं जवळपास नक्की झालं आहे. टी-सिरीज या चित्रपटाची निर्मिती करत असून लवकरच त्याची घोषणा होणार आहे.
====
हे देखील वाचा: लिखे जो खत तुझे वो तेरी यादमे…
====
गेल्या काही महिन्यापासून या चित्रपटाचे काम चालू आहे. टी सीरीजतर्फे होणाऱ्या या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध चालू होता. आता कृती सेननच्या नावापर्यंत हा शोध आला आहे. टी सीरीजकडून मीना कुमारीच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्रीचा शोध घेण्यात आला तेव्हा कृती सेननला पहिली पसंती देण्यात आली असली तरी अद्यापही कृतीतर्फे त्याला दुजोरा देण्यात आला नाही.
मिमी या चित्रपटात कृती सेननच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. मीना कुमारीच्या जीवनावर तयार होणारा चित्रपट कृतीच्या नावावर जमा झाला, तर तो तिच्यासाठी मोठा ब्रेक ठरणार आहे. टी सीरीजतर्फे लवकरच या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची घोषणा करणार आहे.
====
हे देखील वाचा: सावधान! वेबसीरिजच्या दुनियेत ‘माई’ दाखल होतेय…
यासोबतच मीना कुमारी यांच्या जीवनावर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही लवकरच एक वेबसिरीजही येत आहे. कमल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या जीवनावर असलेल्या या वेबसिरीजची घोषणा आधीच झाली असून चित्रपटाआधी ओटीटीवर ही सिरीज दाट येण्याची शक्यता आहे.
यासोबत कृती सेननकडे आणखीही काही मेगाबजेट चित्रपट असून तेही लवकरच प्रदर्शित होत आहेत. त्यात प्रभाससोबत आदिपुरुषमध्ये कृती सीताच्या भूमिकेत आहे. तर टायगर श्रॉफसोबत ती गणपत या चित्रपटातही प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय भेडीया आणि कार्तिक आर्यनच्या शहजादा या चित्रपटातही कृती प्रमुख भूमिकेत आहे.
– सई बने