Home » Mouth Cancer: सिगरेट किंवा गुटखा नव्हे तर ‘या’ कारणांमुळे सुद्धा होऊ शकतो

Mouth Cancer: सिगरेट किंवा गुटखा नव्हे तर ‘या’ कारणांमुळे सुद्धा होऊ शकतो

by Team Gajawaja
0 comment
Mouth Cancer
Share

एप्रिल महिना हा Mouth Cancer Awareness च्या रुपात साजरा केला जातो. या मोहिमेअंतर्गत लोकांना सांगितले जाते की, त्यांनी तोंडाच्या कँन्सर प्रति जागृक राहिले पाहिजे. जेणेकरुन अशा काही गोष्टी आहेत त्यांची काळजी घेत तुम्ही यापासून दूर राहू शकता. बहुतांश प्रकरणी तोंडाचा कँन्सर हा पुरुषांमध्ये फार आढळतो. भारतात बहुतांस पुरुष सिगरेट अथवा गुटखा खातात. हेच कारण आहे की, देशात पुरुषांमध्ये होणारा कँन्सर सामान्य आहे. रिपोर्ट्नुसार देशात प्रत्येक वर्षी जवळजवळ १ लाख माउथ कँन्सरची प्रकरणे समोर येतात.(Mouth Cancer)

परंतु लोकांना असे वाटते की, तोंडाचा कँन्सर हा केवळ अंमली पदार्थांच्या सेवनामुळेच होते. पण असे नाही. हा तुम्हाला लठ्ठपणा किंवा संक्रमणाच्या कारणास्तव ही होऊ शकतो. तर जाणून घ्या तोंडाचा कँन्सर होण्यामागील काही कारणे.

तोंडाच्या कँन्सरची सुरुवाती लक्षण
-ओठ किंवा तोंडात जखम झाल्यास तर बरी न होणे
-तोंडात एक सफेद किंवा लाल रंगाचा पॅच येणे
-कमजोरदाक
-तोंडात गाठ येणे
-तोंड दुखत राहणे
-कान दुखत राहणे
-गिळण्यास त्रास होणे
-बोलण्यात बदल

-लठ्ठपणा किंवा अधिक वजन
कँन्सर कधी आणि का होतो हा एक मोठा प्रश्न आहे. आपल्या शरिरातील कोशिका अधिक तयार झाल्यास त्या अनियंत्रित होतात. तज्ञ असे सांगतात की, ज्यांचे वजन अधिक असते त्यांच्या कोशिकांमध्ये वेगाने वाढ होत राहते. याच कारणामुळे कँन्सरचा धोका वाढू शकतो. विविध प्रकारचे हार्मोन तयार होण्यापासून रोखण्यासाठी एक हेल्दी रुटीन फॉलो करणे सुरु करावे.(Mouth Cancer)

-न्युट्रिएंट्स नसणे
वजन कमी होणे किंवा बाहेरचे अधिक खाल्ल्याने शरिरात न्युट्रियंट्स म्हणजेच पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. अशा प्रकारची चूक गंभीर आजारांना आमंत्रण देते. ज्यामध्ये माउथ कँन्सरचा सुद्धा समावेश आहे. हेल्दी रहाणे सर्वोत्तम. पण पोषक तत्त्वांचे सेवन न करणे हे चुकीचे आहे. हेल्दी डाएट आणि उत्तम रुटीच्या माध्यमातून त्याची पुर्तता केली जाऊ शकते.

हे देखील वाचा- वारंवार लघवी होणे असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे संकेत

-माउथवॉश
बदलत्या जगात लोक वेगवेगळ्या प्रकारे आपली काळजी घेत राहतात. खासकरुन शहरी भागात असे काही प्रकार केले जातत ज्याचे फायदे कमी आणि नुकसानच अधिक असते. यामध्ये माउथवॉशचा ही समावेश आहे. कारण त्यात केमिकल आणि अल्कोहोल असते. ज्यामुळे तोंडाच्या कँन्सरचा धोका वाढतो. स्प्रे असणारे माउथवॉश अधिक नुकसान पोहचवतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.