Home » सकाळी उठल्यानंतर भीती वाटण्यामागे असू शकते ‘हे’ कारण

सकाळी उठल्यानंतर भीती वाटण्यामागे असू शकते ‘हे’ कारण

एंग्जायटी म्हणजे भीती वाटणे याचा आपल्या मेंदूसह शरीरावर वाईट परिणाम होतो. काही लोकांना सकाळी उठल्यानंतर टेंन्शन, चिडचिड होणे, खुप राग येणे, थकवा जाणवणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

by Team Gajawaja
0 comment
morning anxiety reasons
Share

एंग्जायटी म्हणजे भीती वाटणे याचा आपल्या मेंदूसह शरीरावर वाईट परिणाम होतो. काही लोकांना सकाळी उठल्यानंतर टेंन्शन, चिडचिड होणे, खुप राग येणे, थकवा जाणवणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. हे सर्व एंग्जायटीची लक्षणे आहेत. २०२० मध्ये डब्लूएचओ द्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतात १८ ते २४ वयोगटातील जवळजवळ ९.३ टक्के तरुणांमध्ये कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसात एंग्जायटी आणि डिप्रेशन दिसून आले. ही संख्या मार्च २०२० पर्यंत वाढून १६.८ टक्क्यांवर पोहचली होती. (Morning Anxiety Reasons)

रिपोर्टमध्ये असे समोर आले की, पुरुष, जेष्ठ नागरिकांच्या तुलनेत महिला आणि तरुणांमध्ये एंग्जायटी किंवा डिप्रेशनचे प्रमाण अधिक आहे. एंग्जायटीची लक्षणे आपल्या आरोग्याला नुकसान पोहचवतात. अशातच तुम्ही यापासून दूर राहण्यासाठी सर्वात प्रथम हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, अखेर सकाळी उठल्यानंतर एंग्जायटीचा अनुभव का येतो.

एंग्जायटी डिसऑर्डर
सकाळी उठल्यानंतर एंग्जायटी वाटणे याला जनरल एंग्जायटी डिसऑर्डर असे म्हणू शकतो. जी लोक लोक यामुळे ग्रस्त असतात ते कमीत कमी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ एंग्जायटी आणि भीतीचा सामना करतात.

बायोलॉजिकल डिसऑर्डर
कोर्टिसोल ज्याला तणावाचे हार्मोन म्हणून ओळखले जाते तो आपल्या शरीरात सकाळच्या वेळेस जवळजवळ एक तासांसाठी अधिक अॅक्टिव्ह होतो. कोर्टिसोल अवेंकिग सिस्पॉन्स ही एक अशी स्थिती आहे जी त्या लोकांमध्ये आढळते जी लोक नेहमीच एंग्जायटीचा अनुभव करतात.

Waking up With Anxiety: 8 Steps to Calm Morning Anxiety

पुरेशी झोप न घेणे
जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीराला आराम मिळतो. रात्रीची ७-८ तासांची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. वेळेवर न झोपणे, सकाळी वेळेवर न उठणे हे सुद्धा याचे कारण असू शकतात. काही अभ्यासात असे समोर आले आहे की, जर तुम्ही रात्री पुरेशी झोप घेतली नाही तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एंग्जायटी होऊ शकते. (Morning Anxiety Reasons)

हेल्थ संबंधित समस्या
जर व्यक्ती आधीच एखाद्या आजाराचा सामना करत असेल आणि त्याला सकाळी उठल्यानंतर एंग्जायटीचा अनुभव येऊ शकतो.

तणावाखाली असणे
आयुष्यात असे काही बदल होत असतात जे व्यक्तीसाठी चिंतेचे एक मोठे कारण ठरू शकते. घरात एखाद्या प्रकाराचा तणाव, नोकरीत बदल किंवा एक प्रकारची भीती अशा सुद्धा काही समस्या असतात. या व्यतिरिक्त एंग्जायटीच्या मागील एक कारण जेनेटिक सुद्धा असू शकते. एका अभ्यासात असे समोर आले आहे की, जनरल एंग्जायटी डिसऑर्डर आणि एंग्जायटीची स्थिती ही वेगवेगळ्या जीन सोबत जोडलेली आहे. अशातच ती जेनेटिक सुद्धा असू शकते.

यापासून असे रहा दूर
-कॅफेन आणि निकोटीन, अल्कोहोल पासून दूर रहा
-हेल्दी डाएट खा
-पुरेशी झोप घ्या
-तणाव मॅनेज करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक वापरा
-नकारात्मक विचारांपासून दूर रहा
-एक्सरसाइज करा
-एक हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा


हेही वाचा- टीनएज माइग्रेनची ‘ही’ आहेत लक्षणे


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.