स्पेस रिसर्च मध्ये भारत सातत्याने प्रगती करत आहे. अशातच भारतीय अंतराळ अनुसंधान संघटना म्हणजेच इस्रोने आपल्या बहुप्रतीक्षित मून मिशन चंद्रयान-3 चे नुकतेच लॉन्चिंग केले. चंद्रयान-1 आणि चंद्रयान-2 मिशन नंतर आता या नव्या मून मिशनचा उद्देश हा चंद्राच्या पृष्ठभागावर भारतीय तंत्रज्ञान कौशल्य आणि वैज्ञानिक क्षमतांचे नमूने सादर करण्याचे आहे. एक सुरक्षित मून लँन्डिंग, रोवर रिसर्च आणि चंद्रावर वैज्ञानिक प्रयोगांवर लक्ष ठेवण्यासह चंद्रयान-३ मिशन हे चंद्राची संरचना, भूविज्ञान आणि त्याच्या इतिहासाच्या नव्या रहस्यांचा शोध घेण्याकडे अधिक लक्ष देणार आहे. तर पुढील काही महत्त्वाच्या पॉइंट्समधून जाणून घेऊयात या मिशनच्या उद्देशाबद्दल अधिक. (Moon Missions)
चंद्रावर का शोध घेतला जात आहे?
चंद्रयान-3 मिळून एकट्या भारताने चंद्रावर तीन मिशन केले आहेत. मात्र याव्यतिरिक्त ही जगातील काही राष्ट्रीय आणि खासगी अंतराळ एजेंसीकडून लूनर मिशन करण्यात आले होते किंवा त्याची तयारी करत आहेत. या मिशन्सला मात्र अपेक्षित यश मिळालेले नाही. हेच कारण आहे आज सुद्धा चंद्रावर संशोधन करणे एक आव्हानात्मक मानले जाते.
1969 मध्ये नील आर्मस्ट्राँन्ग यांनी अमेरिकेचे मिशन अपोलो 11 च्या माध्यमातून चंद्रावर चालणारे पहिले अंतराळवीर होते. या ऐतिहासिक मिशनच्या काही दशकांनंतर चंद्राबद्दल अधिक माहिती मिळवणे व्यक्तीसाठी फार महत्त्वपूर्ण झाले आहे. विशेतज्ञ असे म्हणतात की, जेव्हा पृथ्वी आणि ब्रम्हांडच्या इतिहासाच्या अभ्यासाचा मुद्दा येते तेव्हा चंद्र हा एक खजिन्यासारखा आहे.
चंद्रावर मिशन करण्यामागील उद्देशांबद्दल नासाची वेबसाइट असे म्हणते की, चंद्र हा पृथ्वीपासून तयार झाला आहे. येथे पृथ्वीच्या सुरुवातीच्या इतिहासाचे पुरावे आहेत. मात्र पृथ्वीचवरील हे पुरावे भुगर्भिक प्रक्रियांमुळे नष्ट झाले आहेत.
नासाच्या मते, चंद्र शास्त्रज्ञांना लवकर पृथ्वीवर नवीन दृष्टीकोन प्रदान करेल.पृथ्वी-चंद्राची प्रणाली आणि सुर्यमाला कशी तयार झाली आणि त्यांचा विकास कसा झाला याची उत्तरे वेज्ञानिकांना मिळू शकतात. त्याचसोबत पृथ्वीच्या इतिहासाबद्दल ही माहिती मिळू शकते. अमेरिकन एजेंसीच्या मते चंद्र अनेक रोमांचक इंजिनिअरिंग आव्हाने दाखवतो. तर मून मिशनमुळे मनुष्याला दुसऱ्या जगात राहण्याचा आणि काम करण्याचा पहिला अनुभव मिळू शकतो. (Moon Missions)
हेही वाचा- चंद्रयान-3 च्या मोहिमेची जबाबदारी असणाऱ्या रितु कारिधाल यांच्याबद्दलच्या खास गोष्टी
चंद्रयान-3 नंतर या मून मिशनची तयारी
– चंद्रयान-3 नंतर रशिया मून मिशन लूना-25 लॉन्च होऊ शकते. लूना-25 ला सोयुज रॉकेट येथून लॉन्च केले जाऊ शकते. अशी अपेक्षा केली जात आहे की, हे मिशन ऑगस्टमध्ये लॉन्च होऊ शकते.
-जपानची अंतराळ एजेंसी म्हणजेच JAXA कडून सुद्धा स्मार्ट लँन्डर फॉर इन्वेस्टिगेटिंग मूनची तयारी केली जात आहे. या मिशनमध्ये एक्सरे इमेजिंग आणि स्पेक्ट्रोस्कोपीला चंद्रावर पाठवले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान हे मिशन लॉन्च होऊ शकते.
-टेक्सास मधील खासगी कंपनी इंट्युएटिव मशीन याच वर्षात IM-1 मिशन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनीने लँन्डरचे नाव नोवा सी असे ठेवले आहे.
-खासगी स्पेस कंपनी एस्ट्रोबोटिक सुद्धा या वर्षाच्या अखेर पर्यंत पेरेग्रीन एम-1 मिशन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.