सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा पावसाळा अखेर सुरु झाला. उन्हाच्या तडाख्यानंतर येणारा पाऊस म्हणजे निव्वळ सुख. पाऊस म्हणजे चैतन्य. संपूर्ण वातावरण थंड करण्यासोबतच झाडांना हिरवीगार पालवी येते. मन प्रफुल्लित होते. पाऊस येणार सोबत सणवार देखील घेऊन येतो. सगळ्यांचा मनापासून आवडणारा हा ऋतू सोबत आनंद घेऊन येण्यासोबतच अनेक आजार, घरात येणारा कुबट वास देखील आणतो. पाऊसात घरात येणारा कुबट वास खूपच सामान्य आहे. (Moonsoon Tips)
पावसात घराबाहेर आणि घरात एक विचित्र कुबट असा वास येत असतो. हा दुर्गंध कोणालाही आवडत नाही. शिवाय दुर्गंध नेमका कुठून आणि कशातून येतोय तेही कळत नाही, मात्र हा दुर्गंध नको नकोसा वाटतो. घरातील आणि घराबाहेरील काही विशिष्ट ठिकाणांमधून जसे की चपलांचे स्टँड, घरातील रूमचा कोपरा, डोअर मॅट, डस्टबिन ठेवण्याची जागा, बाथरूमजवळ अशा काही ठिकाणी हा वास येतो. हा वास घालवायचा सगळेच जमेल तसा प्रयत्न करतात, मात्र अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. आज आम्ही तुमची हीच समस्या कशी सोडवता येईल यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला देणार आहोत. (Marathi Trending News)
* पावसाळ्यात पाऊस, वादळ, वारा असल्याने घराच्या खिडक्या दरवाजे दिवस देखील बराच वेळ बंद असतात. पण, यामुळे घरात हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळे देखील घरात कुबट वास येऊ लागतो. घरातील हा कुबट वास दूर करण्यासाठी पाऊस कमी झाल्यानंतर, सूर्य उगवल्यानंतर किंवा जमल्यास पाऊस असताना देखील घराच्या खिडक्या – दरवाजे उघडे ठेवा. जेणेकरून घरात हवा खेळती राहील आणि घरातील कुबट वास दूर होण्यास मदत होते. (Latest Marathi News)
* विविध प्रकारची तेल वापरून देखील घर सुगंधित ठेवता येऊ शकते. यासाठी टी ट्री ऑइल, लेमनग्रास, लैव्हेंडर, पेपरमिंट किंवा निलगिरीचे तेल वापरता येते. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये आवश्यक तेवढं तेल घ्यावे आणि ते घराच्या कानाकोपऱ्यात मारावे. किंवा तुम्ही कडुलिंब आणि गुलाबपाणी मिक्स करून तुम्हाला नॅचरल एअरफ्रेशनर घरी बनवून ते स्प्रे करू शकता. यामुळे घर सुगंधित राहील. शिवाय तुम्ही घरात सुगंधित मेणबत्या देखील लावू शकता. सोबतच सुगंधित मेणबत्ती आणि अगरबत्ती सुद्धा घरातील कुबट वास दूर करण्यास उपयुक्त ठरतील. (Social News)
* हा कुबट वास घालवण्यामध्ये कापूर देखील उत्तम पर्याय आहे. सध्या बाजारात कापूरमध्ये जॅस्मिन, सँडलवूड किंवा अन्य काही सुवासिक पर्याय देखील मिळतात. हे सुवासिक कापूर किंवा कापराचा कोन घराच्या वास येणाऱ्या कोपऱ्यात किंवा चपलांच्या स्टँडटच्या जवळ ठेवला तर त्याचा सुवास दरवळत राहतो. सुवासिक कापूराचा वास खोलीमध्ये जास्त काळ भरुन राहतो. (Top Stories)
* एअर डिफ्युजरचा वापर देखील लाभदायक असतो. यामध्ये सुगंधी लिक्वीड टाकून त्याचा सुवास घरभर राहण्यास मदत मिळते. त्यामुळे घरात असे डिफ्युजर आणून ठेवा. ते बाथरुम आणि बेडरुममध्ये आणून ठेवा.
=============
हे ही वाचा : Pandharpur : जाणून घ्या पंढरपूरच्या वारीचा इतिहास आणि महत्व
============
* घरात पावसाळ्यात सूर्यप्रकाश आणि हवा नीट येत नाही. त्यामुळे पावसात बाथरूमचा वास खराब होतो. हा वास दूर करण्यासाठी, पाण्यात हायड्रोजन पेरोक्साइड मिसळा आणि बाथरूमच्या प्रत्येक कोपऱ्यात स्प्रे करा.
* पावसाळ्यात, ओलाव्यामुळे अनेकदा कपड्यांमधून किंवा लाकडी कपाटांमधून वास येतो. अशावेळेस तुम्ही कपाटाच्या कोपऱ्यात नॅप्थालीन बॉल्स अर्थात डांबर गोळ्या ठेवू शकता. शिवाय एका डब्यात कॉफी घेऊन तो डबा कपाटात ठेवा. यामुळे कपाटातील सर्व वास निघून जाईल.
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics