Monsoon Skin Care Tips : सध्या सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. या ऋतूत हवेतील वातावरणात दमटपणा अधिक वाढला जातो. अशातच धुतलेले कपडेही सुकले जात नाहीत. दररोज कपडे धुतल्यानंतर वाळले तरीही त्यामध्ये दमटपणा राहतो. अथवा ऑफिसला जाताना पावसात भिजल्याने कपडे ओलसर होतात. हेच कपडे दीर्घकाळ घालून राहिल्याने त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. ओलसर अंडरगार्मेंट्स दीर्घकाळ घातल्याने प्रायव्हेट पार्ट्सच्या येथे खाज येणे, रॅशेज होणे अथवा त्वचा लाल होणे अशा समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया पावसाळ्यात ओलसर कपडे परिधान केल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात याबद्दल सविस्तर…
सर्दी आणि खोकला
ओलसर कपडे परिधान केल्याने सर्दी-खोकल्याची शक्यता वाढली जाते. ओलसर कपड्यांमुळे शरिराचे तापमान थंड होते. यामुळे सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढली जाते. पावसाळ्यात सर्दी-खोकलासारखे संक्रमण सहज होतात. यामुळे ओलसर कपडे लगेच बदलावेत.
प्रायव्हेट पार्टच्या येथे रॅशेज
ओलसर अंडरगार्मेंट्समुळे इंटिमेंट एरियाच्या येथे जळजळ आणि रॅशेज होतात. यामुळे बॅक्टेरियाचा फैलाव वाढला जातो. यावर तातडीने उपचार करणे महत्वाचे आहे. अन्यथा संक्रमण अधिक वाढले जाऊ शकते.
मुलांना होऊ शकतो न्युमोनिया
पावसाळ्यात मुलांना खेळण्यास फार आवडते. काही वेळेस भिजल्यानंतर मुलं तशीच ओलसर कपड्यांमध्ये फिरतात. यामुळे मुलांना न्युमोनिया होऊ शकतो. ओलसर कपड्यांमध्ये बॅक्टेरिया पटकन वाढण्याची शक्यता असते. यामुळे मुलांना भिजण्यापासून दूर राहण्यास सांगावे.
त्वचेसंबंधित संक्रमण
पावसाळ्यात दीर्घकाळ ओलसर कपडे परिधान केल्याने त्वचेसंबंधित संक्रमण खाज, रॅशेज अशा समस्या उद्भवू शकतात. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी नेहमीच व्यवस्थितीत सुकलेले कपडे परिधान करा. (Monsoon Skin Care Tips)
रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते
पावसाळ्यात ओलरस कपड्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते. याशिवाय शरिरात ओलसरपणा वाढला जातो. यामुळे संक्रमण होण्याची शक्यता वाढली जाते.