Home » पैशांची बचत करण्यासाठी या ट्रिक्स येतील कामी

पैशांची बचत करण्यासाठी या ट्रिक्स येतील कामी

बहुतांशजण आपल्या पगारातून काही रक्कमेची बचत करतात. पण काहींना बचत करणे शक्य होत नाही. अशातच तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या पगारातील पैसे बचत करताना समस्या निर्माण होऊ शकते.

by Team Gajawaja
0 comment
Saving Account
Share

Money Saving Tips : बहुतांशजण आपल्या पगारातून काही रक्कमेची बचत करतात. पण काहींना बचत करणे शक्य होत नाही. अशातच तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या पगारातील पैसे बचत करताना समस्या निर्माण होऊ शकते.

पैसे कमावण्यासह त्याची बचत करणेही महत्त्वाचे आहे. दरम्यान, महागाईच्या कारणास्तव बहुतांशजणांना वाटते की, महिन्याभरात पैशांची बचत होणार नाही. पण बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही लोक कमी पगारामुळे उत्तम बचत करत नाही. अशातच पैशांची बचत करण्यासाठी पुढील काही ट्रिक्स वापरू शकता.

आपत्कालीन फंड तयार करा
तुमच्या कपाटात एक पाकिट ठेवा, ज्यामध्ये तुम्ही थोडेथोडे पैसे बचत करू शकता. अशाने हळूहळू तुमच्याकडे व्यवस्थितीत पैसे जमा होऊ शकतील. याशिवाय आपत्कालीन फंड देखील तयार करा. पण लक्षात ठेवा, आपत्कालीन फंडाचा खर्चासाठी वापर करू नका.

कार्डऐवजी रोख रक्कमेचा वापर करा
आजकाल बहुतांशजण खरेदी करताना कार्ड स्वाइप करतात. यामुळे कळत नाही तुमचे किती पैसे खर्च झाले आहेत. अशातच खरेदीसाठी जाणार असाल तर रोख रक्कम पाकिटात ठेवा. जेणेकरुन पैशांची बचत होण्यास तुम्हाला मदत होईल.(Money Saving Tips)

एखाद्या गोष्टींसाठी पर्याय शोधा
आजकाल बहुतांश सामानासाठी तुम्हाला पर्यायही मिळतात. अशातच स्वस्त आणि टिकाऊ वस्तू तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करता येऊ शकतात. असे केल्याने तुमचे पैसे नक्कीच बचत होऊ शकतात.

वेळीच बिलाचे पेमेंट करा
काहीवेळेस बहुतांशजणांना आपले फोन, क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळच्या वेळी करता येत नाही. अशातच लेट पेमेंट फी तुम्हाला भरावी लागते. यामुळे अतिरिक्त खर्च उगाचच वाढला जाऊ शकतो. यामुळे कोणतेही पेमेंट वेळच्या वेळी करा.

विनाकारण होणारा खर्च टाळा
सर्वकाही गोष्टी मिळणे सहज शक्य झाल्याने त्यांची आवर्जून खरेदी केली जाऊ शकते. अशातच काहीवेळेस विनाकरण पैसे यामुळे खर्च होतात. तुमची ही सवय बंद करा. यामुळे तुमच्या पैशांची बचत होण्यास मदत होईल.


आणखी वाचा :
प्रॉपर्टीत भाडेकरुला ठेवण्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात
DINKs ट्रेण्ड नक्की काय आहे? जो कपल्स करतायत फॉलो
सौदी अरेबियामध्ये दारू पिण्याविरुद्ध कडक कायदे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.