Home » भारतात क्रिकेटमध्ये बक्कळ पैसा !

भारतात क्रिकेटमध्ये बक्कळ पैसा !

by Team Gajawaja
0 comment
Cricket VS Sports
Share

भारतात क्रिकेट हा जणू एक धर्मच आहे. पण क्रिकेटच्या आधीपासून अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारताने नावलौकिक कमावलं होतं. मात्र तरीही क्रिकेटपटूंच्या तुलनेत इतर खेळाडूंच्या वेतनात बरचं अंतर दिसतं आणि त्यात कोट्याट्यवधींची तफावत आहे. क्रिकेटची लोकप्रियता आणि त्यामुळे दुर्लक्षित होणारे इतर खेळ तसच इतर खेळांना होणारी आर्थिक चणचण खूप वाढली आहे. (Cricket VS Sports)

भारताला क्रीडा स्पर्धांचं माहेरघर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र काही वर्षांपूर्वी भारताच्या विविध खेळांना अशी उतरती कळा लागली की, सध्या प्रसिद्धी एकाच खेळाची उरली, तो म्हणजे क्रिकेट ! क्रिकेट हा भारतात सध्या एक धर्मच झाला आहे. प्रत्येक गल्ली बोळात लहान पोरं बाकीचे खेळ नंतर पण आधी क्रिकेटच खेळायला शिकतात. ते सोडा पण भारतात सर्वात जास्त चर्चा कशावर होते, असं गूगल जरी केलं तरी टॉप 5 मध्ये नक्कीच क्रिकेट असतं. पण एक गोष्ट म्हणजे क्रिकेट इतकेच बाकीचे खेळ कोणीच पाहत नाही, हे दुर्दैव.

मुळात क्रिकेटपूर्वीच आपण अनेक खेळांमध्ये मैदान मारलं आहे. त्यात कुस्ती, हॉकी, फुटबॉल, एथलेटीक्स असे बरेच क्रीडा प्रकार आहेत. मात्र आज याच क्रीडा प्रकारांना क्रिकेटने मागे टाकलं आहे, असं चित्र आहे. या खेळांचे आर्थिक निकष जरी पाहिले, तरी इतर खेळांमधील खेळाडूंना क्रिकेटर्सच्या तुलनेत खूप कमी पैसा मिळतो. क्रिकेटर्स मात्र कोट्यावधींचे मालक होतात. (Cricket VS Sports)

सुरुवातीला आपण इतर खेळांच्या खेळाडूंचं वार्षिक वेतन जाणून घेऊया ! हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंचं सरासरी वार्षिक वेतन 8 लाख इतकं असतं, तर एथलेटीक्स खेळणाऱ्या खेळाडूंना जवळपास 5 ते 6 लाखांपर्यंत वेतन मिळतं. त्यात जर त्यांनी उत्तम केलाच तेव्हाच त्यांचा हवा तसा गौरव होतो आणि इतरवेळेला त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. जगातला सर्वात श्रीमंत खेळ म्हणजे फुटबॉल… पण याच फुटबॉलमध्ये एकेकाळी मैदान गाजवणारा भारतीय संघ आज टॉप 100 रॅंकिंगमधून सुद्धा बाहेर फेकला गेलाय. भारतीय फुटबॉलर्सना मिळणारं सरासरी वार्षिक वेतन वार्षिक वेतन 2 लाख 50 हजार आहे. पण या सर्वांच्या तुलनेत टर तेच क्रिकेटपटूंच्या वार्षिक वेतनाकडे पहिलं तर त्यांना सरासरी 1 कोटी ते 7 कोटी एवढं वेतन मिळतं. रणजी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाही जास्त वेतन मिळतं. तसंच IPL आणि brand endorsement ह्या सगळ्यांचे मिळून आकडे बघितले तर कोटींचं अर्धशतक होईल, इतका पैसा ते कमावतात. (Cricket VS Sports)

भारतात क्रिकेटच्या आधीच अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये नावलौकिक कमावलं होतं. ऑलिंपिक स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड वर गोल्ड… खाशाबा जाधव यांचा पहिला-वहिला वैयक्तिक ऑलिंपिक मेडल, भारतीय फुटबॉल संघाचा सुवर्णयुग, मिलखा सिंग यांच्या वर्ल्ड क्लास रेस, इतकच काय तर क्रिकेटच्या आधीच भारताने 1975 सालीच हॉकीमध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. पण आपलं दुर्दैव की आपण आपल्या हॉकीवीरांचा आणि कधीच गौरव केला नाही, मात्र काल्पनिक असलेल्या शाहरुख खानच्या चक दे इंडिया चित्रपटाला डोक्यावर घेतलं.

आता मात्र क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे इतर खेळांना डावललं जात आहे. यामुळेच 140 कोटींची लोकसंख्या असलेला आपला देश केवळ 7 ऑलिंपिक पदक जिंकू शकतो. क्रिकेट वगळता इतर खेळांना पायाभूत सुविधा दिल्या, सुसज्ज मैदान, क्रीडा सामग्री हे सगळं जर त्यांना मिळालं, तर निश्चितच भारत येत्या काळात क्रीडा स्पर्धांचा बादशाह होऊ शकतो. गेल्या 8 ते 10 वर्षात भारताने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवलीच आहे. नीरज चोप्राचा गोल्डन थ्रो, हॉकीमध्ये 40 वर्षानंतर ऑलिंपिक मेडल, पॅरालिम्पिकमध्ये 19 मेडल्स, इतिहासात पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये 100 मेडल्स… अशी एतिहासिक कामगिरी खेळाडूंनी करून दाखवली आहे. त्यामुळे आता कुठेतरी इतर खेळ श्वास घेत आहेत. (Cricket VS Sports)

====================

हे देखील वाचा : IPL मध्ये खेळाडूंच्या टी-शर्ट मागील क्रमांक कसे ठरवले जातात?

====================

भारतात जेव्हापासून क्रिकेटची लोकप्रियता वाढली तेव्हापासून क्रिकेटर्सना वेगवेगळ्या brands कडून sponsorship मिळू लागल्या. brand endorsement करणारा पहिला भारतीय खेळाडू होता सचिन तेंडुलकर ! असे अनेक ब्रॅंडस सहसा क्रिकेटपटूंसोबतच टाय अप करतात. मात्र इतर खेळांच्या खेळाडूंसोबत क्वचितच brand endorsement केली जाते. त्यामुळे भारताला जर विविध जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये उभारी घ्यायचीच असेल, तर प्रत्येक क्रीडा प्रकाराला समान मानण्याशिवाय, त्यांना समान निधी वाटप आणि क्रीडा सामग्री देण्याशिवाय दूसरा पर्यायच नाही. त्यामुळे स्वत: देशवासीयांनी क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांनाही प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार करायला हवा. अन्यथा क्रिकेटच्या आड इतर खेळ पुन्हा झाकोळले जातील.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.