पैसा आणि श्रीमंती व्यक्तीला अशा मोहात ओढतो की, त्याचा ऐवढा गर्व लोकांना होतो आणि ते कोणत्याही गोष्टी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशातच मलेशियातील मोना फँन्डी (Mona Fandey) जी एक प्रसिद्ध पॉप सिंगर होती पण तिने केलेल्या अशा काही गोष्टींमुळे तिचे व्यक्तीमत्व धुळीला मिळाले. खरंतर तिने आपल्या नवऱ्यासोबत मिळून एका खासदाराची हत्या केली. त्यासाठी तिला आणि नवऱ्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. मात्र श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी तिने जो मार्ग निवडला त्यामुळे ते ऐकल्यानंतर सर्वजण हैराण झाले.
मजान इस्माइल ते मोना पर्यंतची कथा
मजान इस्माइल उर्फ मोना फेंडीचा जन्म १९५६ मध्ये पर्लिस मध्ये झाला. लहानपणापासूनच तिचे गाण्यावर प्रेम होते. तिचे स्वप्न होते की, तिला जगातील प्रसिद्ध पॉप सिंगर व्हायचे आहे. सुरुवातीला लहान-लहान ठिकाणी तिने कार्यक्रम केले. मात्र तिला त्यात यश मिळाले नाही. याच दरम्यान तिच्या आयुष्यात मोहम्मद अफाना अब्दुल रहमान याची एन्ट्री झाली. तो तिचा खुप मोठा फॅन होता. त्याने तिला मी तुला प्रसिद्धी मिळवून देईन असे आश्वासन दिले. पुढे जाऊन त्यांची मैत्री झाली आणि नंतर लग्न ही केले.
मोहम्मद हा मजानला प्रेमाने मोना असे बोलायचा. त्याने मोनावर खुप पैसा खर्च केला, अल्बम जारी केले. मोहम्मदने मोनासाठी काही स्टेज शो आणि टेलिव्हिजन इंटरव्यूची व्यवस्था केली. मात्र यामुळे काही खास यश मिळाले नाही आणि ते कर्जात बुडाले. येथून त्यांच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट आला आणि त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग निवडला.
सिंगर ते तांत्रिक बनवण्याचा प्रवास
आपल्याला गाण्याच्या करियरमध्ये यश न मिळाल्याने मोहम्मद अफाना अब्दुल रहमान आणि मोना यांनी मिळून जादू टोणाचा मार्ग निवडला. हळूहळू त्यांनी लोकांना आपल्याकडे आकर्षित केले. नव्या लोकांशी मैत्री केली. कालांतराने प्रसिद्ध आणि पॉवरफुल लोक मोनाच्या निकटवर्तीयांमध्ये सहभागी झाले. मोनाच्या अशा यशामुळे लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी घर आणि आलिशान गाड्या खरेदी केल्या. खरंतर बहुतांश लोक त्यांच्याकडून काळी जादू शिकण्यासाठी यायचे आणि त्यामधून ते बक्कळ पैसा कमावत होते. त्यांची सेवा सर्वसामान्य लोकांसाठी नव्हती. पाहता पाहता मोनाने अधिक धनवान होण्याचे स्वप्न पाहिले होते पण ते वेगळ्या पद्धतीने पूर्ण होत होते.
इदरिसला मोनाने पीएम बनण्याचे स्वप्न दाखवले
मंत्री इदरिस हे सुद्धा मोनापासून प्रभावित होत तिला भेटण्यासाठी यायचे. त्यांना मलेशियाचे पीएम बनायचे होते. इदरिस यांना मोनाने (Mona Fandey) त्यावेळी प्रसिद्ध राजकीय नेत्याचा उल्लेख करत म्हटले की, तिच्यामुळे ते ऐवढ्या पुढे पोहचले आहेत. त्यांनी तिला २.५ मिलियन रिंगत दिले. तिने इदरिस यांना असे म्हटले की, ती सुद्धा अशाच प्रकारची लोकप्रिय नेता होऊ शकते. तिने या बदल्यात त्यांना अर्धी रक्कम आणि अन्य संपत्ती गहाण ठेवण्यास सांगितली.
इदरिस यांची हत्या
मोनाच्या सांगण्यावरुन पूजा करण्यासाठी इदरिस मोनाच्या घरी आले. मोनाचे बोलणे मानत ते संपूर्ण कपडे काढून जमिनीवर झोपले आणि डोळे बंद केले. तिने त्यांच्या छातीवर एक फूल ठेवले आणि इतक्यात मोनाची सहाय्यिका जुरैमीने इदरिस यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. त्याचवेळी त्यांचे धड शरिरापासून वेगळे झाले. हत्या केल्यानंतर शरिराचे १८ तुकडे केले. मृत शरिराचे काही तुकडे त्यांनी खाल्ले तर काही घराजवळच दफन केले. इदरिस यांच्या मृत्यूनंतर ती कोणत्याही भीतीशिवाय फिरत राहिली.
मंत्र्याची हत्या केल्यानंतर कार खरेदी केली
मंत्र्याची हत्या केल्यानंतर मोनाने (Mona Fandey) नवी बेंजर कार खरेदी केली आणि कॉस्मेटिक सर्जरी केली. तर मंत्री बेपत्ता झाल्याची बातमी मिळाल्यानंतर तपास सुरु झाला. तपासात असे समोर आले की, इदरिस यांनी बेपत्ता होण्यापूर्वी बँक खात्यातून पैसे काढले होते. मोना पर्यंत पोहचले पण तिच्या विरोधात पुरावे मिळाले नाहीत. त्यानंतर एक नाटकीय घटनाक्रमाअंतर्गत जुरैमीला पोलिसांनी अटक केली. त्याचवेळी इदरिस यांच्या हत्येचा खुलासा झाला. तपासादरम्यान मोनाच्या घरात इदरिस यांच्या शवाचे अवशेष मिळाले. त्यानंतर १९९५ मध्ये मोना आणि तिला नवऱ्याला लगेच अटक करण्यात आली.
हे देखील वाचा- लग्नापूर्वी फर्टिलिटी चाचणी… वादात पडला शाही परिवार
१९९५ मध्ये अटक झाल्यांतर मोना आणि तिच्या नवऱ्याला कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा ते महागडे कपडे घालून आले. ती अशी म्हणायची की, माझे काही फॅन्स आहेत. तिला असे वाटायचे की, तिने लहानपणी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाले आहे. वर्ष २००१ मध्ये जेव्हा तिला फाशीवर चढवले तेव्हा अखेरचे तिचे शब्द होते की, मी मरणार नाही. तिच्या नवऱ्याला ही फाशीची शिक्षा सुनावली होती.